गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात. त्यामुळे या दिवसाची वेशभुषाही कशी अस्सल मराठी आणि आपल्या परंपरेनुसारच असायला हवी... आता अस्सल मराठमोळी पद्धतीने सजायचं म्हटलं तर नाकातली ठसकेबाज नथ तर अतिशय 'मस्ट' आहे. आज- काल तर नथ घालण्याचा ट्रेण्डही पुर्णपणे बदलला आहे. नथ केवळ साडीवर किंवा नऊवारी साडीवर घालावी, असं आता मुळीच नाही.
पंजाबी ड्रेस, कुर्ता आणि जीन्स यावरही आजकाल थाटात नथ घातली जाते. गुढी पाडवा, अक्षय्यतृतीया, गणेशउत्सव यासारख्या उत्सवांमध्ये अनेक शहरांत ढोलपथकांतर्फे सादरीकरण केले जाते. यामध्ये महिलांचा उत्साहही देखणा असतो. जीन्स, कुर्ता आणि डोक्याला फेटा असा या पथकातील महिलांचा थाट असतो. पण त्या सगळ्यात उठून दिसते ती प्रत्येकीच्या नाकातली ठसठशीत नथ.. प्रत्येक मराठी मुलीकडे असायलाच हवा असा हा नितांत सुंदर दागिना.. आता जर स्वस्तात मस्त आणि नवनविन पद्धतीच्या नथ घ्यायच्या असतील तर या ऑनलाईन शॉपिंग साईट्स एकदा तपासून बघाच ..
ही अतिशय नाजूक आणि देखणी नथ ऑनलाईन साईटवर अतिशय कमी किमतीत मिळते आहे. मोती, लाल खडे आणि एक सुरेख पिंपळपान असं डिझाईन असणारी ही नथ एखाद्या साडीवर, पंजाबी ड्रेसवरही अतिशय उठून दिसेल. चेहऱ्याचा आकार लहान असेल तर ही नथ ट्राय करून पहायला हरकत नाही. किंमत फक्त ४२ रुपये. Click to Buyhttps://bit.ly/3uEUTJZ
अस्सल ट्रॅडिशनल लूक देणारी नथ घेण्याचा विचार करत असाल तर ही नथ त्यासाठीचा उत्तम पर्याय ठरू शकते. अशी नथ, चंद्रकोर आणि नऊवारी किंवा सहावारी साडी असा पेहराव केलात, तर नक्कीच सगळ्यांपेक्षा उठून दिसाल. नथीची किंमत आहे फक्त ७९ रुपये.Click to Buy https://www.amazon.in/dp/B07KWBT7QG
अतिशय नविन प्रकारातली ही नथ. हिचा अर्धा हिस्सा गोल्डन रंगाच तर अर्धा मोत्यांचा. वर गोल्डन रंगातलं फूल आणि खाली मोत्यांचं फूल असं सुरेख डिझाईन असणारी ही नथ कोणत्याही तरुणीला छानच दिसेल. किंमत फक्त ८० रुपये. Click to Buy https://bit.ly/35sFILu
मोराचं डिझाईन असणारी ही नथ. या नथीचं डिझाईन खरोखरंच अतिशय आकर्षक आहे. एखाद्या मोराने पिसारा फुलविल्याप्रमाणे जणू नथीचे मोती गुंफण्यात आले आहेत. पारंपरिक प्रकारातलंच पण मॉडर्न डिझाईन असणारं काहीतरी हटके घ्यायचं असेल तर ही नथ बेस्ट चॉईस ठरू शकतो. किंमत फक्त ९९ रुपये. Click to Buy https://bit.ly/3iO6IId
खण साडी मागील दोन- तीन वर्षांपासून ट्रेंडिंग आहे. यंदाही पाडव्याला खण साडी नेसण्याचा विचार करत असाल तर त्यावर ही ऑक्सिडाईज नथ अधिक उठून दिसेल. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ऑक्सिडाईज नथ अवघ्या ५२ रुपयांत मिळत आहेत. Click to Buyhttps://bit.ly/3uHU3MD