Join us  

हाताला कणभर पीठ न लागता कणीक मळा, पाहा ही पीठ भिजवण्याची जादूई पिशवी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2024 9:21 PM

Shopping Tips For Dough Atta Maker Bag : कणिक सांडून ओट्यावर पसारा होऊ नये यासाठी एक भन्नाट कल्पना बाजारांत आली आहे...

बहुतेक महाराष्ट्रीयन घरात रोजच्या जेवणात चपाती असतेच. चपाती बनवण्यासाठी सर्वात आधी कणिक मळावे लागते. अनेक गृहिणींना स्वयंपाक घरामध्ये सगळ्यांत कठीण काम कोणतं वाटत असेल तर ते म्हणजे कणिक मळणे. सकाळच्या घाईगडबडीत कणिक मळण्यासाठी बराच वेळ वाया घालवावा लागतो. अशात कणिक नीट मळले गेले नाही तर चपात्या कडक किंवा वातड होतात. कणिक मळण्याचे काम अनेकजणींना वेळखाऊ व बोरिंग वाटते. यासोबतच कणिक मळताना आजूबाजूला जो पसारा होतो तो वेगळाच. कणिक मळताना, गव्हाचे पीठ घेऊन त्यात तेल, पाणी घालून ते हातांनी मळावे लागते. अशावेळी किचन ओट्यासोबतच आपले हात देखील खराब होतात. अशावेळी हात खराब न होता झटपट कणिक कशी मळली जाईल असा विचार गृहिणींच्या मनात येतो(Silicone Preservation Magic Kneading Dough Ata Atta Maker Bag).

चपात्या बनवण्यासाठी कणिक मळताना पोळपाट, लाटणं, ओटा सगळंच खराब होत. कणिक मळताना आजूबाजूला पीठ सांडत त्यामुळे कणिक मळून झाल्यावर ओल्या कापडाने ओटा पुसून घ्यावा लागतो. सकाळच्या घाईगडबडीत आपण एकाचवेळी चहा, नाश्ता, चपाती, भाजी अशा अनेक गोष्टी करत असतो. कणिक मळण्यात सकाळच्या घाईत आपला बराच वेळ जातो. अशावेळी कणिक सांडून ओट्यावर पसारा होऊ नये यासाठी एक भन्नाट कल्पना बाजारांत आली आहे. आपण अनेक गोष्टी ठेवण्यासाठी जसा पिशवीचा वापर करतो त्याचप्रमाणे कणिक मळण्यासाठी देखील एका अनोख्या अशा पिशवीची निर्मिती करण्यात आली आहे. या पिशवीचा वापर करून आपण अगदी ५ मिनिटांत कणिक मळू शकता. या पिशवीचा वापर केल्याने आपले हात आणि ओटा दोन्ही खराब न होता अगदी कमी वेळात कणिक मळून होते. 

 

कणिक मळण्याची ही पिशवी सिलिकॉन प्लॅस्टिकने बनलेली आहे. याचा वापर करून झटपट कणिक मळता येते. सगळ्यांतआधी या पिशवीमध्ये आपल्याला हवे तेवढे गव्हाचे पीठ ओतून घ्यावे. त्यानंतर त्यात गरजेनुसार तेल व पाणी घालावे. आता पिशवीचे तोंड बंद करुन कणिक मळतो तशी कणिक मळून घ्यावी. या पद्धतीने कणिक मळल्यास आपले हात खराब होत नाहीत, त्याचबरोबर कणिक मळताना होणारा पसाराही बराचसा कमी होतो.

दुधावर ठेवण्याची जाळी स्वच्छ - चकचकीत करण्याचा सोपा उपाय, काळी झालेली जाळी दिसेल नव्यासारखी...  

कडक गूळ चिरण्याच्या २ झटपट ट्रिक्स, गूळ होईल किसून, हातही दुखणार नाहीत...

कणिक मळण्यासाठी अशा प्रकारची पिशवी वापरणे हे आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे असा प्रश्न पडू शकतो. पण जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणाऱ्या अँटी - मायक्रोबियल ऍडिटिव्हसह ही पिशवी तयार केल्यामुळे  तिची स्वच्छता राखणे सोपे होणार आहे. वेगवेगळ्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून आपण ही कणिक मळण्याची पिशवी अगदी सहज विकत घेऊ शकता. 

कणिक मळण्याची ही पिशवी खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/45DqRZb

 

 

टॅग्स :खरेदीकिचन टिप्स