Join us  

साडी नेसल्यावर खूप जाडजूड दिसता? ३ स्टायलिंग टिप्स; कोणत्याही साडीमध्ये, सुडौल स्लिम दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 4:04 PM

Saree Styling Tips : काहीजणी जड हातांमुळे साडी नेसत नाहीत. जर तुम्हीही याच कारणासाठी साडी नेसत नसाल तर शॉट स्लीव्हचे ब्लाउज टाळा.

कित्येक महिलांची अशी तक्रार असते की साडी नेसल्यानंतर त्या आहेत त्यापेक्षा खूपच जास्त जाड दिसतात. एथनिक वेअरमध्ये सुंदर, सुडौल दिसण्यासाठी काही स्टायलिंग टिप्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. या टिप्सचा वापर केल्यास प्रत्येक आऊटफिटमध्ये तुम्ही उठून दिसाल. (saree Drapping Tips) पोटावरची चरबी खूपच वाढली असेल तर साडीमध्ये ती लपववायची कशी असा प्रश्न पडतो. साडी नेसल्यानंतर त्यातून पोटावरची चरबी सहज दिसून येते. पोटावरची चरबी कमी करण्याच्या काही सोप्या टिप्स पाहूया. (Saree Styling Tips)

१) जॅकेट

आजकाल पारंपारीक पोशाखासोबत वेस्टर्न कपडे कॅरी करण्याचा ट्रेंड झाला आहे. त्यामुळे लोक कुर्तीसोबत डेनिम जॅकेटही परिधान करतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या साडीसोबत मॅच कलरचे डेनिम जॅकेट किंवा पैठणी जॅकेट खरेदी करू शकता.

२) हेअरस्टाईल

जर तुम्हाला साडीत उंच दिसायची असेल तर केस मोकळे ठेवण्याची चूक करू नका. जर तुमची उंची जास्त असेल तर एकदा तुम्ही तुमचे केस उघडे ठेवू शकता, परंतु कमी उंचीच्या महिलांनी नेहमी पफ किंवा हाय बन हेअरस्टाइल करावी, यामुळे त्यांची उंची अधिक दिसेल.

३) बेल्ट वापरा

आजकाल साडीवर साजेसा बेल्ट घालण्याचा ट्रेंड वाढला आहे ज्यामुळे तुमचा लुक आणखी खास बनतो. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एथनिक बेल्टसह एथनिक ड्रेस घालू शकता. तो तुम्हाला पूर्णपणे वेगळा लुक देईल.

४) लांब बाह्यांचे ब्लाऊज

काहीजणी जड हातांमुळे साडी नेसत नाहीत. जर तुम्हीही याच कारणासाठी साडी नेसत नसाल तर शॉट स्लीव्हचे ब्लाउज टाळा. फक्त लांब बाह्यांचे ब्लाउज घाला. स्लीव्हलेस किंवा शॉर्ट स्लीव्ह ब्लाउज घालू नका, विशेषतः जर तुमचे हात टोन्ड नसतील.

५) पातळ बॉर्डरची साडी निवडा

स्लिम दिसण्यासाठी पातळ बॉर्डरच्या साड्या घाला. रुंद बॉर्डर असलेल्या साड्या हेवी लूक देतात, त्यामुळे फक्त पातळ बॉर्डर असलेल्या साड्या घाला.

टॅग्स :फॅशनसाडी नेसणेस्टायलिंग टिप्स