Join us  

थंडीत ओठ फुटतात- भेगा पडून रक्त येतं? ओठांना मऊ ठेवणारं ‘हे’ लिपबाम वापरून पाहा... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2023 2:29 PM

Dot & Key SPF 30 Vitamin C+E Lip Balm Product Review: हिवाळ्यात ओठ कोरडे पडून भेगाळतात, रक्ताळतात. त्यामुळे अशा ओठांसाठी हा लिप बाम एकदा वापरून पाहा.

ठळक मुद्देकिंमत आणि उपयोग यासाठी हे प्राॅडक्ट उत्तम आणि डर्मिटॉलॉजिकली टेस्टेड आहे.

थंडीचा कडाका आता चांगलाच वाढला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी तर थंडीच्या जोडीला पाऊसही पडत आहे. त्यामुळे या वातावरणाचा परिणाम लगेचच त्वचेवर जाणवू लागतो. थंडीमुळे त्वचा कोरडी पडते, तसेच ओठही फुटतात. काही जणींचे ओठ फुटून त्यातून रक्तही येतं. असा त्रास होत असेल तर एकदा Dot & Key SPF 30 Vitamin C+E Lip Balm वापरून पाहा. यामुळे ओठांना चांगले पोषण मिळून ओठांचा काेरडेपणा, काळेपणा दूर होऊ शकतो (winter care tips for dry lips). ओठांना मऊ ठेवण्यासाठी हिवाळ्याच्या दिवसांत त्यांचा चांगला उपयोग होईल (which lip balm is perfect for dry lips in winter). 

 

Dot & Key SPF 30 Vitamin C+E Lip Balm ची वैशिष्ट्ये

१. हा ग्लॉसी लिपबाम अतिशय मऊ असून SPF 30 मुळे तो सुर्यकिरणांपासूनही संरक्षण करतो.

२. या लिपबाममध्ये व्हिटॅमिन सी, शिया बटर, व्हिटॅमिन ई आणि UV Filters आहेत.

हिवाळ्यात आऊटिंगसाठी करता येतील असे ७ स्टायलिश विंटर लूक- दिसाल एकदम कॅची- आकर्षक

३. ओठांवर असलेले पिगमेंटेशन, टॅनिंग कमी करण्यासाठीही या लिपबामचा उपयोग होतो.

४. हा लिपबाम नॉनस्टिकी प्रकारातला असल्याने ओठ तेलकट दिसत नाहीत.

थंडीची हुडहुडी सुरू झालीये- उबदार स्वेटर घ्यायचंय? बघा ३ सुपरस्टायलिश पर्याय- दिसाल एकदम स्मार्ट

५. स्ट्रॉबेरी क्रश, कॅरेमल किस, रोझ ब्लश, चेरी पॉप, कोका मिंट, वॉटरमेलन रश , मँगो पॅशन अशा वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आणि रंगांमध्ये तो उपलब्ध आहे. 

६. यामध्ये सल्फेट, पॅराबिन, मिनरल्स, केमिकल्सचे रंग वापरण्यात आलेले नाही. 

 

कोणासाठी विशेष फायदेशीर?

१. ज्यांचे ओठ थंडीमध्ये काेरडे पडतात, त्यांच्यासाठी फायदेशीर.

२. ज्यांच्या ओठांवर काळपटपणा दिसून येतो, अशांसाठीही उपयुक्त

३. लिपस्टिक लावण्याआधी ओठांना नरिशिंग करण्यासाठीही हा लिपबाम वापरू शकता.

बिना पाकाचे झटपट तयार होणारे पौष्टिक डिंक लाडू, महागड्या सुकामेव्याचीही गरज नाही- पाहा सोपी रेसिपी

किंमत किती?

या लिपबामच्या कोणत्याही फ्लेवरचे १२ ग्रॅमचे पॅक २४९ रुपयांना उपलब्ध आहे. ऑनलाईन शॉपिंग साईटवरही हा लिपबाम मिळू शकतो. 

रेटिंग : 4 ****

 

टॅग्स :खरेदीब्यूटी टिप्सथंडीत त्वचेची काळजी