बहिण भावाच्या प्रेमाचा दिवस म्हणजेच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमेचा (Raksha bandhan 2023) सण आता पुढच्या आठवड्यात आहे. बहिणीने आपल्याला राखी बांधल्यावर तिला काही खास द्यायचं असेल, पण त्यासाठी खिशावर खूप ताण येऊ द्यायचा नसेल तर स्वस्तात मस्त असं काही खास गिफ्ट नक्की देता येतं. म्हणूनच बहिणीसाठी छानशा गिफ्टची खरेदी करण्यापूर्वी हे ३ पर्याय एकदा बघा. तुमच्या बहिणीला यातलं काही आवडलं आणि तुमचं बजेटही थोडं जास्त असलं तर या तिन्ही गोष्टी देऊन टाका. १्०० रुपयातही बहिणीसाठी छान असं काहीतरी तुम्ही नक्की घेऊ शकता. (Raksha bandhan gifts under 100 rupees)
१. किचेनबहिणीचं वय काही का असेना. तिच्याकडे घराची, गाडीची, कपाटाची, लॉकरची अशी कोणती ना कोणती चावी नक्की असते. तिच्या त्या चावीला उपयुक्त ठरण्यासाठी तुम्ही हे किचेन देऊ शकता. त्यावर तुमचा आणि तुमच्या बहिणीचा एखादा छानसा फोटो लावा. म्हणजे त्याला आणखी एक पर्सनल टच मिळेल. हे किचेन सध्या ९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0B5G55M3Y
२. पर्सएकदा कॉलेजमध्ये पाऊल टाकलं की प्रत्येक तरुणीला पर्स हवीच असते. शिवाय एकापेक्षा जास्त पर्स असल्या तरी चालतात. कारण हल्ली प्रत्येक ठिकाणानुसार वेगवेगळ्या पर्सची निवड केली जाते. ही सुंदर एम्ब्रॉयडरी असणारी पर्स ९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B09XVH8CD3
३. ब्रेसलेटबहिणीला दागदागिन्यांची आवड असेल आणि थोडे ट्रेण्डी, हटके दागिने आवडत असतील, तर हे ब्रेसलेट देण्याचा विचार तुम्ही नक्की करू शकता. अतिशय नाजूक डिझाईन असणारं हे ब्रेसलेट फक्त ५९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B07NVBCKX8