किचनमधील काम सहजसोपी आणि पटकन होण्यासाठी आपण अनेक उपकरणांचा वापर करतो. ही वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं काहीवेळा फारच उपयोगी पडतात. अनेक छोटी - मोठी काम या उपकरणाच्या मदतीने अगदी सहज उरकता येतात. आपण किचनमध्ये दररोज वेगवेगळ्या प्रकारची फूड पॅकेट्स किंवा पॅकिंग (Portable Mini Food Sealing Machine) पिशव्या उडतो. कधी मसाल्यांची पाकीट तर कधी वेगवेगळ्या खाऊच्या पुड्या, कधी बिस्किटाचा पुडा तर कधी वेफर्सचे पाकीट. अशी ही अनेक प्रकाची पाकीट आपण उघडतो परंतु काहीवेळा त्यातील अर्धेच अन्नपदार्थ घेऊन उरलेले पाकीट आपण परत होते तसेच पॅकिंग करून ठेवू शकत नाही(Seal & Cuting All Kind Of Food Packaging By Using Mini Food Sealing Machine).
अशावेळी आपण रबर बँड किंवा स्टॅप्लरचा वापर करून ही पाकीट तात्पुरती बंद करुन ठेवतो. परंतु असे केल्याने काहीवेळा आतील उरलेले अन्नपदार्थ सादळून जातात किंवा खराब होतात. यामुळे एकदा उघडलेले पाकीट पुन्हा सीलबंद करण्यासाठी आपण एका खास छोट्याशा मशीनचा वापर करु शकतो. ही छोटीशी मशीन वापरून आपण एकदा उघडलेले (How To Use Mini Food Sealing Machine) अन्नपदार्थांचे पाकीट पुन्हा सीलबंद करु शकता.
फूड सिलिंग मशीन म्हणजे काय ?
फूड सिलिंग मशीन ही एक छोटीशी आपल्या हातात मावेल अशी मशीन आहे. या छोट्याशा उपकरणांचा वापर करून आपण एकदा उघडलेले फूड पॅकेट्स पुन्हा एकदा अगदी सहजपणे सीलबंद करु शकतो. किचनमधील बिस्किटच्या पुड्यापासून ते मसाल्यांच्या पाकिटांपर्यंत आपण सगळ्याच प्रकारचे फूड पॅकेट्स अगदी सहजपणे पुन्हा पॅकिंग करू शकतो. याचबरोबर, यात कटर देखील असते, ज्यामुळे आपण जसे कोणत्याही प्रकारचे पाकीट सीलबंद करु शकतो त्याचप्रमाणे कापू देखील शकतो.
हे मशीन आपल्या नेहमीच्या स्टॅप्लरच्या आकाराप्रमाणेच असते. यात वरच्या बाजूला दोन बटणं असतात. यातील एक बटणं दाबून आपण पाकीट सीलबंद करु शकतो तर दुसरे बटणं वापरुन पाकीट कापू शकतो. या मशीनच्या बरोबर मधोमध पाकीट ठेवून मग बटण दाबून त्यावरून ते मशीन आडवे फिरवावे, पाकीट लगेच सीलबंद होईल.
फूड सिलिंग मशीनची वैशिष्ट्ये :-
१. हे फूड सिलिंग मशीन आपण चार्जिंग देखील करु शकतो. Type-C केबलसह सोपी चार्जिंग सुविधा याला आहे. याचबरोबर, यात बॅटरी किंवा सेलची गरज लागत नाही.
२. हलक्या आणि छोट्या आकारामुळे बॅकपॅक, पर्स किंवा किचन ड्रॉवरमध्ये सहज स्टोअर करता येते.
३. याच्या पृष्ठभागावर चुंबक असल्याने आपण चुंबकीय पृष्ठभागावर जसे की फ्रिजवर सहजपणे चिकटवून ठेवू शकता.
४. यात फूड पॅकेट सीलबंद करण्यासोबतच ते उघडण्यासाठी देखील एक कटर देण्यात आले आहे. ज्यामुळे आपण एखादे सीलबंद पॅकेट या मशीनच्या मदतीने कापू देखील शकतो.
‘इडली लायनर’ नावाची ही भन्नाट वस्तू विकत आणा, इडल्या निघतील परफेक्ट, चिकटणार-तुटणार नाहीत...
आता सुई - धाग्याशिवाय बटण शिवण झालं सोपं ! तुटलेलं बटण लावा मिनिटभरात - स्वस्तात मस्त उपाय...
किंमत आणि रेटिंग...
फूड सिलिंग मशीन हे उपकरणं ग्राहकांमध्ये फारच लोकप्रिय आहे, याला ३.१ इतके रेटिंग मिळाले आहे. याची किंमत फक्त १९५ रुपये इतकी असून, आत्तापर्यंत १००० पेक्षा जास्त लोकांनी हे उपकरणं विकत घेतले आहे. असे हे फूड सिलिंग मशीन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://amzn.to/42W3gDC