Join us  

Online Shopping करताना खिसा रिकामा होतो? फक्त ४ गोष्टी करा; शॉपिंगही होईल आणि मोठी बचतही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 7:29 PM

सणासुदीचे दिवस म्हणजे खरेदीला उधाण. पण online shopping म्हणजे पैशाचा चुराडा, असं तुम्हाला वाटतंय का, असं वाटत असेल, तर या काही टिप्स नक्की फॉलो करा. बचतही होईल आणि यथेच्छ शॉपिंगही.

ठळक मुद्दे अगदी कमी पैशात ऑनलाईन शॉपिंग करता येते. त्यासाठी फक्त काही नियम पाळले पाहिजेत आणि काही गोष्टी स्मार्टली केल्या पाहिजेत. 

दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे घरोघरी खरेदीचा बहर आला असणार. दिवाळीला बहुतांश घरांमध्ये काही मोठी खरेदी केली जाते. किंवा मग अमूक एक गोष्ट दिवाळीला घेऊ, तमूक एक गोष्ट दिवाळीत करू असं महिलांनी खूप काही काही ठरवलेलं असतं. त्यामुळे मग वर्षभरात मनात साठवून ठेवलेल्या अनेक गोष्टी दिवाळीत आपल्या घरी येतात. अशाप्रकारे घरासाठी तर आपण काही काही घेतोच, पण मुलांसाठी कपडे, स्वत:साठी साड्या, घरातल्या प्रत्येकासाठी काहीना काही खरेदी केली जाते. 

 

बरं दिवाळीची खरेदी एवढ्यावरच संपत नाही. दिवाळीत बहिण, भाऊ, काका, मामा, मावशी, आई- वडील, मित्रमंडळी असं प्रत्येकासाठीच काहीतरी भेटवस्तू घेण्याचा विचार होतो. घर सजवणे हे दिवाळीचे मोठे काम. त्यामुळे अगदी फुरसतीने निवडून, बघून वेगवेगळ्या वस्तू घर सजविण्याच्या उद्देशाने घेतल्या जातात. यामध्ये अगदी पणत्या, आकाशदिवे यांच्यापासून ते सजावटीच्या अनेक महागड्या वस्तूंपर्यंत खरेदी केली जाते. आता एवढी सगळी शॉपिंग करायची म्हणजे भरपूर वेळ आणि पुरेसा पैसा हातात हवा. एकवेळ पैसा येतो, पण वेळ कसा काढणार, हा अनेकींसमोर पडलेला प्रश्न. यात जर ती महिला वर्किंग वुमन असेल, तर तिच्याकडची कामांची यादी तर आणखीनच मोठी असते.

 

अशावेळी मग बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ नसल्यामुळे आपण सरळ मोबाईल हातात घेतो आणि धडाधड ऑनलाईन शॉपिंग करू लागतो. अशावेळी अनेक वस्तू गरज नसतानाही घेतल्या जातात. मग पैशांचा चुराडा होतो आणि ऑनलाईन शॉपिंग काही कामाचं नाही, दुपटीने पैसा खर्च झाला, असं आपणच म्हणतो. यामुळे मग सणाचा, खरेदीचा, भेटवस्तूंचा असा सगळाच आनंद कचऱ्याच जातो. हे सगळं अगदी सहज टाळण्यासारखं आहे. अगदी कमी पैशात ऑनलाईन शॉपिंग करता येते. त्यासाठी फक्त काही नियम पाळले पाहिजेत आणि काही गोष्टी स्मार्टली केल्या पाहिजेत. 

 

ऑनलाईन शॉपिंग करताना फक्त हे ४ नियम पाळा१. वस्तूूंचे बजेट तयार ठेवाघरासाठी किंवा भेटवस्तू म्हणून जेव्हा तुम्ही काही वस्तू घ्यायची ठरवाल, तेव्हा सगळ्यात आधी त्या वस्तूसाठी तुमचे बजेट किती आहे, ते ठरवा. मग बजेट एकदा ठरले की ऑनलाईन शॉपिंगमध्ये असणारे फिल्टर शोधा आणि सगळ्यात आधी प्राईजचे फिल्टर लावून टाका. या फिल्टरच्या पलिकडे आपल्याला जायचे नाही, हे मनाला पक्के समजावून सांगता. असे केले की मग आपोआपच आपल्या बजेटमधली गोष्ट आपण निवडतो आणि पैसे वाचवू शकतो. 

 

२. इतर साईटवर किमती तपासून पहाऑनलाईन साईट पाहताना जेव्हा तुम्हाला एखादी वस्तू आवडते तेव्हा लगेच ती वस्तू घेण्याची घाई करू नका. ती वस्तू आवडली असेल तर निश्चितच तुमच्या कार्टमध्ये टाकून ठेवा, पण घेण्याची गडबड करू नका. ती वस्तू इतर ऑनलाईन शॉपिंग साईटवर टाका. तिथे ती वस्तू किती रूपयांत उपलब्ध आहे ते शोधा. दोन्ही ठिकाणच्या किमतीची तुलना करा आणि त्यानंतरच कुठून वस्तू खरेदी करायची ते ठरवा.

 

३. स्टार्स आणि रिव्ह्यूज महत्त्वाचेजेव्हा तुम्ही ऑनलाईन खरेदी करता, तेव्हा ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना कोणतीही गोष्ट स्टार्स आणि रिव्ह्यूज न पाहता घेऊ नये, हा नियम आधी ठरवून टाका. कारण शॉपिंग साईटवर असणारे फोटो फसवे असण्याची शक्यता असते. त्यामुळे तर सगळ्यात आधी त्या प्रॉडक्टला किती स्टार्स मिळाले आहेत ते आणि ते प्रॉडक्ट किती लोकांनी घेतलं आहे तपासा. जर ४ किंवा ४ पेक्षा जास्त स्टार्स मिळाले असतील, तरच ती वस्तू घ्या. ती वस्तू या आधी ज्यांनी घेतली होती, अशा अनेक लोकांनी ती वस्तू कशी आहे, याचे फोटो शॉपिंग साईटवर टाकलेले असतात. ते फोटो देखील तपासून बघा. जर तुम्हाला ते फोटो आवडले, तरच ती वस्तू घ्या. जेणेकरून मग वस्तू घरी आणल्यावर तुमचा हिरमोड होणार नाही.

 

४. ऑफर तपासून बघाऑनलाईन साईट बऱ्याचदा ऑनलाईन खरेदीवर खूप ऑफर देत असतात. त्यामुळे कोणत्या साईटवर काय ऑफर मिळते आहे, ते आधी व्यवस्थित तपासून बघा. अनेकदा काही ठराविक बँकांच्या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर खरेदी केल्यास वस्तूंच्या किमतीत सवलत मिळते. अशी सवलत असेल, तर त्याचा नक्कीच लाभ घ्या. ऑनलाईन शॉपिंग साईटवर प्राईस अलर्ट सेट करता येतो. जेव्हा वस्तूची किंमत कमी होते, तेव्हा तुम्हाला मेसेज येतो. अशी सेटींग तुम्हाला आवडलेल्या वस्तूवर करून ठेवा. फ्री डिलेव्हरीचा पर्याय निवडूनही प्रत्येक वस्तूच्या खरेदीवर तुम्ही थोडीतरी बचत करू शकता.  

 

टॅग्स :खरेदीऑनलाइनपैसा