Lokmat Sakhi >Shopping > फुलकारी, तात आणि घरचोला; साड्यांचे हे सुंदर पारंपरिक प्रकार तुम्ही पाहिले का?

फुलकारी, तात आणि घरचोला; साड्यांचे हे सुंदर पारंपरिक प्रकार तुम्ही पाहिले का?

‘व्होकल फॉर लोकल’ म्हणत निकायी फॅशन स्टुडियोच्या संचालक व फॅशन डिझायनर, मृण्मयी अवचट यांनी एक उपक्रम सुरु केला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 03:38 PM2021-10-14T15:38:01+5:302021-10-14T15:43:03+5:30

‘व्होकल फॉर लोकल’ म्हणत निकायी फॅशन स्टुडियोच्या संचालक व फॅशन डिझायनर, मृण्मयी अवचट यांनी एक उपक्रम सुरु केला आहे.

Phulkari, Tat and Gharchola; Have you seen these beautiful traditional types of sarees? | फुलकारी, तात आणि घरचोला; साड्यांचे हे सुंदर पारंपरिक प्रकार तुम्ही पाहिले का?

फुलकारी, तात आणि घरचोला; साड्यांचे हे सुंदर पारंपरिक प्रकार तुम्ही पाहिले का?

Highlights९ लुक्स, ९ सेलिब्रीटी, ९ वेगवेगळ्या पारंपरिक साड्या

साड्या, त्यातही पारंपरिक, हातमागावर विणलेल्या, कुणीतरी कारागिरीने हातानं बनवलेल्या फार सुंदर क्षण घेऊन येतात. त्या साड्यांना आपला पारंपरिक बाज असतो आणि नव्या काळातला आधुनिक देखणा लूकही. सणावराच्या खरेदीत आणि सोहळ्यात या साड्यांना स्थान देताना त्या विणकरांचीही आठवण ठेवली पाहिजे. कोरोनानंतर अर्थव्यवस्थेला सावरायला वेळ लागेल मात्र त्यांना तत्काल आणि सतत पाठिंब्याची गरज आहे. त्यासाठी आपण काय करु शकतो, असा विचार ‘व्होकल फॉर लोकल’ म्हणत निकायी फॅशन स्टुडियोच्या संचालक व फॅशन डिझायनर, मृण्मयी अवचट यांनी एक उपक्रम सुरु केला. हस्तकला उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व मोठ्या समाजघटकांपर्यंत ते पोहोचण्यासाठी सेलिब्रिटीसह त्या सहयोगी फोटोशूट करत आहेत.
२०२० हे एक कठीण वर्ष होते आणि २०२१ पण अवघड होत गेले. पारंपारिक हस्तकलेवर काम करणाऱ्या आपल्या कारागीरांसाठी तग धरुन राहणं याकाळात अवघड होतं.
हातमाग विणकर, हॅण्ड एम्ब्रॉयडरी कारागीर, हॅण्ड ब्लॉक प्रिंटर आणि इतर पारंपारिक कारागीरांना मदत करण्यासाठी हा त्यांनीउपक्रम हाती घेतला आहे. विणकर आणि कारागीर समुदायाला आधार देणारी उत्पादने लोकांनी खरेदी करावी म्हणून त्या प्रोत्साहन देत आहेत. नोव्हेंबर 2020 पासून हे काम सुरू आहे..
सेलिब्रिटी फोटोशूटसह एक खास उपक्रम मृण्मयी अवचट नवरात्रातही करत आहेत. नवरात्री स्पेशल ९ लुक्स, ९ सेलिब्रीटी, ९ वेगवेगळ्या पारंपरिक साड्या व त्यांच्या बद्दलची माहिती याद्वारे सर्वदूर पोहचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

नवरात्रीतल्या पहिल्या तीन दिवशी पैठणी, नारायण पेट, महेश्वरी या तीन साड्यांचं सेलिब्रेशन झाल्यावर चौथ्या दिवशी या उपक्रमात पंजाबी फुलकारी कलाकुसर सहभागी झाली.
नारंगी रंगाची शिफॉन फुलकारी नेसून एक सुंदर शूट अभिनेत्री पूजा सावंत हिने केले.
पंजाबची ही पारंपरिक कलाकुसर फेस्टिव्ह लूकला चार चांद लावते.

पाचव्या दिवशी पांढऱ्या रंगाचा उत्सव. 
तात साडी ही पारंपारिक बंगाली साडी आहे. भारतीय उपखंडातील गरम आणि दमट हवामानासाठी ही सर्वात आरामदायक साडी मानली जाते
'लाल पार 'अर्थात लाल काठ असलेली पांढरी साडी धार्मिक प्रसंगांसाठी राखीव असते.
पांढरा म्हणजे शुद्धता आणि लाल हे सौभाग्यतेचे प्रतीक आहे. अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने हे सुंदर फोटो शूट केले. 

सहावा दिवस आणि लाल रंग.  
हा दिवस साजरा करण्यासाठी अभिनेत्री सई रानडेने लाल घरचोळा बांधणी साडीत राजस्थानी लूक फोटोशूट केले.
घरचोला हे भारतातील गुजरात आणि राजस्थानमधील वधूवस्र मानले जाते
घर+चोला - 'घर' (घर) आणि 'चोला' (कपडे) या दोन शब्दांनी बनलेले - घर+चोला हा शब्द वधूने तिच्या नवीन घरी पदार्पण करताना
परिधान केलेल्या कपड्यांना म्हणतात.. .. म्हणजेच तिच्या लग्नाचा पोशाख ..
घरचोला साडी प्रथम ग्रिड म्हणजेच चेकस्पॅ टर्न तयार करण्यासाठी फॅब्रिक आणि झरी धाग्यांचा वापर करून विणली जाते, त्यामुळे एक सुंदर जरीची चेक साडी तयार होते. यामध्ये बांधणी बांधली जाते. अतिशय सुंदर अशी ही साडी.

Web Title: Phulkari, Tat and Gharchola; Have you seen these beautiful traditional types of sarees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.