Lokmat Sakhi >Shopping > ऑफिस वेअर साड्या, या ४ प्रकारच्या साड्या निवडा! कर्म्फटेबल फॉर्मल लूक मिळवा सहज

ऑफिस वेअर साड्या, या ४ प्रकारच्या साड्या निवडा! कर्म्फटेबल फॉर्मल लूक मिळवा सहज

Saree selection for office ऑफिससाठी साडी नेसायची म्हणजे बरीच काळजी घ्यावी लागते. कारण ऑफिसमध्ये साडी नेसतो आहोत म्हटल्यावर आपल्याला ऑफिसचा फॉर्मल लूक (formal look in saree) सांभाळता आला पाहिजे. म्हणूनच साड्यांची निवड जर योग्य झाली तर हे टेन्शन थोडं कमी होऊ शकतं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 06:26 PM2021-11-25T18:26:57+5:302021-11-25T18:31:46+5:30

Saree selection for office ऑफिससाठी साडी नेसायची म्हणजे बरीच काळजी घ्यावी लागते. कारण ऑफिसमध्ये साडी नेसतो आहोत म्हटल्यावर आपल्याला ऑफिसचा फॉर्मल लूक (formal look in saree) सांभाळता आला पाहिजे. म्हणूनच साड्यांची निवड जर योग्य झाली तर हे टेन्शन थोडं कमी होऊ शकतं...

Office wear saree, these types of sarees will give you formal look in office | ऑफिस वेअर साड्या, या ४ प्रकारच्या साड्या निवडा! कर्म्फटेबल फॉर्मल लूक मिळवा सहज

ऑफिस वेअर साड्या, या ४ प्रकारच्या साड्या निवडा! कर्म्फटेबल फॉर्मल लूक मिळवा सहज

Highlightsफाॅर्मल लूकच्या साडीची निवड कशी करावी, कोणत्या प्रकारची साडी नेसल्यामुळे कसा लूक येतो, याचा थोडा अंदाज आला तर साडीची खरेदी आणि निवड योग्य पद्धतीने करता येते. 

महिलांचं साडी प्रेम (saree love)याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे. साडी कॅरी करणं, खूप जणींना कठीण जातं खरं... पण तरीही साडी नेसण्याचा मोह सुटत नाही. आजकाल तर ऑफिसमध्येही अनेक जणी आवडीने साडी नेसून जात आहेत. इतर कोणत्याही वेशभुषेपेक्षा साडी नेसल्यावर ऑफिसमध्ये जास्त फॉर्मल लूक येतो, असं आता अनेक जणींचं मत होत आहे. पण ऑफिसमध्ये नेसण्यासाठी फाॅर्मल लूकच्या साडीची (saree in office) निवड कशी करावी, कोणत्या प्रकारची साडी नेसल्यामुळे कसा लूक येतो, याचा थोडा अंदाज आला तर साडीची खरेदी (saree shopping)आणि निवड योग्य पद्धतीने करता येते. 

 

ऑफिसमध्ये नेसण्यासाठी या साड्या आहेत योग्य..
१. कॉटन साडी
cotton saree

फॉर्मल लूक मिळवून देण्यात कॉटन साडीचा हात कुणीच पकडू शकत नाही. या साडीमुळे अतिशय सोबर लूक मिळतो. शिवाय या साडीचं वैशिष्ट्य म्हणजे या साडीवर तुम्ही स्लिव्हलेस, थ्री फाेर्थ, कोपऱ्यापर्यंत, बोट नेक असं कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज घातलं तरी साडीचा फॉर्मल लूक काही कमी होत नाही. त्यामुळे ही साडी ऑफिससाठी एक उत्तम निवड ठरू शकते.

 

२. हॅण्डलूम साडी
handloom saree

पाने- फुले, झाडं, वारली डिझाईन अशा प्रकारची रचना आणि सोबर रंगसंगती असणाऱ्या हॅण्डलूमच्या साडी ऑफिससाठी चांगल्या वाटतात. या साड्यांचे रंग मुळातच फार ग्लॉसी आणि भडक नसतात. त्यामुळे या साड्या ऑफिस कल्चरला अतिशय सूट होणाऱ्या आहेत. शिवाय या साडीवर एखादी बारीक मोत्याची, स्टोनची एकपदरी सर गळ्यात घातली, तरी तुम्ही छान दिसू शकता. 

 

३. लिनन साडी
linen saree

लिनन साडी हा प्रकार सध्या झपाट्याने लोकप्रिय होत आहे. या साड्या अंगावर अतिशय छान दिसतात. या साड्यांचा प्रकार थोडाफार कॉटनकडे झुकणारा असतो. शिवाय वजनाने देखील या साड्या खूपच कमी असतात. त्यामुळे लिनन साडी नेसून ऑफिसची धावपळ सहज करता येते. दिवसभर अंगावर राहिली तरी या साडीचे ओझे जाणवत नाही. शिवाय या साड्यांवर खूप काही वर्क किंवा डिझाईन नसते. उभ्या- आडव्या रेषा किंवा प्लेन साडी या प्रकारात ही साडी येत असल्याने आपोआपच तिला फॉर्मल लूक मिळतो. 

 

४. रॉ सिल्क साडी
raw silk saree

दिसायला आकर्षक आणि सगळ्यात कमी मेंटेनन्स अशा प्रकारातली रॉ सिल्क साडी ऑफिससाठी अतिशय चांगली ठरू शकते. दक्षिण भारतात अनेक वर्किंग वुमन रॉ सिल्क साडी नेसण्यालाच प्राधान्य देतात. या साडीवर बहुतेक वेळा उभ्या, आडव्या रेषाच असतात. त्यामुळे आपोआपच या साडीतून फॉर्मल लूक मिळतो. शिवाय ही साडी वजनाला अतिशय हलकी असून नेसायला सोपी असते. त्यामुळे दिवसभर या साडीत रहावे लागले तरी त्रास होत नाही. या साडीचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे या साडीला वारंवार इस्त्री करावी लागत नाही. 

 

Web Title: Office wear saree, these types of sarees will give you formal look in office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.