Join us  

तिखट- मीठाचा डबा नवीन घ्यायचं म्हणता? बघा ३ सुंदर आकर्षक पर्याय, स्वस्त आणि टिकाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2023 11:24 AM

Shopping Tips For Spices Storage Box For Kitchen: तुम्हीही तिखट- मीठ- मसाले ठेवण्यासाठी तोच तो खूप जुना झालेला डबा वापरताय का, मग आता हे बघा त्यातले काही लेटेस्ट स्टायलिश पर्याय.. तुम्हाला नक्कीच आवडतील...(spices storage box at affordable price)

ठळक मुद्देतिखट- मीठाचा डबा बदलण्याचा छोटासा प्रयत्न केला तरी बघा तुमच्या किचनचा लूक कसा एकदम बदलून जातो.

बहुतांश घरांमध्ये तिखट- मीठ- मसाले ठेवण्यासाठी स्टीलचा डबा वापरतात. हा डबा अगदी रोजच्या वापरातला असतो. त्या डब्याशिवाय स्वयंपाक घरात काहीही हालचाल होत नाही. अनेक घरांमध्ये तर हा डबा वर्षानुवर्षांपासून चालत आलेला असतो. बऱ्याचदा हल्लीच्या मॉडर्न किचनमध्ये तो शोभून दिसतही नाही. पण तरीही तो काही बदलला जात नाही. तुमच्याही घरात असाच खूप जुना डबा असेल आणि तोच तो डबा कित्येक वर्षांपासून वापरून तुम्ही कंटाळला असाल, तर आता त्यात बदल करून टाका (Latest designs for spices box in kitchen). आता मसाले ठेवण्यासाठी खूप आकर्षक डब्यांचे, बरण्यांचे पर्याय उपलब्ध आहेत (wooden box for spices). तिखट- मीठाचा डबा बदलण्याचा छोटासा प्रयत्न केला तरी बघा तुमच्या किचनचा लूक कसा एकदम बदलून जातो. (Shopping tips for spices storage box for kitchen at affordable price)

तिखट- मीठाचा डबा घेण्यासाठी ३ आकर्षक पर्याय

 

१. आपल्या किचनच्या लाकडी फर्निचरला एकदम शोभून दिसणारा हा लाकडी डबा आहे. हा डबा तुमच्या स्वयंपाक घरात असेल तर नक्कीच तुमच्या चॉईसचं सगळेजण कौतूक करतील.

झाडांना फुलं येतंच नाहीत? १ सोपा उपाय, येईल रंगबिरंगी फुलांचा बहर अगदी लवकर

या डब्यात ९ कप्पे असून सगळे वेगवेगळे काढून स्वच्छ करता येतात. किंमत थोडी जास्त असली तरी डब्याचा टिकाऊपणा चांगला आहे. शिवाय असे डबे आपण वारंवार घेतही नाही. त्यामुळे एकदाच थोडी जास्त किंमत देऊन घेणं परवडतं.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0969Z2F4Q

 

 

२. हा आणखी एक सुंदर डबा बघा. हा डबा शिसम लाकडापासून तयार केलेला आहे, अशी माहिती वेबसाईटवर दिली आहे. त्या डब्यावर खूप सुंदर डिझाईन असल्याने अगदी बघताक्षणीच तो सगळ्यांना आवडणारा आहे.

मैत्रिणीच्या लग्नासाठी आलिया भटने घातला ५२ हजारांचा सुंदर ड्रेस, त्यावरची नक्षी अशी की.... बघा व्हायरल फोटो

यामध्ये मसाल्याच्या वेगवेगळ्या ७ डब्या असून एका डबीत साधारण ५० ग्रॅम एवढं सामान बसतं. हा डबा ऑनलाईन शॉपिंग साईटवर १९९९ रुपयांना मिळतो आहे. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B08V8JV8QN

 

 

३. हल्ली मसाले ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या डब्याही वापरतात. ओट्यावर जरी तुम्ही हा सेट ठेवला तरी छान दिसतो.

वजन भराभर कमी करायचंय? मग 'ही' फळं अगदी आतापासूनच दररोज खा, झर्रकन उतरेल वजन

शिवाय एका मसाल्यासाठी सगळा डबाच उघडण्याची गरज नसते. वापरायला आणि स्वच्छ करायला सोपा असणारा हा पर्याय सध्या ६७९ रुपयांना मिळतो आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B07C78G8VW?th=1

 

टॅग्स :खरेदीकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.ऑनलाइन