Join us  

फुग्याफुग्यांच्या घालून बाह्या! फुग्यांच्या बाह्या अर्थात 'पफ स्लीव्ह्ज'ची  फॅशन पुन्हा इन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 2:09 PM

Fashion trends: पफ स्लिव्हज (puff sleeves) कपड्यांमधलं स्टायलिश आणि हटके कलेक्शन बघायचं असेल, तर या अभिनेत्रींचे हे जबरदस्त हॉट लूक एकदा बघाच...

ठळक मुद्देचॉईसनुसार पफचा आकार ठरवायला विंटर कलेक्शनमध्ये जबरदस्त स्कोप आहे.

प्रियांका चोप्रापासून ते आलिया भटपर्यंत बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्री पफ स्लिव्हजमध्ये (bollywood actresses in puff sleeves collection) आपण पाहिल्या. कुणी सलवार कुर्त्यामध्ये होतं तर कुणी वेस्टर्न कपड्यांमध्ये... साधारण १५ ते २० वर्षांपुर्वी पफ स्लिव्हज असलेल्या ब्लाऊजची पण खूपच फॅशन आली होती. आता पुन्हा एकदा ही फॅशन येऊ बघत आहे. प्रियांका चोप्रा, आलिया भट, दीपिका पदुकोन या तिघींसोबतच बाॅलीवूडच्या अनेक अभिनेत्रींनी पफ स्लिव्ह्ज कपड्यांची स्टाईल खूपच उत्तम पद्धतीने कॅरी केली होती.

 

सध्या पफ स्लिव्हज म्हणजेच फुग्याच्या बाह्या असणारे विंटर कलेक्शन (puff sleeves in winter collection) मार्केटमध्ये आले आहे. थंडीच्या दिवसात श्रग, स्वेटशर्ट यांची चलती असते. त्यामुळे यावर्षी श्रग आणि स्वेटशर्टमध्येही पफ स्लिव्हजचे अनेक प्रकार पाहायला मिळत आहेत. काही स्वेटरही पफ स्लिव्हजमध्ये आले असून त्यांनाही तरूणींकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हे कपडे तर दिसायला छान दिसतातच, पण त्यासोबतच काहीतरी वेगळं घातल्याचा फिलही येतो...

 

पफ स्लिव्ह्जच्या विंटर कलेक्शनमध्ये पफचे अनेक प्रकार दिसून येतात. काही पफ हे शॉर्ट म्हणजे अगदीच दंडापर्यंत असतात आणि तिथून पुढे मात्र साधी बाही असते. त्या उलट काही पफ हे कोपरापर्यंत आहेत आणि त्यानंतर साधी बाही आहे. काही स्वेटर किंवा स्वेटशर्टच्या बाबतीत मात्र अगदी मनगटाच्या थोडंसं वरपर्यंत पफ आहेत आणि त्यानंतर बाही..

 

असे वेगवेगळे प्रकार उपलब्ध असून आपल्या चॉईसनुसार पफचा आकार ठरवायला या विंटर कलेक्शनमध्ये जबरदस्त स्कोप आहे. शिवाय या कपड्यांची किंमतही अगदीच बजेटफ्रेंडली असून आपल्या खिशाला परवडणारी आहे. लोकल मार्केट किंव ऑनलाईन खरेदी करायला गेल्यास अवघ्या ३००- ४०० रूपयांपासून असे श्रग किंवा स्वेटशर्ट मिळत आहेत. 

 

टॅग्स :खरेदीफॅशनथंडीत त्वचेची काळजी