Join us  

रोज वापरण्यासाठी सुंदर आणि स्वस्त चहाचे कप घ्यायचेत? बघा ३ पर्याय - चहा पिण्याचं वाढेल सुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2023 3:30 PM

Online Shopping For Daily Use Tea Cup Or Coffee Mug: चहाचे कप खरेदी करायचे असतील तर हे काही वेगळे डिझाईन्स पाहून घ्या... बघा कितीतरी वेगवेगळे पर्याय इथे उपलब्ध आहेत. (Tea cups at very affordable price)

ठळक मुद्देवेगळ्या प्रकारचे कप शोधत असाल तर हे काही ऑनलाईन पर्याय तुम्हाला नक्कीच आवडू शकतात.

चहा- कॉफी पिण्याचे कप ही अगदी प्रत्येक घरातली रोजच्या वापरातली वस्तू. त्यामुळे रोजच्या वापरामुळे ते लवकर खराब  होतात. बऱ्याचदा एखादा कप फुटला किंवा एखाद्या कपाचा कान जरी तुटला तरी तो पुर्ण सेटच वाया जातो. मग लगेच नव्या कपांची खरेदी करावी लागते. कारण घरातली ही वस्तूच अशी आहे की ती पुरेशा प्रमाणात घरात ठेवावीच लागते. बऱ्याचदा आपल्याला कपचं तेच ते डिझाईन पाहून कंटाळा येतो (Online shopping for daily use tea cup or coffee mug). काहीतरी वेगळं डिझाईन किंवा आकार पाहिजे असतो (unique designs and shape for tea cup or coffee mug) . म्हणूनच अशा वेगळ्या प्रकारचे कप शोधत असाल तर हे काही ऑनलाईन पर्याय तुम्हाला नक्कीच आवडू शकतात. (Tea cups at very affordable price)

 

१. स्टीलचे कप आवडत असतील तर त्यातले हे एक छान डिझाईन पाहा. कपांवर फुलाफुलांचं सुंदर वर्क करण्यात आलं आहे. त्यामुळे स्टीलच्या इतर कपांपेक्षा ते नक्कीच वेगळे दिसतात.

ख्रिसमससाठी परफेक्ट केक करायचा तर लक्षात ठेवा ५ गोष्टी- केक कधीच बिघडणार नाही

शिवाय हे कप चांगले टिकाऊ असतात. २७० रुपयांना हे ६ कप मिळत आहेत. याच्यात अनेक डिझाईन्सही उपलब्ध आहेत. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CNTPJMJ2

 

 

२. चिनी मातीचे किंवा स्टीलचे कप अनेक घरांमध्ये असतातच. आता त्या दोन्ही प्रकारांपेक्षा एकदम वेगळे असणारे हेCrystal Clear कप चांगलेच ट्रेण्डमध्ये आहेत.

हिवाळा असो की पावसाळा, सर्दी- खोकला होणारच नाही, प्या तुळशीचा चहा- ६ जबरदस्त फायदे

त्यांचा लूक अतिशय देखणा असून त्या स्वच्छ सुंदर कपांमध्ये चहा, कॉफी घेणं किंवा देणं अतिशय स्टायलिश वाटतं. या कपचे कानही अगदी वेगळे आहेत. २९९ रुपयांना ६ कप सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CPLXG8MG?th=1

 

 

३. कुल्हड चहा हा प्रकार सध्या खूप गाजतो आहे. हल्ली तर लोक आवडीने असा कुल्हड चहा प्यायला जातात.

नवरीने लग्नात घातला चक्क डेनिमचा लेहेंगा तर नवरदेवाने डेनिम कुर्ता- बघा ही भलतीच फॅशन

त्यामुळे अशा कुल्हडच्या आकारातल्या कपांनाही सध्या चांगलीच मागणी आहे. फक्त हे कुल्हड मातीचे नसून सिरॅमिकचे आहेत. असं काही वेगळं घरात आणलं तर नक्कीच ते छान वाटतं. २२९ रुपयांना ६ नग याप्रमाणे ते सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0CPQ1Z5TQ

 

टॅग्स :खरेदीऑनलाइन