Join us  

मुलांना शाळेत नेण्यासाठी स्टीलची, कमी वजनाची, भरपूर पाणी मावणारी बाटली घ्यायची? बघा ३ पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2024 9:12 AM

School Shopping For Kids: मुलांना शाळेसाठी बाटली घेण्याच्या विचारात असाल तर एकदा ऑनलाईन उपलब्ध असणारे हे काही पर्याय बघूनच घ्या.. 

ठळक मुद्देस्टीलची, चांगल्या दर्जाची आणि मुख्य म्हणजे वजनाला हलकी असणारी, मुलांना सहजपणे पेलू शकणारी बाटली घेणार असाल तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा तपासून पाहा..

मुलांच्या शाळा सुरू होणार म्हटल्यावर पालकांचीच जास्त धावपळ सुरू होते. मुलांच्या नव्या शालेय वर्षाची सगळी तयारी करणं, मुलांना शाळेचं सगळं साहित्य आणून देणं यात सुरुवातीचे काही दिवस चांगलीच पळापळ होते. रोजचं रुटीन सांभाळून ही पळापळ अनेकांना झेपत नाही (School Shopping For Kids). त्यामुळे ते खरेदीसाठी नेहमीच काही ऑनलाईन पर्याय पाहात असतात. तुम्हालाही मुलांच्या शाळेच्या वस्तूंच्या खरेदीचं काम सोपं आणि सुटसुटीत करायचं असेल तर ऑनलाईन खरेदी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. म्हणूनच यंदा मुलांसाठी स्टीलची, चांगल्या दर्जाची आणि मुख्य म्हणजे वजनाला हलकी असणारी, मुलांना सहजपणे पेलू शकणारी बाटली घेणार असाल तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा तपासून पाहा..(steel bottle shopping for kids for school at low price)

मुलांना शाळेसाठी स्टीलच्या बाटल्यांची खरेदी

 

१. स्टीलच्या बाटलीचा हा एक प्रकार पाहा. यावर बाहेरून छान डिझाईन असलं तरी आतून ही बाटली स्टीलची आहे. यामध्ये साधारण अर्धा लीटर पाणी मावतं.

पातेल्यात पातेलं, वाटीत वाटी अडकली? २ सोपे उपाय- जोर न लावताही करा चटकन वेगळे

छोटा वर्ग असेल तर त्या मुलांसाठी ही बाटली चांगली आहे. सध्या या बाटलीवर १४ टक्के डिस्काउंट असून ती २८८ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.Click To Buy:https://amzn.to/3R9anlp

 

 

२. अनेक लहान वर्गातल्या मुलांना बेल्ट असणारी वॉटरबॅग पाहिजे असते. म्हणजे ही बाटली त्यांना खांद्याला अडकवता येते. तुम्हीही अशाच प्रकारच्या बाटलीच्या शोधात असाल तर हा एक चांगला पर्याय आहे.

मुलांना शाळेसाठी स्टीलचा डबा घ्यायचा? बघा ३ स्वस्त पर्याय, अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीत

ही बाटली देखील आतल्या बाजुने स्टीलचीच असून ती सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर २९९ रुपयांना मिळत आहे. Click To Buy:https://amzn.to/4e1gq5w

 

 

३. मोठ्या वर्गातल्या मुलांसाठी अशा बाटल्या जास्त चांगल्या वाटतात. कधी कधी कॉलेज किंवा ऑफिसला नेण्यासाठीही हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं? वाचा डॉक्टरांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला....

या बाटल्या समोरच्या बाजुने मोठ्या आकाराच्या असल्याने त्या स्वच्छ करायला सोप्या जातात. या २ बाटल्यांचा सेट सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर ३९९ रुपयांना मिळत आहे. Click To Buy:https://amzn.to/3x1cTU3

 

टॅग्स :Shalechi Taiyariखरेदीऑनलाइनलहान मुलंविद्यार्थीशाळास्कूल शॉपिंग