Join us  

ऑनलाइन खरेदीचे पार्सल फोडताना करा व्हिडीओ रेकाॅर्डिंग; नाही तर मागवले मोती मिळाले दगड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2021 4:23 PM

खरेदी म्हटली की फसवणूक आलीच. मग ऑनलाइन खरेदीही ( Online Shopping) त्याला अपवाद नाही. ऑनलाइन खरेदी सोपी वाटत असली तरी येथील फसवणुकीचे प्रकार बघता या खरेदीच्या जगात बोटांना जपून क्लिक करण्याची सवय लावणं जितकं गरजेचं आहे तितकंच ऑनलाइन खरेदीचं पार्सल घरी आल्यानंतर ते उघडताना काळजी घेणं आवश्यक आहे.

ठळक मुद्देकाहीवेळा साइटसवर वस्तूंचे आकर्षक फोटो असतात. प्रत्यक्षात पार्सलमध्ये हलक्या दर्जाच्या वस्तू असतात. पार्सल फोडताना व्हिडीओ आवश्य करावा,त्यामुळे पुराव्यानिशी तक्रार करता येते.ऑनलाइन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर सेलकडे तक्रार करावी.

दिवाळीत  भरमसाठ खरेदी करावी लागते. घरातल्या छोट छोटया वस्तूंपासून इतरांना द्यायला लागणाऱ्या गिफ्टपर्यंत अनेक गोष्टींची खरेदी करावी लागते. ऑनलाइन खरेदीचा (online shopping)  ट्रेण्ड सेट होण्यापूर्वी खरेदीसाठी दुकानं शोधत फिरणं हे मोठं थकवणारं काम होतं. पण ऑनलाइन खरेदीमुळे एका बाजूने घर आवरता आवरता, फराळ बनवता बनवता वस्तूंचा ऑनलाइन शोध घेणं, त्या ऑर्डर करणं खूपच सोपं झालं आहे.  पण खरेदी म्हटली की फसवणूक आलीच. मग ऑनलाइन खरेदीही त्याला अपवाद नाही.

ऑनलाइन खरेदी सोपी वाटत असली तरी येथील फसवणुकीचे प्रकार बघता या खरेदीच्या जगात बोटांना जपून क्लिक करण्याची सवय लावणं जितकं गरजेचं आहे तितकंच ऑनलाइन खरेदीचं पार्सल घरी आल्यानंतर ते उघडताना काळजी घेणं आवश्यक आहे. सायबर भामटे ऑफरच्या नावाखाली बनावट लिंक, क्यूआरकोड स्कॅन करायला लावून बँक खाते रिकामे करू शकतात. त्यामुळे ऑनलाइन मागवलेले पार्सल उघडताना देखील व्हिडीओ रेकॉर्डिंग करून आपली फसगत टाळणंही आवश्यक आहे,अलीकडे ब्रँडेड वस्तू खरेदीसाठी नागरिक ऑनलाइन साइटसचा पर्याय अवलंबतात. घरबसल्या वस्तू मिळत असल्यानं याला नागरिकांची पसंती असते. शिवाय दिवाळीत विविध कंपन्यांकडून ऑफर्सची रेलचेल असते. ऑफर्सची खात्री करूनच खरेदी करणे हिताचं ठरतं. 

Image: Google

पार्सलमधून फसवणूक

सायबर सेलकडे ऑनलाइन पार्सलमधून फसवणूक केल्याबाबतच्या तक्रारी कमी आहेत. पण दिवाळीच्या काळात ऑनलाईन पार्सलद्वारे काही कंपन्यांकडूनदेखील फसवणूक होण्याची शक्यता असते. सायबर भामटेही गैरफायदा घेण्यासाठी टपलेले असतात. 

Image: Google

पार्सल फोडण्यापूर्वी..1. ऑनलाइन पार्सल मागविताना कंपनीच्या अधिकृत साइटसचा वापर करावा.2.  पार्सल उघडताना व्हिडीओ करावा, जेणेकरून फसवणूक झाल्यास तक्रार करणे सोपे होईल. सायबर सेलला तपासकामी हा महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.3.  काहीवेळा साइटसवर वस्तूंचे आकर्षक फोटो असतात. प्रत्यक्षात पार्सलमध्ये हलक्या दर्जाच्या वस्तू असतात. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन खरेदीसाठी अधिकृत साईटसला भेट द्यावी. पार्सल फोडताना व्हिडीओ आवश्य  करावा,त्यामुळे पुराव्यानिशी तक्रार करता येईल आणि तपासही सोपा होईल.- आर. एस. गायकवाड, पोलीस निरीक्षक सायबर सेल, बीड.

Image: Google

झालीच फसवणूक  तर..

ऑनलाइन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर सेलकडे तक्रार करावी. दरम्यान, सायबर भामटे या काळात सक्रीय होऊन बनावट लिंक, क्यूआर कोड पाठवून त्याआधारे फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :खरेदीऑनलाइन