घरातील बेडवर घातलेल्या बेडशीटस घराला व बेडला एक उत्तम लूक देतात. घरात काही खास प्रसंग असला किंवा सणवार जवळ आले की आपण घर सजावटीला लागतो. घर सजावटी करता आपण नवीन बेडशीट्स, पडदे, इतर घरगुती सजावटीच्या वस्तू हमखास घेतो. सणवार म्हटल्यावर घरात चार पाहुणे येणार म्हटल्यावर आपलं घर सुंदर दिसावं असं प्रत्येकाला वाटत असत. यासाठीच आपण बेडरुम मधील बेडशीटस पासून ते किचनमधील वस्तूंपर्यंत गरजेच्या लागणाऱ्या सगळया वस्तू नवीन विकत घेतो(Stop Making These 5 Mistakes While Buying Bed Sheets)
सध्या सणवाराचे दिवस सुरु असल्याने बाजारांत अनेक प्रकारच्या बेडशीट्स विकायला ठेवलेल्या असतात. वेगवेगळ्या पॅटर्नच्या फॅब्रिकच्या या बेडशीट्स बघून आपण काहीवेळा (What are some common mistakes people make when shopping for bed sheets?) कन्फ्युज होतो. नक्की कोणत्या प्रकारची बेडशीट खरेदी करावी याबाबत काहीवेळा आपल्यापुढे प्रश्नचिन्ह उभे राहते. काहीवेळा सणावाराच्या खरेदीच्या गडबडीत किंवा सेल, डिस्काउंट, ऑफर्स याच्या नादात (What are some common mistakes people make when shopping for bed sheets ? ) आपण कोणतीही वस्तू उचलून खरेदी करुन आणतो. त्यानंतर जर ती वस्तू चांगल्या क्वालिटीची निघाली नाही तर पैसे वाया जाण्यासोबतच आपल्याला पश्चाताप (5 Mistakes To Avoid When Buying Bed Sheets) देखील होतो. सहसा, आपण बेडशीटचा रंग किंवा प्रिंट पाहतो आणि आपल्याला ते आवडल्यास, आपण विचार न करता चटकन खरेदी करतो. परंतु असे असले तरीही या बेडशीट्स खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते(5 Bed Sheet Buying Mistakes and How to Avoid Them).
बेडशीटस खरेदी करताना हमखास होणाऱ्या चुका टाळा...
चूक १ :- बेडशीटसच्या फॅब्रिककडे दुर्लक्ष करणे किंवा तपासून न घेणे.
बेडशीटस खरेदी करताना अनेकदा आपण त्याची प्रिंट किंवा रंग पाहून बेडशीट खरेदी करतो. असे करत असताना आपण त्याच्या फॅब्रिकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आजकाल बाजारात कॉटनपासून सिल्क आणि लोकरीपर्यंत अनेक फॅब्रिक्सच्या बेडशीट उपलब्ध आहेत. त्यामुळे हवामान आणि आपल्या गरजा लक्षात घेऊन फॅब्रिकची निवड करावी.
चूक २ :- बेडवरील गाद्याच्या आकाराचा व साईजचा विचार न करताच बेडशीट्स निवडणे.
बेडशीट खरेदी करताना आपण ही एक सामान्य चूक हमखास करतोच. काहीवेळा आपल्या सिंगल आणि डबल बेडचा आकार हा वेगवेगळा असतो. हा आकार व साईज लक्षात घेऊन बेडशीट्स निवडणे गरजेचे असते. काहीवेळा आपण आपल्या घरात कस्टम मेड वेगवेगळ्या आकाराचे बेड बनवून घेतो. अशा बेड्ससाठी बेडशीटस विकत घेताना त्याच्या साईजकडे आवर्जून लक्ष द्यावे. अशा परिस्थितीत, जर गादीचा आकार आधीच मोजला गेला नाही, तर कदाचित बेडशीट बेडसाठी खूप मोठी किंवा लहान पडू शकते. जर आपल्याकडे किंग साईज बेड असेल तर बेडशीट्स पण किंग साईज लागतील.
चूक ३ :- अतिशय स्वस्तातील किंवा फारच कमी दारातील बेडशीट्स खरेदी करणे.
आजकाल बाजारात बेडशीट अगदी कमी किमतीत मिळत असल्याने, बेडशीट खरेदी करताना आपण अनेकदा त्याच्या किमतीकडे पाहतो. तसेच, कमी किमतीत बेडशीट खरेदी करायची आहे. पण अतिशय स्वस्त बेडशीटचा दर्जाही तितकासा चांगला नसतो. अशा स्थितीत ही बेडशीट लुक तर देत नाहीच व ती लवकर खराब देखील होते.
ऑनलाइन लिपस्टिक खरेदी करताना लक्षात ठेवा ७ गोष्टी, योग्य लिपस्टिक निवडण्याची ही घ्या टेस्ट!
चूक ४ :- विशेष प्रसंगासाठी खास बेडशीट खरेदी करणे.
काहींना फक्त खास प्रसंगी बेडशीट खरेदी करण्याची सवय असते. उदाहरणार्थ, ते दिवाळी, ख्रिसमस किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी बेडशीट खरेदी करतात. जे त्या प्रसंगी पूर्णपणे जुळतात. अशा परिस्थितीत, त्या प्रसंगी त्या बेडशीट्स चांगल्याही दिसतात, परंतु नंतर त्या वापरणे कठीण होते. त्यामुळे वर्षभर बेडशीट अशीच पडून राहते.
चूक ५ :- बेडशीट विकत घेताना ऋतूचा विचार करुन बेडशीट खरेदी करणे गरजेचे असते.
बेडशीट विकत घेताना ऋतूंचा विचार लक्षात ठेवणे खूप महत्वाचे असते. परंतु बरेचदा आपण ते विसरतो. आपण ऋतू लक्षात घेऊन प्रिंट आणि रंग निवडत नाहीत. उदाहरणार्थ, जर उन्हाळ्याचा हंगाम असेल तर फ्लोरल प्रिंट्स आणि अनेक चमकदार रंग चांगले दिसतील. यासोबतच तुम्हाला तुमच्या खोलीत एक प्रकारची नवीन ऊर्जा जाणवेल.
उन्हाळ्यात ‘कुल’ दिसण्यासाठी कुर्त्यांचे ५ ट्रेंडी प्रकार तुमच्याकडे आहेत का? पाहा फोटो....