Lokmat Sakhi >Shopping > Easy Cleaning Hacks : कपड्यांवरचे डाग निघता निघत नाहीत? वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना ट्राय करा ४ लिक्विड डिटर्जंट

Easy Cleaning Hacks : कपड्यांवरचे डाग निघता निघत नाहीत? वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना ट्राय करा ४ लिक्विड डिटर्जंट

Easy Cleaning Hacks :मशीनमध्ये कपड्यासाठी कोणते लिक्वीड घातले तर डाग लवकर निघतील असा प्रश्न तमाम महिलांना पडतो. याच प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 01:55 PM2022-03-15T13:55:49+5:302022-03-15T14:12:20+5:30

Easy Cleaning Hacks :मशीनमध्ये कपड्यासाठी कोणते लिक्वीड घातले तर डाग लवकर निघतील असा प्रश्न तमाम महिलांना पडतो. याच प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न...

Stains on clothes do not go away? When washing clothes in the washing machine, try 4 liquid Detergent | Easy Cleaning Hacks : कपड्यांवरचे डाग निघता निघत नाहीत? वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना ट्राय करा ४ लिक्विड डिटर्जंट

Easy Cleaning Hacks : कपड्यांवरचे डाग निघता निघत नाहीत? वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना ट्राय करा ४ लिक्विड डिटर्जंट

Highlightsकपड्याचे हट्टी डाग निघण्यासाठी पावडरपेक्षा लिक्विड सोप केव्हाही फायदेशीर वॉशिंग मशीनसाठी सोयीचे आणि झटपट डाग घालवणारे लिक्विड सोप कोणते याविषयी...

कपड्यांना एकदा डाग पडले की ते निघणे कठिण. मग हे डागाळलेले कपडे घालायला नको वाटते,  आणि इतके महागडे कपडे कपाटात तसेच पडून राहतात. कधी अन्नाचे तर कधी चिखलाचे, कधी रंगाचे पडलेले हे डाग काही केल्या निघता निघत नाहीत. काही वेळा तर ड्रायक्लिनींगला टाकूनही हे डाग निघत नाहीत. हाताने कपडे घासण्याचा जमाना आता बराच मागे गेला आणि आता घरोघरी कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आल्या. यातून फारसे कष्ट न घेता कपडे धुतले जात असतील तरी त्यावरचे हट्टी डाग काढणे वॉशिंग मशीनलाही अवघडच जाते (Easy Cleaning Hacks). मग डाग घासून कपडे मशीनला टाकण्याचा एक मध्यम मार्ग काढला जातो. पण त्यामुळेगी डाग निघत नसतील तर त्यावर काहीतरी चांगला उपाय हवाच असे आपल्याला वाटते. साबणाच्या पावडरपेक्षा लिक्विड डिटर्जंट हे डाग काढण्यासाठी बहुदा जास्त उपयुक्त ठरतो (Best liquid detergent for cleaning cloths in washing machine). अशावेळी मशीनमध्ये कपड्यासाठी कोणते लिक्वीड घातले तर डाग लवकर निघतील असा प्रश्न तमाम महिलांना पडतो. याच प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न...

(Image : Google)
(Image : Google)

१. Surf Excel Matic Front Load Liquid Detergent 

कपड्यांवर पडलेले हट्टी डाग निघण्यासाठी सर्फ एक्सेलचे हे लिक्विड अतिशय उत्तम पर्याय आहे. हे लिक्विड घातल्यानंतर कपड्यांवरचे डाग १००% निघतात असे कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे तुमच्याकडेही लहान मुले असतील किंवा इतर कपड्यांनाही सतत कसले ना कसले डाग पडत असतील तर हा पर्याय उत्तम आहे. डॉप लोडींग मशीनसाठी हे लिक्विड उपयुक्त असून या लिक्विडचा सुगंध इतका छान आहे की त्यामुळे कपड्यांचा फ्रेशपणा आणखी वाढेल. ४ लीटरचा पॅक अॅमेझॉनवर ८७० रुपयांना आहे.

२. Midon Liquid Detergent 5L 

 हा लिक्विड सोप ५ लीटरच्या पॅकमध्ये मिळत असला तरी अतिशय उपयुक्त आहे. हे लिक्विड सर्व प्रकारच्या वॉशिंग मशीनसाठी उपयुक्त आहे. कपड्यांचे कोणतेही नुकसान न होता कपडे स्वच्च आणि चमकदार बनवण्यासाठी कपडे धुण्यासाठी या लिक्विडचा वापर करणे अतिशय फायदेशीर ठरते. ५ लीटरचा पॅक अॅमेझॉनवर ७४० रुपयांना आहे.

३. Ariel Matic 3in1 PODs Liquid Detergent

एरीयल ही डिटर्जंटमधील बरीच जुनी कंपनी असून काळानुसार त्यांनीही आपल्या उत्पादनांमध्ये बदल केला आहे. डब्याच्या आकारात येणारा या लिक्विडचा पॅक अतिशय आकर्षक आहे. कपडे स्वच्छ होण्याबरोबरच कपड्यावरील डाग काढणे आणि कपड्यांना चमक देण्यासाठी हे लिक्विड उपयुक्त ठरते. केमिकल फ्री असलेल्या या लिक्विडची किंमतही इतर लिक्विडपेक्षा बजेटमध्ये बसणारी आहे. हा पॅक २५ टक्के ऑफरसह अॅमेझॉनवर ५२८ रुपयांना आहे. 

(Image : Google)
(Image : Google)

४. Niks® Liquid Detergent 5L

५ लिटरच्या पॅकमध्ये मिळणारे हे लिक्विड कपड्यांवरचे डाग घालवण्यासाठी अतिशय चांगला पर्याय आहे. केवळ मशीनसाठीच नाही तर तुम्ही हाताने कपडे धुणार असाल तरी याचा चांगला उपयोग होऊ शकतो. कपडे स्वच्छ होण्याबरोबरच कपड्यांना एकप्रकारचा सुगंध येण्यासाठी या लिक्विडचा चांगला उपयोग होतो. 

Web Title: Stains on clothes do not go away? When washing clothes in the washing machine, try 4 liquid Detergent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.