नवीन वर्ष सुरू होत आहे आणि २०२४ला टाटा करायची वेळ जवळ आली आहे. नवीन वर्षाची सुरुवात छान हसत मुखाने आपल्या प्रिया व्यक्तींबरोबर व्हाव असं सर्वांनाच वाटतं. आपल्या जिवलगांना आपण प्रसंगी भेटवस्तू देऊन खुष करण्याच्या प्रयत्नात असतो. मात्र आता असं झालय की निमित्त जास्त आणि भेटवस्तूंची व्हरायटी कमी. प्रत्येक वेळी वेगळं काय द्यावं बरं? पण प्रत्येक प्रसंगी वेगवेगळ्या गोष्टीच द्याव्या समारंभाचं नाविन्य जपावं.२०२५ चं स्वागत करण्याच्या निमित्ताने नक्की काय भेटवस्तू द्याल?
१.पुस्तकतुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना वाचायची आवड असेल तर पुस्तक वाचत नववर्षाची सुरवात करायला त्यांना नक्कीच आवडेल. पुस्तक ही एक फार वैचारात्मक भेटवस्तू आहे.
२.कस्टमाईज गिफ्ट्सखास बनवून घेतलेले असं गिफ्ट नक्कीच सगळ्यांना आवडेल. नाव कोरलेली पर्स, फोटोफ्रेम, ब्रेसलेट अशा गोष्टी खास आपल्या आवडीनूसार बनवून घेता येतात. असं गिफ्ट आठवण म्हणून आयुष्यभर आपल्याकडे राहतं.
३.घड्याळघड्याळ देणं लग्जरीयस गिफ्ट मानलं जातं. बाजारात स्वस्त आणि महाग अशी दोन्ही प्रकारची घड्याळे मिळतात. आपण आपल्या आवडीप्रमाणे घड्याळ घेऊ शकतो.मॉडर्न फिचर्स असलेली घड्याळे सगळ्यांनाच आवडतात.
४.परफ्यूमवर्षानुवर्षे ट्रेंडमध्ये टिकून राहीलेली भेटवस्तू म्हणजे परफ्यूम. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक परफ्यूम बाजारात आणि ऑनलाईन साईटवर मिळतात. आवडीनुसार विविध वासांचे परफ्यूम बाजारात मिळतात.
५.गॅडजेटस व अॅक्सेसरीजआताच्या आधुनिक जमान्यात भेटवस्तूसुद्धा आधुनिक दिल्या जातात. ब्लूटूथ स्पीकर्स ते ब्लूटूथ हेडफोन्स किंवा इतर अनेकविध गॅडजेटस बाजारात मिळतात. आयुष्य सोयीस्कर बनवणाऱ्या अशा गोष्टी नक्कीच उत्तम भेटवस्तू आहेत.
६.घर सजावटीचे सामान आजकाल घर सुशोभित करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या वस्तु उपलब्ध आहेत. विविध लॅम्पस्, कलात्मक नमुने आदी. घराची शोभा वाढवणारी वस्तू नक्कीच सगळ्यांना आवडते.
७.स्किनकेअर किटसध्या स्किनकेअर रूटीन लोक खुप फॉलो करतात. विविध प्रकारचे किट मिळतात. ते आपण नक्कीच भेट म्हणून देऊ शकतो.
८.फुडहॅम्परतुमच्या आयुष्यातल्या गोड व्यक्तींना गोड पदार्थ दया. कधीही कोणालाही असं गिफ्ट आवडतंच.
९. जॅकेट स्वेटशर्टस थंडीच्या दिवसांत स्वेटशर्टस घालायला लोकांना फार आवडते. तसेच जॅकेट लव्हर सुद्धा बरेच आहेत. हे गिफ्ट मित्रांना भावंडांना नक्की आवडेल.
१०.गिफ्टकार्डअगदी काहीच द्यायला सुचत नाही आहे किंवा काहीच पटत नाही आहे तर सरळ सोपा मार्ग म्हणजे छानस गिफ्टकार्ड. चांगल्या लेखासह नववर्षाच्या शुभेच्छा द्या.