Lokmat Sakhi >Shopping > यंदाच्या दसऱ्याला करा ‘आपट्याच्या पानाचा’ सुंदर-सुबक दागिना, सोनं म्हणून लूटा- नवा खास ट्रेण्ड

यंदाच्या दसऱ्याला करा ‘आपट्याच्या पानाचा’ सुंदर-सुबक दागिना, सोनं म्हणून लूटा- नवा खास ट्रेण्ड

Online Shopping Of Aptyachi Pane: आता चक्क आपट्याची पानं ऑनलाईन मिळायला लागली आहेत. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्यायचं असेल तर हा पर्याय बघाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2023 02:02 PM2023-10-21T14:02:53+5:302023-10-21T14:06:08+5:30

Online Shopping Of Aptyachi Pane: आता चक्क आपट्याची पानं ऑनलाईन मिळायला लागली आहेत. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं घ्यायचं असेल तर हा पर्याय बघाच...

Online shopping of Aptyachi Pane for Dasara Festival | यंदाच्या दसऱ्याला करा ‘आपट्याच्या पानाचा’ सुंदर-सुबक दागिना, सोनं म्हणून लूटा- नवा खास ट्रेण्ड

यंदाच्या दसऱ्याला करा ‘आपट्याच्या पानाचा’ सुंदर-सुबक दागिना, सोनं म्हणून लूटा- नवा खास ट्रेण्ड

Highlightsसोन्याचांदीचा मुलामा असणारी पानं महाग असतात. त्याच्याऐवजी या पानांचा विचार नक्कीच करता येईल.

दसऱ्याचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणजे आपट्याची पानं लुटण्याची परंपरा आपल्याकडे आहे. या आपट्याच्या पानांना या दिवशी अनन्य साधारण महत्त्व आहे. आपट्याची पानं आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना द्यायची आणि त्यांचा आर्शिवाद घ्यायचा, अशी आपली प्रथा. अलिकडच्या काळात सोन्याचा किंवा चांदीचा मुलामा असणारी आपट्याची पानंही सोनाराच्या दुकानात मिळत आहेत. आता मात्र त्याच्याही पुढे पाऊल गेलं असून ऑनलाईन शॉपिंग साईटवर आपट्याची पानं मिळायला लागली आहेत.(Online Shopping Of Aptyachi Pane)

 

या आपट्याच्या पानांवर तांब्याचा- पितळाचा मुलामा असून त्यावर सुबक कोरीवकाम केलेलं आहे. आपण परंपरेनुसार झाडाची जी खरीखुरी पानं देतो, ती तर देऊ शकतोच, पण त्याच्यासोबत आपल्या जवळच्या नातलगांना आपण अशी पानं देण्याचाही  विचार करू शकतो. कारण एकदा दिलेलं हे पान पुढे कित्येक वर्षे त्यांच्यासोबत राहील. बऱ्याचदा आपट्याची पानं झाडावरून ओरबडल्यामुळे झाडाचे नुकसान होते, असे पर्यावरणप्रेमी नेहमीच  म्हणतात.

 

अशी पर्यावरणाची हानी नको असेल तर या विकत मिळणाऱ्या आपट्याच्या पानांचा नक्कीच विचार करता येईल. ५ पानांचा सेट ४१२ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.

नवरात्रीत हळदी- कुंकू, कुमारिका पुजनाला येणाऱ्यांना काय फराळ द्यायचा? बघा झटपट देता येतील असे ५ पदार्थ

प्रत्येक पान ठेवायला एक सुंदर डबीदेखील त्याच्यासोबत मिळते आहे. सोन्याचांदीचा मुलामा असणारी पानं महाग असतात. त्याच्याऐवजी या पानांचा विचार नक्कीच करता येईल. या पानांची खरेदी करायची असल्यास किंवा त्याबद्दल आणखी माहिती हवी असल्यास पुढील लिंकवर क्लिक करा.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B0CK8778BB
 

Web Title: Online shopping of Aptyachi Pane for Dasara Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.