Join us  

अरे देवा, महाराजा भोग थाळी खायची म्हणून खर्च केले ९ लाख रुपये... ताईंचे चुकले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2022 12:59 PM

Online Scam: ऑनलाईन खरेदी करताना असा थोडा जरी निष्काळजीपणा केला तरी तो चांगलाच अंगलट येऊ शकतो. बघा नेमकं कसं झालं हे प्रकरण.

ठळक मुद्देऑनलाईन आर्थिक फसवणूक जेव्हा केव्हा होते, तेव्हा त्यासाठी व्यवहार करणाऱ्या व्यक्तीचा गाफिलपणा हे सगळ्यात मोठे कारण असते.

सध्या दिवाळीमुळे बऱ्याच जणांचा कल ऑनलाईन खरेदीकडे (Online Shopping) आहे. याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे घराबाहेर पडण्याची गरज नाही. घरबसल्या भरपूर व्हरायटी तर पहायला मिळतेच, पण शिवाय प्रत्येक खरेदीवर घसघशीत सवलतीही मिळतात. त्यामुळे मग साहजिकच अगदी किराणा सामानापासून ते महागड्या इलेक्ट्रिक वस्तूंपर्यंत ऑनलाईन खरेदी केली जाते. अशाच सवलतींचा मोह या एका महिलेलाही झाला आणि अवघ्या २०० रुपयांच्या सवलतीसाठी ती ८ लाख ४६ हजार रुपये गमावून बसली (Online Scam, Woman duped of Rs. 8,46,000). बघा नेमकं कसं झालं हे प्रकरण.

 

त्याचं असं झालं की ऑनलाईन शॉपिंग करत असताना एका महिलेला एक ऑनलाईन जाहिरात दिसली. फेसबूकवरील या जाहिरातीनुसार २०० रुपयांची महाराजा भोग थाळी खरेदी केल्यास आणखी एक थाळी मोफत मिळणार होती.

स्क्रब, फेशियलला वेळ नाही? दिवाळीत मेकअप करण्याआधी फक्त हा होममेड स्क्रब लावा, त्वचा होईल सुंदर

या मोफत थाळीचा मोह त्या ताईंना झाला. त्यांनी ती लिंक क्लिक केली. त्यानंतर तिथून त्या आणखी दुसऱ्या विंडोवर गेल्या आणि तिथे त्यांचा मोबाईल नंबर, अकाऊंट नंबर आणि बँकेच्या खात्याचा इतर काही तपशील मागविण्यात आला. त्यानंतर एका मागे एक ट्रॅन्झॅक्शन होत गेले आणि सरतेशेवटी थाळी तर काही मिळालीच नाही, पण त्यांच्या खात्यातून तब्बल ८ लाख ४६ हजार रुपये भामट्यांनी लाटले. 

 

नेमकी चूक झाली कुठे?- ऑनलाईन आर्थिक फसवणूक जेव्हा केव्हा होते, तेव्हा त्यासाठी व्यवहार करणाऱ्या व्यक्तीचा गाफिलपणा हे सगळ्यात मोठे कारण असते.- त्या भामट्यांनी या बाईंना डेबिट कार्डच्या डिटेल्स मागितल्या तसेच काही ओटीपी मागितले. या दोन्ही गोष्टी कधीही कुणाला सांगू नयेत.

दिवाळीची साफसफाई करायची, खिडक्या पुसायच्या म्हणून बाई पाहा कुठं पोहचल्या.. व्हिडिओ व्हायरल- दुसरे म्हणजे चोरट्यांनी त्या बाईंकडून त्यांच्या मोबाईलचा रिमोट ॲक्सेस मिळवला. त्यामुळे त्यांच्यासाठी अनेक गोष्टी सोप्या झाल्या. त्यामुळे माहिती शेअर करताना आपण नेमकं काय शेअर करतो आहाेत, हे २- ३ वेळा व्यवस्थित वाचा. त्याचा काय परिणाम होईल, हे तपासा. आणि त्यानंतरच काय तो निर्णय घ्या. 

 

टॅग्स :खरेदीऑनलाइन