Lokmat Sakhi >Shopping > Shopping Tips: फक्त १०० रुपयांत ठसकेबाज नथ! गुढी पाडव्यासाठी खास नथ घ्यायचीय, हे ५ पर्याय बघाच..

Shopping Tips: फक्त १०० रुपयांत ठसकेबाज नथ! गुढी पाडव्यासाठी खास नथ घ्यायचीय, हे ५ पर्याय बघाच..

Shopping for Nose Pin: गुढी पाडव्याला महाराष्ट्रीयन वेशभुषा करायची असेल आणि त्यासाठी नथ (traditional Maharashtrian nath) घेण्याचा विचार असेल तर हे ५ पर्याय बघाच.. १०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत अतिशय आकर्षक नथ उपलब्ध आहेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 05:38 PM2022-03-30T17:38:15+5:302022-03-30T17:42:48+5:30

Shopping for Nose Pin: गुढी पाडव्याला महाराष्ट्रीयन वेशभुषा करायची असेल आणि त्यासाठी नथ (traditional Maharashtrian nath) घेण्याचा विचार असेल तर हे ५ पर्याय बघाच.. १०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत अतिशय आकर्षक नथ उपलब्ध आहेत...

Shopping Tips: Nose pin or traditional Maharashtrian nath just under Rs. 100. Must check these 5 best options | Shopping Tips: फक्त १०० रुपयांत ठसकेबाज नथ! गुढी पाडव्यासाठी खास नथ घ्यायचीय, हे ५ पर्याय बघाच..

Shopping Tips: फक्त १०० रुपयांत ठसकेबाज नथ! गुढी पाडव्यासाठी खास नथ घ्यायचीय, हे ५ पर्याय बघाच..

Highlightsस्वस्तात मस्त आणि नवनविन पद्धतीच्या नथ घ्यायच्या असतील तर या ऑनलाईन शॉपिंग साईट्स एकदा तपासून बघाच ..

गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. त्यामुळे या दिवसाची वेशभुषाही कशी अस्सल मराठी आणि आपल्या परंपरेनुसारच असायला हवी... आता अस्सल मराठमोळी पद्धतीने सजायचं म्हटलं तर नाकातली ठसकेबाज नथ तर अतिशय 'मस्ट'  आहे. आज- काल तर नथ घालण्याचा ट्रेण्डही पुर्णपणे बदलला आहे. नथ केवळ साडीवर किंवा नऊवारी साडीवर  घालावी, असं आता मुळीच नाही. 

 

पंजाबी ड्रेस, कुर्ता आणि जीन्स यावरही आजकाल थाटात नथ घातली जाते. गुढी पाडवा, अक्षय्यतृतीया, गणेशउत्सव यासारख्या उत्सवांमध्ये अनेक शहरांत ढोलपथकांतर्फे सादरीकरण केले जाते. यामध्ये महिलांचा उत्साहही देखणा असतो. जीन्स, कुर्ता आणि डोक्याला फेटा असा या पथकातील महिलांचा थाट असतो. पण त्या सगळ्यात उठून दिसते ती प्रत्येकीच्या नाकातली ठसठशीत नथ.. प्रत्येक मराठी मुलीकडे असायलाच हवा असा हा नितांत सुंदर दागिना.. आता जर स्वस्तात मस्त आणि नवनविन पद्धतीच्या नथ घ्यायच्या असतील तर या ऑनलाईन शॉपिंग साईट्स एकदा तपासून बघाच ..

 

ही अतिशय नाजूक आणि देखणी नथ ऑनलाईन साईटवर अतिशय कमी किमतीत मिळते आहे. मोती, लाल खडे आणि एक सुरेख पिंपळपान असं डिझाईन असणारी ही नथ एखाद्या साडीवर, पंजाबी ड्रेसवरही अतिशय उठून दिसेल. चेहऱ्याचा आकार लहान असेल तर ही नथ ट्राय करून पहायला हरकत नाही. किंमत फक्त ४२ रुपये. 
Click to Buy
https://bit.ly/3uEUTJZ

 

 

अस्सल ट्रॅडिशनल लूक देणारी नथ घेण्याचा विचार करत असाल तर ही नथ त्यासाठीचा उत्तम पर्याय ठरू शकते. अशी नथ, चंद्रकोर आणि नऊवारी किंवा सहावारी साडी असा पेहराव केलात, तर नक्कीच सगळ्यांपेक्षा उठून दिसाल. नथीची किंमत आहे फक्त ७९ रुपये.
Click to Buy https://www.amazon.in/dp/B07KWBT7QG  

 

 

अतिशय नविन प्रकारातली ही नथ. हिचा अर्धा हिस्सा गोल्डन रंगाच तर अर्धा मोत्यांचा. वर गोल्डन रंगातलं फूल आणि खाली मोत्यांचं फूल असं सुरेख डिझाईन असणारी ही नथ कोणत्याही तरुणीला छानच दिसेल. किंमत फक्त ८० रुपये. 
Click to Buy https://bit.ly/35sFILu

 

 

मोराचं डिझाईन असणारी ही नथ. या नथीचं डिझाईन खरोखरंच अतिशय आकर्षक आहे. एखाद्या मोराने पिसारा फुलविल्याप्रमाणे जणू नथीचे मोती गुंफण्यात आले आहेत. पारंपरिक प्रकारातलंच पण मॉडर्न डिझाईन असणारं काहीतरी हटके घ्यायचं असेल तर ही नथ बेस्ट चॉईस ठरू शकतो. किंमत फक्त ९९ रुपये. 
Click to Buy https://bit.ly/3iO6IId

 

 

खण साडी मागील दोन- तीन वर्षांपासून ट्रेंडिंग आहे. यंदाही पाडव्याला खण साडी नेसण्याचा विचार करत असाल तर त्यावर ही ऑक्सिडाईज नथ अधिक उठून दिसेल. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ऑक्सिडाईज नथ अवघ्या ५२ रुपयांत मिळत आहेत. 
Click to Buy
https://bit.ly/3uHU3MD
 

Web Title: Shopping Tips: Nose pin or traditional Maharashtrian nath just under Rs. 100. Must check these 5 best options

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.