Lokmat Sakhi >Shopping > वाफेवर चालणारी इस्त्री, पर्समध्ये घेऊनही फिरू शकता.. कपड्यांच्या चुण्या काढा चुटकी सरशी

वाफेवर चालणारी इस्त्री, पर्समध्ये घेऊनही फिरू शकता.. कपड्यांच्या चुण्या काढा चुटकी सरशी

Product Review - Portable Micro Steam Iron : आता कपड्यांना इस्त्री करणे होईल अजूनही सोपी. पाहा कमाल प्रॉडक्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2025 12:16 IST2025-03-10T12:05:01+5:302025-03-10T12:16:02+5:30

Product Review - Portable Micro Steam Iron : आता कपड्यांना इस्त्री करणे होईल अजूनही सोपी. पाहा कमाल प्रॉडक्ट.

Product Review : Portable Micro Steam Iron | वाफेवर चालणारी इस्त्री, पर्समध्ये घेऊनही फिरू शकता.. कपड्यांच्या चुण्या काढा चुटकी सरशी

वाफेवर चालणारी इस्त्री, पर्समध्ये घेऊनही फिरू शकता.. कपड्यांच्या चुण्या काढा चुटकी सरशी

आपण इंस्टाग्रामला स्क्रोल करत असताना, काही प्रॉडक्ट्स आपल्या नजरेखालून जातात. त्यातील काही अशी असतात, जी पाहून आपण लक्ष देत नाही. (Product Review : Portable Micro Steam Iron )पण काही अशी असतात, जी प्रॉडक्ट्स बघून वाटते हे तर आपल्याकडे असलंच पाहिजे. लगेच विकत घेण्याची इच्छा होते. मग आपण पटकन ऑर्डर करूनच टाकतो. (Product Review : Portable Micro Steam Iron )असंच काहीसं  हे प्रॉडक्ट आहे. ऑफिसला जाणाऱ्यांसाठी तर फारच उपयोगी ठरेल. 

ऑफिसला जाताना इस्त्रीचे कपडे वापरावे लागतात. जुन्या पद्धतीच्या इस्त्रीवर पाण्याचा हबका मारून आपण कडक इस्त्री करतो. पण त्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. एवढ्या कष्टाने केलेली इस्त्री ऑफिसाला पोहचण्याआधीच प्रवासात साफ खराब होते. (Product Review : Portable Micro Steam Iron )मग अशावेळी हे प्रॉडक्ट फारच उपयोगी ठरेल.

आता इस्त्री करताना पूर्वीप्रमाणे सरळ रेषेत इस्त्री फिरवा, मग उलट्या दिशेला फिरवा. पाण्याचा हात मारा परत उलट्या बाजूने फिरवा. कपड्याच्या हाताला फिरवा मग पाठीला फिरवा. हे सगळं करत बसावं लागतच नाही. आता स्टिमर असलेली इस्त्री बाजारात मिळते. या इस्त्रीमधून वाफ बाहेर पडते. त्या वाफेमुळे कपड्यांना अगदी कडक इस्त्री करता येते. फक्त कपडे हँगरला लावायचे. आणि त्यावरती ही इस्त्री सर्व बाजूंनी नीट फिरवायची. छान इस्त्री होते. हे प्रॉडक्ट म्हणजे अशाच प्रकारची इस्त्री आहे. पण हे अजूनच खास आहे कारण ते पोर्टेबल आहे. आपल्याला हवं तिकडे ते आपल्याला पर्समध्ये ठेऊन नेता येते. 

मायक्रो स्टिम अॅण्ड फोल्डींग आयर्न 
या प्रॉडक्टला ट्रॅव्हल स्टिमर असेही नाव आहे. वजनाला अगदीच हलके आहे. प्रॉडक्टच्या आत पाण्याचा फवाराही आहे. ज्यामुळे इस्त्री अगदी कडक होते. यामध्ये एकावेळी ५० एमएल एवढे पाणी राहते. तसेच याला ३० वॅटची बॅटरी आहे. अर्ध्या मिनिटात इस्त्री गरम होते. फक्त एका बटणाचा वापर करून प्रॉडक्ट वापरायचे आहे. अगदी मिनिटामध्ये इस्त्री करून होते फार वेळ लागत नाही. बॉटरीही बराच वेळ टिकते.   

किंमत आणि रेटिंग
या मायक्रो स्टिम अॅण्ड फोल्डींग आयर्नची किंमत ३७९ रुपये एवढी आहे.  २ हजारपेक्षा जास्त लोकांनी रेटिंग दिले आहे. ४.१ एवढं रेटिंग या प्रॉडक्टला आहे. तुम्हालाही ही इस्त्री विकत घ्यायची असेल तर या लिंकवर क्लिक करा.   https://amzn.to/4i9B98O

Web Title: Product Review : Portable Micro Steam Iron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.