स्वयंपाकघरात काम करताना महिलांना कशाची भीती वाटावी असं काही नसतं. पण तरी एका गोष्टीची भीती वाटते. गरम तेलाची सगळ्यांनाच भीती वाटते. (Product Review : Frying Food Will Be Easy With Filter Spoon And Clip)कारण सारखं हातावर किंवा तोंडावर तेल उडतच असतं. तेल उडालं की मग चटका तर जोरदार बसतोच, त्याचा डागही जाता जात नाही. फोडणीच्या तेलापेक्षा तळणीचं तेल जास्त तडतडतं. (Product Review : Frying Food Will Be Easy With Filter Spoon And Clip)काहीही तळायला घेतलं की चटके बसतातच.
अगदी चांगले झारे वापरे तरी, काही उपयोग होत नाही. झाऱ्यामधून तेल व्यवस्थित निथळत नाही. पदार्थ तेलकटच राहतो. दुसर्या चमच्याने झाऱ्यावर घेतलेले पदार्थ दाबायचा प्रयत्न करणे म्हणजे तारेवरची कसरतच म्हणायची. (Product Review : Frying Food Will Be Easy With Filter Spoon And Clip)तेलाबरोबर स्टफिंगही बाहेर येते. पदार्थ तुटतो. खुसखुशीत राहत नाही. तुम्हालाही असे त्रास पदार्थ तळताना होतात का? मग हे प्रॉडक्ट नक्की वापरून पाहा. घरात पुन्हा झाऱ्याचा वापर करायचे मनच होणार नाही.
आजकाल स्वयंपाकघरातील कामे सोपी व्हावी, अति त्रासदायक ठरू नयेत, यासाठी विविध यंत्र मिळतात. तसेच वस्तूही मिळतात. अनेकदा नेहमीच्या वापरातील वस्तूंना थोडा आधुनिक टच दिला जातो. त्याप्रमाणेच आपल्या रोजच्या वापरातील झारा व चिमटा या दोन्ही वस्तू एकत्र करून एक नवीन वस्तू तयार तयार केलेली आहे. ज्याचे नाव फिल्टर स्पून असे आहे.
फिल्टर स्पून
फिल्टर स्पून स्टेनलेस स्टिलपासून तयार केलेले आहे. त्याला एक जाळी आहे. त्या जाळीच्या हॅण्डलला लागूनच एक चिमटा आहे. खाली जाळी व वरती चिमटा अशा प्रकारे या फिल्टर स्पूनची रचना आहे. जाळीमध्ये तळून झालेला पदार्थ घ्यायचा. तो चिमट्याच्या मदतीने पकडायचा म्हणजे तेल निथळवणे सोपे जाते.
किंमत आणि रेटिंग
या स्टेनलेस स्टील फिल्टर स्पून फ्राईंग गॅडजेटची किंमत २११ रुपये आहे. ४०० हून जास्त लोकांनी या प्रॉडक्टला रेटिंग दिलेले आहे. ३.१ एवढे रेटिंग या फिल्टर स्पूनला मिळालेले आहे. तुम्हालाही जर अशा प्रॉडक्टची गरज असेल. ते विकत घ्यायची इच्छा असेल तर, खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/4h5J6KW