Join us  

फंक्शनसाठी खास ग्लॅमरस लूक हवाय, 'मांग टिका' पुन्हा इन! विद्या बालनसह सेलिब्रिटीही मांग टिकाच्या प्रेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 5:53 PM

आपणही खुलवू शकतो आपला लग्नातील लूक; परफेक्ट लूकसाठी मांग टिक्याचा हटके पर्याय...

ठळक मुद्देकाही वर्षांपूर्वी असणारी बिंदीची फॅशन नव्याने पुन्हा इनपाहा विद्या बालनचा मांग टिकीमधील हटके अंदाज

सण समारंभ म्हटला की पारंपरिक लूक आलाच. वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांचे ट्रेंड फॅशन इन असतानाच हल्ली बाजारात दागिन्यांचेही बरेच प्रकार पाहायला मिळतात. बॉलिवूड अभिनेत्री आणि छोट्या पडद्यावरही या दागिन्यांची फॅशन पाहायला मिळते. मग तरुणाईमध्ये ती फॅशन फॉलो केली जाते. फॅशन ट्रेंड वेगाने बदलत असतानाच दागिन्यांमध्ये मोठे कानातले, नाकात घालायच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नथी किंवा नोज पीन, मंगळसूत्रांचे हटके डिझाइन्स यांबरोबरच आणखी एक प्रकार सध्या ट्रेंडिंग आहे तो म्हणजे मांग टिका.

काही वर्षांपूर्वी बिंदी हा प्रकार तरुणींमध्ये बराच प्रसिद्ध होता, तिच फॅशन आता पुन्हा इन झाली असून त्याला मांग टिका म्हटले जाते. लग्नसमारंभात, एखाद्या सणाला साधारणपणे घागरा, लेहंगा यांसारख्या कपड्यांवर मांग टिका घालायची फॅशन सध्या जोरात आहे. 

प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन हिने नुकताच आपला एक व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये ती काळ्या रंगाच्या अतिशय सुंदर अशा लेहंग्यात एकदम खुलून दिसत आहे. इतकेच नाही तर या लेहंग्यावर तिने बाकी कोणतेच दागिने घातलेले नसून एक मोठा ऑक्सिडाइजचा मांग टिका घातल्याचे दिसत आहे. यात तिचा लूकही एकदम नॅचरल करण्यात आला असून विद्या नेहमीप्रमाणेच स्वत:ला अगदी परफेक्ट कॅरी करत असल्याचे दिसत आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओला तिच्या फॅन्सनी प्रचंड प्रतिसाद दिला असून तिच्या देखण्या रुपाची स्तुती करणाऱ्या असंख्य प्रतिक्रिया यावर आल्या आहेत. तिचा हा लेहंगा ४५ हजारांचा असून त्यातील विद्याचा अंदाज आपल्याला पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पाडणारा आहे. 

सध्या कोरोनामुळे एकत्र येऊन कार्यक्रम करण्यावर बरेच निर्बंध लावण्यात आले आहेत. बंदी क लग्नसमारंभांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. लग्नसमारंभांना केवळ ५० लोकांच्या उपस्थितीचे बंधन असल्याने अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींच्या लग्नांना उपस्थित राहता येत नाही. यातच विद्याने या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे, ‘ज्या लग्न आणि वरातींमध्ये मला उपस्थित राहता आले नाही, ते मी मिस करत आहे.’ त्यामुळे तुम्हालाही थोडी हटके आणि वेगळई फॅशन ट्राय करायची असल्यास तुम्ही लेहंग्यावर इतर कोणतेही दागिने न घालता अशाप्रकारे मांग टिका घालून तुमचा लूक खुलवू शकता. सध्या अनेक तरुणी अशाप्रकारचा मांग टिका घालण्याला पसंती देत असल्याचे दिसते. 

 

टॅग्स :खरेदीब्यूटी टिप्सफॅशन