Lokmat Sakhi >Shopping > नवरात्रीसाठी यंदा खरेदी करा आकर्षक - सुंदर घट, खिशाला परवडणाऱ्या किमतीत - बघा ५ पर्याय

नवरात्रीसाठी यंदा खरेदी करा आकर्षक - सुंदर घट, खिशाला परवडणाऱ्या किमतीत - बघा ५ पर्याय

Online Shopping For Navratri: नवरात्रीत घटस्थापना करायला यंदा नवा घट (Ghat or kalash for navratri) घेणार असाल तर हे काही ऑनलाईन पर्याय नक्कीच तपासून बघा..  नक्कीच आवडतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2022 06:23 PM2022-09-19T18:23:13+5:302022-09-19T18:23:56+5:30

Online Shopping For Navratri: नवरात्रीत घटस्थापना करायला यंदा नवा घट (Ghat or kalash for navratri) घेणार असाल तर हे काही ऑनलाईन पर्याय नक्कीच तपासून बघा..  नक्कीच आवडतील.

Navratri Special Shopping: Attractive kalash or ghat for Ghatsthapna in Navratri at low price | नवरात्रीसाठी यंदा खरेदी करा आकर्षक - सुंदर घट, खिशाला परवडणाऱ्या किमतीत - बघा ५ पर्याय

नवरात्रीसाठी यंदा खरेदी करा आकर्षक - सुंदर घट, खिशाला परवडणाऱ्या किमतीत - बघा ५ पर्याय

Highlightsयंदा घटस्थापनेसाठी नवा कलश घेण्याचा विचार करत असाल, तर हे काही पर्याय तुम्हाला आवडू शकतात.

पितृपक्ष संपत आलं असून आता नवरात्र अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय. त्यामुळे सध्या घराघरातील महिला वर्गाची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. बाजारपेठाही नवरात्र स्पेशल (Navratri special shopping) वस्तूंनी भरून गेल्या आहेत. नवरात्रीच्या पुजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो कलश. म्हणजेच घटस्थापनेतील (ghat sthapana) घट. यंदा घटस्थापनेसाठी नवा कलश घेण्याचा विचार करत असाल, तर हे काही पर्याय तुम्हाला आवडू शकतात. सुंदर- आकर्षक घट आणि ते ही अगदी कमी किमतीत. 

 

कलशाचे विविध प्रकार..
१. नवरात्रीत घटस्थापना करताना कुणाकडे मातीचा कलश वापरण्याची प्रथा असते. त्यानुसार जर मातीचा कलश किंवा घट घेणार असाल, तर त्याचे अनेक सुंदर, डेकोरेटीव्ह पर्याय ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहेत. हा एक मातीचा घट त्यापैकीच एक. या घटाची किंमत २६० रुपये असून त्यावरचं काम आणि रंगसंगती खरोखरंच आकर्षक आहे. हा घट घेण्यासाठी किंवा यात उपलब्ध असणारे रंगांचे पर्याय बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Click to Buy    https://www.amazon.in/dp/B0BCMFQ3MQ

 

 

२. धातूचा कलश घेणार असाल तर पितळाच्या कलशामध्ये असे डेकोरेशन केलेले अनेक कलश यंदा बाजारात दिसत आहेत. प्लेन पितळी कलशापेक्षा असे नक्षीदार कलश नक्कीच अधिक सुरेख दिसतात. हा कलश आकाराने बराच मोठा आणि वजनदार असून याला ग्राहकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. ५४० रुपयांत हा कलश ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे. 
Click to Buy     https://www.amazon.in/dp/B07HW4KQ6Z

 

 

३. ब्रास प्रकारातलाच हा आणखी एक वेगळा कलश. यावर रंगाने काम केलेलं नसलं तरी आकर्षक कोरीव काम मात्र केलेलं आहे. त्यामुळे हा कलश आणि त्यावरची चमक निश्चितच सगळ्यांपेक्षा वेगळी वाटते. दिसायला अतिशय सुंदर असणारा हा कलश केवळ २६० रुपयांना उपलब्ध आहे. 
Click to Buy    https://bit.ly/3LoDKMq

 

 

४. अनेकांना चांदीचा कलश ठेवण्याची इच्छा असते. पण चांदीचे चढे भाव पाहता ते काही सगळ्यांनाच परवडण्यासारखे नाही. म्हणून त्याऐवजी तुम्ही या व्हाईट मेटलचा विचार करू शकता. हा कलश महागडा आहे, पण चांदीच्या तुलनेत स्वस्तच म्हणावा असा आहे. ७०० ते ८०० रुपयांदरम्यान हा कलश ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे. 
Click to Buy     https://bit.ly/3qKCxWx

 

Web Title: Navratri Special Shopping: Attractive kalash or ghat for Ghatsthapna in Navratri at low price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.