Join us  

दिवाळीत नवीन मिक्सर खरेदी करण्याचा विचार करताय? परफेक्ट मिक्सर निवडण्यासाठी ५ गोष्टी; वाटणघाटण एकदम सोपं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 4:52 PM

How to Choose Perfect Mixer-Grinder: मिक्सरची खरेदी एकदम परफेक्ट होण्यासाठी आणि आपल्या बजेटमध्ये योग्य मिक्सर मिळण्यासाठी खरेदीच्या वेळी या काही गोष्टी लक्षात ठेवा.

ठळक मुद्देतुमचाही मिक्सर खरेदीचा विचार असेल, तर खरेदी करण्यापुर्वी या काही गोष्टी नक्कीच तपासून पहा.

दिवाळीच्या दिवसांत हमखास गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करण्यात येते. अगदी घरातल्या कुकर, मिक्सर, गॅस अशा लहान- सहान गोष्टींपासून ते दुचाकी, चारचाकी, सोन्याचे दागदागिने अशा मोठमोठ्या वस्तूंची खरेदी होते. कारण या काळात एकतर ऑफरही खूप असतात आणि दुसरं म्हणजे व्हरायटीदेखील खूप जास्त प्रमाणात दिसून येते. त्यामुळे बऱ्याचजणी अशा अनेक लहान- मोठ्या खरेदीसाठी दिवाळीचा मुहूर्त शोधून ठेवत असतात. या दिवाळीत (shopping for diwali) तुमचाही मिक्सर खरेदीचा (mixer-grinder Shopping) विचार असेल, तर खरेदी करण्यापुर्वी या काही गोष्टी नक्कीच तपासून पहा.

 

मिक्सर खरेदी करण्यापुर्वी...१. तुमचा नेमका उपयोग कायफूड प्रोसेसरपासून ते हॅण्डमिक्सीपर्यंत मिक्सरचे अनेक प्रकार पाहायला मिळतात.

रव्यात किडे झालेत? लगेच फेकू नका, ३ उपाय- रवा नक्की वापरता येईल 

उपयोगाप्रमाणे त्याच्या किमतीही वाढत जातात. त्यामुळे आपला नेमका उपयोग काय आहे, आपण कशासाठी जास्त मिक्सर वापरतो, या गोष्टी आधी स्वत:ला विचारा आणि त्यानुसार मग तुमचा उपयोग पाहून मिक्सरची खरेदी करा. 

 

२. या गोष्टी तपासाआजकाल मोबाईलमध्ये इंटरनेट असल्याने खूप गोष्टी सोप्या झाल्या आहेत. मिक्सर खरेदी करण्यापुर्वी इंटरनेटवर जरा शोध घ्या.

फक्त ४ पदार्थ वापरा, ७ दिवसांत कमी होतील डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणि सुरकुत्या, दिवाळीत दिसाल फ्रेश

तुमच्या बजेटमध्ये बसणारे ब्रॅण्ड कोणते, त्यांच्या किमती काय, तुलनेने कोणते अधिक योग्य वाटते, हे तपासा. ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर ग्राहकांचे रिव्ह्यूदेखील असतात. ते वाचा कारण त्यांचा खरोखरच चांगला उपयोग होतो.तसेच जेव्हा दुकानात मिक्सर खरेदी करायला जाल, तेव्हा हॅण्डल करायला कोणते अधिक सोपे आहे, तुमच्या घरात मिक्सर कुठे ठेवणार त्यानुसार मिक्सरचा आकार, मिक्सर स्वच्छ करायला सोपे आहे की अवघड, मिक्सरचे power consumption या गोष्टीही आवर्जून तपासून बघा. 

 

३. हे पर्याय तपासून पहाऑनलाईन शॉपिंग साईटवर मिक्सरचे अनेक प्रकार उपलब्ध असून त्यांच्या किमतीही सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आहेत. प्रेस्टिज, लाईफलाँग, सेलोबेटा, बोश, बटरफ्लाय असे अनेक प्रकार १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत मिळत आहेत.  

टॅग्स :खरेदीदिवाळी 2021होम अप्लायंस