सध्या सणावाराचे दिवस आहेत. त्यामुळे आपण घरासाठी, घरातल्या लोकांसाठी, स्वत:साठी वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी करतो. बऱ्याचदा बाजार भावापेक्षा ऑनलाईन शॉपिंग साईटवर वस्तू स्वस्त मिळतात. त्यामुळे मग किंमत कमी दिसली की आपण त्या चटकन मागवून टाकतो. पण असं करून घाईघाईत वस्तू मागवल्यामुळे बऱ्याचदा नंतर मनस्ताप होतो (Safety tips for online shopping). कारण हवी तशी वस्तू येत नाही आणि जी घरात आली आहे ती परत करता येत नाही. पैसे वाया गेल्याचं वाईट वाटतं. म्हणूनच असं होऊ नये, यासाठी कोणत्याही वस्तूची ऑनलाईन खरेदी करण्यापुर्वी या ३ गोष्टी नेहमीच तपासून घ्याव्या. (Must check these 3 things before purchasing any thing from online shopping site)
ऑनलाईन खरेदी करताना काय काळजी घ्यावी?
ऑनलाईन वस्तूंची खरेदी करण्यापुर्वी या ३ गोष्टी न विसरता पाहून घ्या
१. रिटर्न पॉलिसी
प्रत्येक वस्तूची रिटर्न पॉलिसी वेगवेगळी असते. तुम्ही जी वस्तू खरेदी करत आहात तिची रिटर्न पॉलिसी कशी आहे,
तुम्ही घेत आहात ती वस्तू आवडली नाही किंवा तुम्हाला हवी तशी ती नसेल किंवा मग ती वस्तू खराब असेल तर ती बदलून मिळण्याची सोय आहे का, हे आधी पाहा. त्यामुळे मग घरी आलेली वस्तू पुन्हा पाठविण्याची सोय असते. ज्या वस्तूला रिटर्न पॉलिसी नाही, त्या वस्तू सहसा घेणे टाळावे.
२. रिव्ह्यू
आपण वस्तूला किती स्टार मिळाले ते पाहतो पण त्याचे रिव्ह्यू बारकाईने वाचत नाही.
पण रिव्ह्यू वाचण्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा. एकेका वस्तूच्या कमीतकमी ५० रिव्ह्यूवरून तरी तुम्ही नजर फिरवलीच पाहिजे. त्यातून वस्त कशी आहे, याचा बरोबर अंदाज येतो आणि मग ती घ्यायची की नाही ते ठरवता येते.
३. ग्राहकांनी शेअर केलेले फोटो
आपण वस्तूची इमेज पाहतो. ती छानच असते. कारण ती इमेज बघूनच ग्राहक त्याकडे आकर्षित होत असतात.
स्वयंपाक घरातले कळकट- तेलकट नॅपकीन होतील स्वच्छ, फक्त २ पदार्थ वापरा- नॅपकीन चमकतील नव्यासारखे
त्यामुळे इफेक्ट देऊन ती इमेज तयार केली जाते. पण अशा इमेजला भुलून जाऊ नका. त्याउलट ग्राहकांनी त्या वस्तूंचे जे फोटो शेअर केले आहेत, ते काळजीपुर्वक पाहा. कारण ती वस्तू खरीखुरी कशी दिसते, ते ग्राहकांनी शेअर केलेल्या फोटोंमधूनच कळते.