Join us  

एका मिनिटांत कांदे कापणाऱ्या यंत्राचे ४ पर्याय, डोळ्यात पाणी न येता कांदा कापा झरझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2023 4:45 PM

Shopping of kitchen utensils onion cutter chopper : कांद्याची साले काढणे, चिरणे यामध्ये स्वयंपाकाचा जास्त वेळ जाऊ नये म्हणून...

भाजीपाला साफ करणे, तो चिरणे हे स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचे काम असते. कांदा, लसूण, कोथिंबीर हे घटक तर आपल्याला स्वयंपाकघरात सकाळच्या नाश्त्यापासून सतत लागत असतात. त्यामुळे लसूण सोलून ठेवणे, कोथिंबीर निवडून ठेवणे अशी कामे झालेली असतील की स्वयंपाक झटपट होतो. कांदा चिरणे हेही त्यातलेच एक महत्त्वाचे काम. कांदा बारीक चौकोनी, उभा किंवा पातळ चकत्या अशा कोणत्याही स्वरुपात चिरायचा असला तरी त्याची साले काढणे, चिरणे यामध्ये स्वयंपाकाचा बऱ्यापैकी वेळ जातो. त्यातही हाताने कांदा कापायचा म्हटल्यावर तो आपल्याला हवा तितका बारीक होतोच असे नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कांदा कापताना डोळ्यातून सतत येणारे पाणी (Shopping of kitchen utensils onion cutter chopper). 

तसंच पावभाजी, मिसळ, चाट असा काही वेगळा बेत असेल तर नेहमीपेक्षा जास्त कांदा लागतो. अशावेळी हाताने कांदा चिरत बसण्यापेक्षा कांदा कापण्याच्या यंत्राने तो बारीक केला तर काम सोपे आणि झटपट होते. हल्ली बाजारात कांदा कापण्याची बरीच वेगवेगळी यंत्रे मिळत असून स्वयंपाक करणे सोपे व्हावे यासाठी अशा उपकरणांचा आवर्जून वापर करायला हवा. पाहूयात ही यंत्रे कोणती आणि त्याच्या किंमती काय आहेत...

(Image : Google)

१. हाताच्या बोटांमध्ये धरुन दोरीने ओढायचे हे यंत्र वापरायला अतिशय सोपे असते. यामध्ये कांद्याचे एकसारखे काप करुन टाकल्यास अगदी २ ते ३ मिनीटांत कांदा एकदम बारीक होतो. यामध्ये विविध कंपन्यांचे पर्याय उपलब्ध असून २०० रुपयांपासून हे यंत्र बाजारात मिळते. 

https://bit.ly/41vAnvm

२. यामध्येच थोडे मोठ्या आकाराचे आणि जास्त ब्लेड असलेले एक यंत्रही उपलब्ध आहे. त्यात एकावेळी १ पेक्षा जास्त कांदे बारीक होत असल्याने घरी काही कार्यक्रम असेल किंवा पाहुणे येणार असतील तर कांदा कापण्याचा वेळ निश्चितच वाचतो. आकाराने हे यंत्र मोठे असल्याने ते टिकण्याच्या दृष्टीनेही चांगले असते. यामध्ये कांद्यासोबतच काकडी, गाजर, टोमॅटो, कोबी अशा भाज्याही अगदी छान चिरल्या जातात.

https://bit.ly/3RQ5SwY

(Image : Google)

३. कांद्याचे पातळ गोलाकार काप हवे असतील तर अशाप्रकारचे स्लायसर अतिशय सोयीचा असतो. आपण पानात सॅलेड म्हणून कांदा देणार असू तर अशाप्रकारचे गोलाकार स्लाईस छान वाटतात. अशा यंत्रामध्ये ते अतिशय छान होत असल्याने बीट, गाजर अशा गोलाकार भाज्यांचे स्लाईस करणे सोपे होते. 

https://bit.ly/3v94Ras

४. याशिवाय कांदा आतमध्ये घालून तो ब्लेडने बारीक न करता अगदीच सोप्या पद्धतीने तो बारीक करता येतो. यामध्ये वरच्या भागात कांदा ठेवूनदाबल्यास खाली चौकोनी बारीक चिरलेला कांदा मिळतो. हे यंत्रही वापरायला अतिशय सोपे असते.

https://bit.ly/3tvUTPO 

टॅग्स :खरेदीकांदाकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.