Lokmat Sakhi >Shopping > फक्त ५०० रुपयांत आणा हे 'सेन्सर लाईट्स', हवे तिथे लावा-आजी आजोबांसाठी खास सोय...

फक्त ५०० रुपयांत आणा हे 'सेन्सर लाईट्स', हवे तिथे लावा-आजी आजोबांसाठी खास सोय...

Product Review Of Motion Sensory Light : How To Use Best Motion Sensory Light : Motion Sensory Light : आपल्या गरजेनुसार, चक्क बटणाला हातही न लावता चालू बंद होणाऱ्या या सेन्सर लाईट्स विकत आणा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2025 19:26 IST2025-03-03T19:11:20+5:302025-03-03T19:26:56+5:30

Product Review Of Motion Sensory Light : How To Use Best Motion Sensory Light : Motion Sensory Light : आपल्या गरजेनुसार, चक्क बटणाला हातही न लावता चालू बंद होणाऱ्या या सेन्सर लाईट्स विकत आणा...

Product Review Of Motion Sensory Light How To Use Best Motion Sensory Light Motion Sensory Light | फक्त ५०० रुपयांत आणा हे 'सेन्सर लाईट्स', हवे तिथे लावा-आजी आजोबांसाठी खास सोय...

फक्त ५०० रुपयांत आणा हे 'सेन्सर लाईट्स', हवे तिथे लावा-आजी आजोबांसाठी खास सोय...

आपल्या घरात नेहमीच पुरेसा प्रकाश असावा यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स लावतो. घरातील प्रत्येक कोपऱ्यात, किचन, हॉल, बेडरुम अशा ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या ट्यूब लाईट किंवा बल्ब लावतो. या लाईट्स, बल्बच्या प्रकाशामुळे आपण घरात अगदी सहजपणे वावरु शकतो. घरातील या सगळ्या लाईट्स (How To Use Best Motion Sensory Light) चालू किंवा बंद करण्यासाठी आपल्याकडे स्विचबोर्ड वर वेगवेगळ्या (Motion Sensory Light) प्रकारची बटणं दिलेली असतात. ही बटणं दाबून आपण घरातील लाईट्स सहजपणे चालू किंवा बंद करु शकतो. परंतु काहीवेळा आपल्याकडून या लाईट्सच्या माध्यमातून विजेचा अपव्यव होतो(Product Review Of Motion Sensory Light).

आपण काहीवेळा घरात एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना त्या रुम्सच्या लाईट बंद करायलाच विसरतो किंवा काहीवेळा आपल्याला लाईट चालू बंद करण्यासाठी एका जागेवरून उठून त्या स्विचबोर्डपर्यंत जायला देखील कंटाळा येतो. अशावेळी आपल्या गरजेनुसार आपोआप सुरु किंवा बंद होणाऱ्या अशा सेन्सर लाईट्सची सुविधा असावी असे आपल्याला मनोमन वाटते. होय, आता आपण आपल्या गरजेनुसार वापरता येणाऱ्या सेन्सर लाईट्सच्या वेगवेगळ्या आकारातील पट्ट्या अगदी सहज विकत घेऊ शकतो. आपल्या गरजेनुसार, चक्क बटणाला हातही न लावता चालू बंद होणाऱ्या या सेन्सर लाईट्स विषयक अधिक माहिती समजून घेऊयात. 

'सेन्सर लाईट्स' हा कोणता नवीन प्रकार ? 

'सेन्सर लाईट्स' हा लाईट्सचाच एक नवीन प्रकार आहे. एका स्टीलच्या पट्टीवर ३ ते ४ छोटे बल्ब बसवलेली एक पट्टी असते. ही लाईट्सची पट्टी आपण आपल्या गरजेनुसार आपल्याला जिथे अधिक प्रकाश हवा आहे तिथे अगदी सहजपणे लावू शकता.

होळीसाठी करा मठ्ठा! पाहा भन्नाट 'कर्ड स्ट्रेनर', करते घट्ट दही झटपट, उन्हाळ्यात फार कामाची गोष्ट...

ही लाईट सेन्सरवर चालते. म्हणजेच आपण या लाईट्सच्या समोर आलो तर हे लाईट्स आपोआप पेटून त्या भागेतील जागेत प्रकाश पाडतात. तसेच आपण त्या भागातून निघून गेल्यावर त्या लाईट्स आपोआपच बंद होतात, अशा लाइट्स चालू किंवा बंद करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे स्विचबोर्डवरील बटणं दाबण्याची आवश्यक नसते. 

अशा या 'सेन्सर लाईट्स' आपण स्टडी रुम, किचन कॅबिनेट्स, बेडवर किंवा आपल्या गरजेनुसार घरात किचनमध्ये किंवा इतर कोणत्याही जागी अगदी सहजपणे लावू शकतो. यात लाईट्सचे ३ मोड असतात जिथे जास्त काळोख असेल त्या भागात जास्त प्रकाश असणारा बल्ब आपोआप लागतो. काळोखाची तीव्रता लक्षात घेऊन त्यानुसार तो तो मोड असलेले दिवे आपोआप पेटतात. इतकेच नाही तर या लाइट्स दिवस आणि रात्रीच्या प्रकाशानुसार अंदाज घेऊन प्रकाशमान होतात. 

‘इडली लायनर’ नावाची ही भन्नाट वस्तू विकत आणा, इडल्या निघतील परफेक्ट, चिकटणार-तुटणार नाहीत...

किंमत आणि रेटिंग... 

ही 'सेन्सर लाईट्स' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते.ही सेन्सर लाईट् आपल्याला ५०० रुपयांपर्यंत अगदी सहज विकत मिळते. अशी ही 'सेन्सर लाईट्स' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/41Edojo

Web Title: Product Review Of Motion Sensory Light How To Use Best Motion Sensory Light Motion Sensory Light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.