Join us  

लहान मुलांसाठी डिझायनर, चमकदार, झागरमागर महागडे कपडे घेताय? आईबाबा हमखास करतात ५ चुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2021 4:06 PM

Shopping tips : आपल्या हिशोबाने लहान मुलांचे कपडे (children wear) घेऊ नका.. कारण आपण आपल्या स्टाईलने घेतलेले कपडे मुलांना टोचतात आणि त्याचा त्यांना चांगलाच त्रास होऊ शकतो...

ठळक मुद्देया विषयीचा एक भन्नाट व्हिडियो अभिनेत्री क्रांती रेडकर हिने नुकताच इन्स्टाग्रामला शेअर केला आहे.

अगदी एखाद्या वर्षाचं किंवा ६ महिन्यांचं लेकरू असलं तरी हौशी आई- बाबांना त्यांच्या बाळाला खूप सजवावं वाटतं. आपण जसे छान डिझायनर, महागडे, चमकदार कपडे घेतो, तसेच आपल्या बाळालाही घ्यावेत, असं त्यांना वाटतं. म्हणून मग बाळाची गरज लक्षात न घेता ते आपल्या चॉईसने बाळाची खरेदी करतात खरी. पण त्यानंतर मात्र जेव्हा ते कपडे घालण्याची वेळ येते, तेव्हा बाळ जोरदार आवाज काढतं आणि ते तसले टोचके कपडे घालण्यास सक्त विरोध दर्शवतं. ३ ते ४ वर्षांची मुलं त्यांना कळत असल्यामुळे कपडे पाहूनच नको म्हणतात. पण त्यांच्यापेक्षा लहान मुलांना जर तसे कपडे बळजबरीने घातले, तर ती मुलंही रडून रडून गोंधळ करतात. शेवटी आई- बाबांना नाईलाजाने त्यांचे कपडे बदलावे लागतात. 

 

याशिवाय आपण एवढे महागडे कपडे आणले आणि मुलांनी ते अंगालाही लावले नाहीत, म्हणून पालकांना होणारं दु:ख वेगळंच. म्हणूनच तर मुलांना भारी, डिझायनर, चमकीचे कपडे घेण्याआधी थोडा विचार करा. या विषयीचा एक भन्नाट व्हिडियो अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने नुकताच इन्स्टाग्रामला (instagram) शेअर केला आहे. बाळाचे कपडे या विषयावरून दोन व्यक्तींचा एकमेकांशी संवाद अशा आशयाचा तो व्हिडियो आहे. मुलांसाठी असे कपडे खरेदी केले तर आपल्या आईची त्यावर कशी प्रतिक्रीया असते, हे क्रांती यांनी या व्हिडियोतून सांगितले आहे. 

 

मुलांसाठी कपडे घेताना या ५ चुका टाळा .....How to select clothes for children?१. कपड्याचा पोत बघामुलांसाठी कपडे घेताना फॅब्रिक्सच्या बाबतीत हयगय करू नका. मऊ, तलम कपडेच मुलांसाठी निवडा. कॉटन आणि सिल्क हे दोन मुलांच्या कपड्यांसाठीचे उत्तम पर्याय आहेत. हे कपडे टोचत नाहीत आणि वजनाने अतिशय हलके असतात. त्यामुळे मुलांसाठी कॉटन आणि सिल्कचे कपडे घेण्यास प्राधान्य द्या. 

 

२. कपड्याची शिवण बघितली का?मुलांचे कपडे घेताना त्या कपड्यांची शिवण आतल्या बाजूने कशी आहे, हे नक्की तपासून बघा. अनेकदा कपड्यांना काही टोचक्या लेस लावलेल्या असतात. आपल्याला वाटते या लेस बाहेरच्या बाजूने आहेत, त्यामुळे त्या टोचणार नाहीत. पण ही लेस जेव्हा शिवली जाते, तेव्हा त्याचा काही भाग कपड्यांच्या आतून देखील असतो आणि तो मुलांना टोचतो. यामुळे मग मुलांची चिडचिड होते आणि नेमके काय टोचते हेच त्यांना समजत नाही. कपड्याची शिवण आतल्या बाजूने मऊ, गुळगुळीत असल्याची खात्री करा.

 ३. वजनदार कपडे मुळीच नकोमुलांसाठी खूप जड, वजनदार कपडे घेऊ नका. कारण त्याचा मुलांना त्रास होतो. कपडा अतिशय मऊ आणि वजनाने हलका असावा. तसेच मुलींना कपडे घेताना ते जास्त घेरदार, पायघोळ घेऊ नका. अन्यथा त्यांना ते सांभाळणे खूप कठीण होते आणि असे जड कपडे घालण्यास मुलं नकार देतात. 

४. हूक चेन तपासून घ्याड्रेसला जर मागच्या बाजूने चेन किंवा हुक असेल, तर ते मुलांच्या पाठीवर कायम घासत राहते आणि नंतर दुखू लागते. त्यामुळेही बऱ्याचदा मुलं कपडे घालण्यास नकार देतात. त्यामुळे चेन, हूक आतील बाजूने कसे आहे, त्यावर दुसऱ्या कपड्याचे आवरण येते की नाही, मुलांना हे टोचेल का, अशा गोष्टी व्यवस्थित तपासून घ्या.

 

५. खूप वर्कचे कपडे नकोलहान मुलांच्या कपड्यांना खूप जास्त फ्रिल असतील तर तसे कपडे मुलांसाठी निवडू नका. तसेच खूप जास्त मोती, कुंदन किंवा इतर खडे आणि वेगवेगळ्या चमकीच्या लेस असणारे कपडेही मुलांसाठी घेऊ नका. हे कपडे खूपच टोचणारे असतात. 

 

टॅग्स :खरेदीक्रांती रेडकर