Lokmat Sakhi >Shopping > दिवाळीच्या बजेटमध्ये मेडिकल इंश्युरन्सची खरेदी करणार का? स्वत:सह कुटुंबाचा तुम्ही खरंच विचार करता..

दिवाळीच्या बजेटमध्ये मेडिकल इंश्युरन्सची खरेदी करणार का? स्वत:सह कुटुंबाचा तुम्ही खरंच विचार करता..

ऐन दिवाळीत कोण कशाला वैद्यकीय विमा घ्यायला जाईन असं वाटेलही, पण आपल्या सुरक्षिततेचा विचार आपण करायला नको का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 03:31 PM2022-10-12T15:31:20+5:302022-10-12T15:33:08+5:30

ऐन दिवाळीत कोण कशाला वैद्यकीय विमा घ्यायला जाईन असं वाटेलही, पण आपल्या सुरक्षिततेचा विचार आपण करायला नको का?

Should you buy medical insurance on a Diwali budget? You really think about yourself and your family. | दिवाळीच्या बजेटमध्ये मेडिकल इंश्युरन्सची खरेदी करणार का? स्वत:सह कुटुंबाचा तुम्ही खरंच विचार करता..

दिवाळीच्या बजेटमध्ये मेडिकल इंश्युरन्सची खरेदी करणार का? स्वत:सह कुटुंबाचा तुम्ही खरंच विचार करता..

Highlights आजारपण कुणालाही कधीही येऊ शकतं.

पी. व्ही. सुब्रमण्यम

दिवाळीच्या खरेदीची लिस्ट आता तयार होईल. यंदा काय नवीन वस्तू घ्यायची, आता काय खास खरेदी याची चर्चा घरोघर होतेच. मात्र यासाऱ्यात जर मी तुम्हाला विचारलं की मेडिकल इंश्युरन्स घेतला का? तर तुम्ही म्हणाल की ऐन सणासुदीला काय हे प्रश्न. सणासुदीला काही चांगली खरेदी करायची की वैद्यकीय विमा घ्यायचा? कोण कशाला असा अभद्र विचार करेल? मात्र ज्या आनंदाची आपल्याला आस आहे त्यासाठी आपण सुरक्षितही असावे, कव्हर असावे आणि आपल्या सर्व दिवाळी आनंदाच्याच व्हाव्यात असा विचार नको का करायला?
आताच्या काळात आरोग्यावरचा खर्च इतका वाढतो आहे की आपल्याकडे वैद्यकीय विमा असणं गरजेचंच आहे.

(Image : Google)

अनेकदा चुकतं कुठं पाहा.

१.मला असे अनेक ज्येष्ठ जोडपी माहिती आहेत ज्यांचे आधी स्वत:चे मेडिकल इन्श्युरन्स होते. मात्र त्यांनी ते मध्येच बंद करुन टाकले. कारण काय तर आता मुलगा मोठ्या कंपनीत नोकरीला लागला आहे. त्यानं तिथं वैद्यकीय विमा घेतला आहे, त्यात पालक म्हणून आम्हीही कव्हर होतोच. मग कशाला दोन-दोन. पण मुलगा काय किंवा मुलगी काय, ते त्या कंपनीतली नोकरी सोडतात. त्याचं कव्हर जातं, तसं या दोघांचंही. म्हणजे विमा नाही. माझ्या ओळखीचं एक जोडपं, काकांचं वय ७३, काकूंचं ६९. त्यात मधुमेह, रक्तदाब सोबती, आणि आता ते विमाधारक नाही.. कल्पना करा, त्यांच्यावर आलंच दुर्देवानं आजारपण तर..
२. काहीजण असेही मला माहित आहेत जे कॅन्सर कव्हर पॉलिसी घेतात, पण पुरेसा वैद्यकीय विमा घेत नाहीत. आता कशावरुन तुम्हाला फक्त कॅन्सरच होईल आणि बाकी आजारपण येणारच नाही, आता आला कोरोना..मग काय करणार? त्यामुळे एक मोठा वैद्यकीय विमा घ्या, त्यात कॅन्सर कव्हर झालेला असेल असं पहा..
३. काही जणांना वैद्यकीय विमा कोणता घ्यावा, कधी घ्यावा हेच माहिती नसतं. नात्यातलं, ओळखीचं कुणी सांगतं, ते लोक घेतात. खातरजमा काहीही करत नाहीत. ती चूक करु नका, योग्य माहितगार माणसाचा सल्ला घ्या.
५. आपल्याला काय होणार, आपल्याला कशाला हवा वैद्यकीय विमा, होईल तेव्हा पाहू असं ते म्हणतात पण आजारपण कुणालाही कधीही येऊ शकतं.


(लेखक आर्थिक सल्लागार आहेत.)

Web Title: Should you buy medical insurance on a Diwali budget? You really think about yourself and your family.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.