Lokmat Sakhi >Shopping > Union budget 2022..आता कपडे होणार स्वस्त! शॉपिंगप्रेमी महिलांसाठी आनंदाची बातमी, बजेटची कृपा

Union budget 2022..आता कपडे होणार स्वस्त! शॉपिंगप्रेमी महिलांसाठी आनंदाची बातमी, बजेटची कृपा

नव्या वर्षात कपडे महाग होणार अशी चर्चा होती, प्रत्यक्षात कपडे स्वस्त होण्याचीच शक्यता आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2022 05:55 PM2022-02-01T17:55:44+5:302022-02-01T18:00:40+5:30

नव्या वर्षात कपडे महाग होणार अशी चर्चा होती, प्रत्यक्षात कपडे स्वस्त होण्याचीच शक्यता आहे!

..Now clothes will be cheaper now! Good news for shopping loving ladies, thanks to the budget | Union budget 2022..आता कपडे होणार स्वस्त! शॉपिंगप्रेमी महिलांसाठी आनंदाची बातमी, बजेटची कृपा

Union budget 2022..आता कपडे होणार स्वस्त! शॉपिंगप्रेमी महिलांसाठी आनंदाची बातमी, बजेटची कृपा

Highlightsकपडे खरेदी करायची असेल तर आताचा काळ एकदम चांगलाकपड्यांच्या किंमती जास्त नाही तर कमी होणार...

गेले काही दिवस सतत चर्चा होती की नव्या वर्षात कपडे महागणार, त्यावरचा जीएसटी वाढणार. अनेकींनी तर त्या भीतीपोटी भरपूर कपडे खरेदीही केले. काहींनी केवळ हळहळ व्यक्त केली. मात्र बजेट २०२२ मध्ये निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी तमाम कपडेप्रेमी आणि फॅशनप्रेमींना दिलासा दिला आहे. येत्या वर्षांत कपडे महाग होणं तर सोडाच स्वस्त होणार आहेत. महिलांसाठी आनंदाची बातमी म्हणजे कपडे, दागिने, सौंदर्यप्रसाधने आणि हिरे, रत्नही स्वस्त होणार आहे. खरेदी करायची हुक्की आली असेल तर हा उत्तम काळ आहे. 

(Image : Google)
(Image : Google)

आताच्या बजेटनंतर महिला काही प्रमाणात खूश होऊ शकतात. कारण घरगुती क्षेत्रातील लोकांना लाभ मिळावा यासाठी कापड आणि चामड्याच्या वस्तूही (Prices of cloths and leather) स्वस्त होणार आहेत.  सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरांमध्ये कपडे आणि लेदरच्या बॅग, वॉलेट, चपला या गोष्टी मिळू शकणार आहेत. मात्र कपडे स्वस्त होणार ही जास्त दिलासादायक बातमी.  हल्ली तर ऑनलाईन शॉपिंगमुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडल्याचे पाहायला मिळते. बाजारात एखादी फॅशन आली की त्या फॅशनचे कपडे आपल्याकडे असायलाच हवेत असे वाटणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे कपड्यांच्या किंमती कमी झाल्यास कपडे खरेदीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. केवळ स्वत:साठीच नाही तर आपल्या कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्रमंडळींना भेट म्हणून देण्यासाठीही कपडे मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. त्यामुळे ही खरेदी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

(Image : Google)
(Image : Google)

कपड्यांमध्ये अंतर्वस्त्रे, रोजच्या वापराचे कपडे, घरात वापरण्याचे, व्यायामाचे, बाहेर चांगल्या कार्यक्रमाला घालण्याचे भरजरी कपडे, ऑफीस वेअर, पार्टी वेअर, फिरायला जाताना लागणारे असे एक ना अनेक कपडे असतात. महिलावर्ग याची अगदी मनसोक्त खरेदी करताना दिसतात. महिलांची खरेदीची मानसिकता लक्षात घेऊन विक्रेतेही आपल्याकडील मालाची विक्री व्हावी यासाठी विविध मार्केटींग पद्धती वापरताना दिसतात. हे सगळे खरे असले तरी नेमका कपड्यांच्या किमतीत नेमका किती फरक पडणार हे विस्तारीत अर्थसंकल्पातच समजेल. मात्र तोपर्यंत आजचा आनंद साजरा करायला हरकत नाही.

Web Title: ..Now clothes will be cheaper now! Good news for shopping loving ladies, thanks to the budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.