गणेशोत्सवाची तयारी हळूहळू घरोघरी सुरु होतेय, घराच्या आवराआवरीपासून ते डेकोरेशनपर्यंत अनेक गोष्टी या काळात करायच्या असतात. त्यामुळे साधारण गणेशउत्सवाच्या १५- २० दिवस आधीपासूनच वेगवेगळ्या गोष्टींची तयारी सुरु होते. गणपती हे अनेकांचं आवडीचं दैवत. त्यामुळे त्याचं स्वागत कसं दणक्यातच झालं पाहिजे, अशी गणेशभक्तींची इच्छा असते. त्यामुळे गणपती येणार म्हटलं की त्यांच्यासाठी दरवर्षी काही ना काही नवी खरेदी केली जाते. आताही गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी पूजेचं सामान किंवा पुजेसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी (From where to get pooja items at low price?) करण्याचा विचार असेल, तर हे काही पर्याय एकदा नक्कीच बघून घ्या. (Online shopping for pooja samagri)
पूजा साहित्याची खरेदी
१. पूजा थाळी
घरात कोणतीही पूजा असेल तरी पूजा थाळी लागतेच. ऑनलाईन शॉपिंग साईटवर पूजा थाळीचे अनेक आकर्षक पर्याय मिळत आहेत. अगदी २०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत वेगवेगळ्या किंमतींच्या पुजा थाळी उपलब्ध आहेत. काही थाळी निरांजन, कलश, वाट्या यांच्यासह आहे, तर काही नुसत्या प्लेन थाळी आहेत. आपली गरज नेमकी कशी ते पाहून आपण खरेदी करू शकतो. ही थाळी ऑनलाईन शॉपिंग साईटवर ६०० रुपयांना मिळते आहे. खरेदी करण्यासाठी किंवा थाळीबाबत अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Click to Buy
https://www.amazon.in/dp/B08FZ9W43S
२. दिवा
देवापुढे लावण्यासाठी नवा दिवा घेण्याचा विचार करत असाल, तर अगदी १०० रुपयांपासूनही खूपच आकर्षक दिवे ऑनलाईन उपलब्ध आहेत. यापैकी काही दिवे ब्रासचे तर काही व्हाईट मेटलचे आहेत. त्यापैकीच हा एक आकर्षक दिवा. देवदास दिवा म्हणून तो ओळखला जातो. हा दिवा १९९ रुपयांना ऑनलाईन साईटवर उपलब्ध आहे. खरेदीसाठी किंवा अजून आकर्षक दिवे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Click to Buy
https://www.amazon.in/dp/B07JFH2KJS
३. कलश
गणपतीपुढे पाण्याने भरलेला कलश, नारळ आणि त्यात विड्याची किंवा आंब्याची पाने, असं मांडलं जातं. असा ब्रासचा कलश, त्यावर प्रतिकात्मक नारळ आणि ५ पानं असा सेटही आता ऑनलाईन मिळत आहे. लहान- मोठ्या वेगवेगळ्या आकारात हा कलश मिळत आहे. हा छोटा कलश ३४९ रुपयांना ऑनलाईन उपलब्ध असून खरेदी करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.
Click to Buy
https://www.amazon.in/dp/B08WHC188C
४. परडी
पूजेसाठी रोजची फुलं, दुर्वा ठेवण्यासाठी परडी घेण्याचा विचार करत असाल तर ही परडी निश्चितच छान आहे. शिवाय गणेशोत्सव झाल्यानंतर हॉलमध्ये डेकोरेटीव्ह पीस म्हणूनही तुम्ही त्याचा वापर करू शकता. ४५० रुपयांना ही परडी ऑनलाईन मिळत आहे.
Click to Buy
https://www.amazon.in/dp/B08K7JXBLL