Join us  

२००० रुपयांच्या आतही मिळतात हे देखणे डिझायनर घागरे, करा हौस बजेटफ्रेंडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 3:20 PM

Budget friendly shopping: लग्न सराईसाठी घागरा किंवा लेहेंगा चोली असं काही खरेदी करायचा विचार असेल तर सगळ्यात आधी हे काही पर्याय चेक करा... डिझायनर (Designer lehenga) लूक असलेला बजेट फ्रेंडली घागरा तुम्हाला नक्कीच मिळेल.

ठळक मुद्दे थोडी काळजी घेऊन घागऱ्याची ऑनलाईन खरेदी केली, तर ते नक्की परवडेबल ठरू शकतं..

तुळशीच्या लग्नापासून सुरु झालेली लग्नसराई थेट फेब्रुवारी- मार्चपर्यंत चालते.. मोठं कुटूंब, खूप मित्रमंडळी असतील तर सहसा एका लग्न सराईत एखादं लग्न तर ठरलेलंच असतं. आता लग्न म्हटलं की पुर्वी साड्यांचीच खूप खरेदी केली जायची. कारण लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमाला साड्याच नेसल्या जायच्या. आता मात्र ट्रेंड बदलला आहे. साडी सोबतच कधी लेहेंगा (lehenga shopping), कधी वेस्टर्न गाऊन असं ही घातलं जातं. म्हणूनच तर सध्या घागरा, लेहेंगा हे कपड्यांचे प्रकार खूपच ट्रेंडिंग आहेत. 

 

घागरा, लेहेंगा हे सगळे प्रकार अगदी हजार- दोन हजार रूपयांपासून ते २०- २५ हजार आणि त्यापेक्षाही जास्त किमतीत उपलब्ध असतात. पण यासाठी एवढे पैसे खर्च करण्याची आपली तयारी नसते. कारण असे कपडे काही आपण वारंवार घालत नाही आणि प्रत्येक लग्न समारंभात आपण ते रिपिटही करत नाही. त्यामुळे ते फार- फार तर दोन- तीन वेळा घातले जातात आणि नंतर कपाटाचं धन म्हणून राहतात. म्हणूनच जर हजार- दिड हजार रूपये यादरम्यान लेहेंगा, घागरा मिळाला तर सगळ्यात उत्तम. तुम्हीही अशाच पद्धतीच्या कपड्यांच्या शोधात असाल, तर सरळ या काही ऑनलाईन साईट्स (online shopping) चेक करा. कारण असे कपडे तुम्ही लोकल मार्केटमध्ये प्रत्यक्ष घ्यायला गेलात तर कमी किमतीत त्यांच्याकडे खूपच कमी व्हराईटी उपलब्ध असतात. शिवाय त्या आपल्याला आवडतीलंच असंही नाही. त्यामुळे थोडी काळजी घेऊन घागऱ्याची ऑनलाईन खरेदी केली, तर ते नक्की परवडेबल ठरू शकतं..

 

१. ऑनलाईन शॉपिंग साईटवर १८९९ रूपयांत हा घागरा उपलब्ध आहे. नेव्ही ब्लू ॲण्ड पिंक असं कॉम्बिनेशन असणारा हा घागरा खूपच कॅची आहे. याच्या स्लिव्हलेस ब्लाऊजवर मिररवर्क असून लेहेंग्यावर झिकझॅक प्रकारची डिझाईन आहे. घागऱ्याची ओढणी गुलाबी रंगाची असून सिल्कची आहे. ट्रेंडी विथ ट्रॅडिशन असा लूक करायचा असेल तर हा लेहेंगा बेस्ट आहे...

https://www.myntra.com/lehenga-choli/ladusaa/ladusaa-navy-blue--pink-embellished-mirror-work-semi-stitched-lehenga--ready-to-wear-blouse-with-dupatta/14896852/buy

 

 

२. थोडासा हटके लूक देणारा किंवा वेस्टर्न लूक असणारा लेहेंगा पाहिजे असेल तर हा एक पर्याय नक्की चेक करा.. १७४९ रूपयांमध्ये हा लेहेंगा ऑनलाईन उपलब्ध आहे. लेहेंग्याचं ब्लाऊज स्लिव्हलेस असून त्यावर सिक्विन आर्ट आहे. तर लेहेंग्याचं कापड हे पुर्णपणे नेटचं असून त्याला तीन ते चार फ्रिल आहेत. रिसेप्शन, संगीत अशा कार्यक्रमांना घालायला हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. 

https://www.myntra.com/lehenga-choli/redround/redround-purple-semi-stitched-lehenga--unstitched-blouse-with-dupatta/14064968/buy

 

 

३. हेवी वर्क आणि रिच लूक देणारा हा लेहेंगा केवळ १०९९ रूपयांत ऑनलाईन उपलब्ध आहे. लेहेंग्याची बॉर्डर अतिशय हेवी वर्क असणारी आहे. शिवाय पुर्ण लेहेंग्यावरच खूपच छान काम करण्यात आलं आहे. बुटी प्रिंट असणारं ब्लाऊज थ्री- फोर्थ स्लिव्ह्ज असणारं आहे आणि त्यावर फ्रिल लावून वेगळा लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ओढणी देखील अतिशय देखणी आहे. स्वस्तात मस्त असं काही घ्यायचं असेल, तर एकदा हा घागरा बघाच...

https://www.amazon.in/PURVAJA-Jacquard-Semi-Stitched-Lehenga-Multi-Rivaaz_Multi_Free/dp/B08H2BVDHV/ref=sr_1_16?crid=UIVCN9AZ1GEA&keywords=lehenga+for+women+latest+design+2021&qid=1639559062&sprefix=lehe%2Caps%2C314&sr=8-16

 

ऑनलाईन घागरा खरेदी करताना काळजी घ्या...6 rules for online lehenga shopping- सेमीस्टीच (semi stitch) की फुल स्टीच यापैकी कसा घागरा घ्यायचा आहे ते ठरवून घ्या.- लेहेंग्याचं ब्लाऊज जर पुर्णपणे शिवलेलं घेणार असाल तर तुमचं माप तुम्हाला पक्क ठाऊक हवं. कारण ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित असेल तरच लेहेंगा घालण्यात अर्थ आहे.- लेहेंग्याची लांबीही एकदा नीट तपासून पहा.- चार आणि त्यापेक्षा अधिक स्टार असणारेच घागरे घ्या. किंमत कमी आहे म्हणून केवळ चार पेक्षा कमी स्टार असणारे घागरे घेणं टाळा.

काठापदराच्या भरजरी साड्या ऑनलाईन स्वस्तात मस्त; पाहा पर्याय, खरेदी करताना विसरू नका ४ नियम

-  रिव्ह्यूज न वाचता कधीच घागरा घेऊ नका.. कमीतकमी १५ ते २० रिव्ह्यूज वाचूनच घागरा घ्यायचा की नाही ते ठरवा.- ज्या ग्राहकांनी या आधी घागरा खरेदी केलेला आहे, त्यांनी त्यांच्या घागऱ्याचे फोटो साईटवर अपलोड केलेले असतात. ते फोटो नीट काळजीपुर्वक बघा. त्यामुळेच घागऱ्याचा खरा रंग कसा आहे, याचा अंदाज येतो आणि खरेदी करणे सोपे जाते.- ज्या घागऱ्यांना रिटर्न पॉलिसी आहे, त्यांचीच खरेदी करा. 

कतरिनाच्या स्टायलिश- महागड्या मंगळसूत्राची चर्चा; डिझायनर मंगळसूत्राचाच नवा स्मार्ट ट्रेंड- बघा कोणते सगळ्यात भारी

 

 

टॅग्स :खरेदीऑनलाइनफॅशन