Lokmat Sakhi >Shopping > होळीसाठी करा मठ्ठा! पाहा भन्नाट 'कर्ड स्ट्रेनर', करते घट्ट दही झटपट, उन्हाळ्यात फार कामाची गोष्ट...

होळीसाठी करा मठ्ठा! पाहा भन्नाट 'कर्ड स्ट्रेनर', करते घट्ट दही झटपट, उन्हाळ्यात फार कामाची गोष्ट...

Stop Using Traditional Method For Making Hung Curd Use Yogurt Strainer : How To Use Yogurt Strainer : How to make hung curd without muslin cloth : दह्यातील पाणी काढून टाकण्यासाठी आता तासंतास दही लटकवत ठेवण्याची गरज नाही, वापरा हे मस्त उपयोगी भांडं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2025 17:53 IST2025-03-01T17:35:02+5:302025-03-01T17:53:05+5:30

Stop Using Traditional Method For Making Hung Curd Use Yogurt Strainer : How To Use Yogurt Strainer : How to make hung curd without muslin cloth : दह्यातील पाणी काढून टाकण्यासाठी आता तासंतास दही लटकवत ठेवण्याची गरज नाही, वापरा हे मस्त उपयोगी भांडं....

Stop Using Traditional Method For Making Hung Curd Use Yogurt Strainer How To Use Yogurt Strainer | होळीसाठी करा मठ्ठा! पाहा भन्नाट 'कर्ड स्ट्रेनर', करते घट्ट दही झटपट, उन्हाळ्यात फार कामाची गोष्ट...

होळीसाठी करा मठ्ठा! पाहा भन्नाट 'कर्ड स्ट्रेनर', करते घट्ट दही झटपट, उन्हाळ्यात फार कामाची गोष्ट...

आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या घरी अजूनही ताजे दही तयार केले जाते. घरच्याघरीच दही तयार करण्याची ही पद्धत सोपी असली तरीही काहीजणी कंटाळा करुन काहीवेळा दही बाहेरुन विकतच आणतात. बाहेरुन विकत आणलेले दही आपल्या घरच्या दह्यासारखे जाड, घट्टसर, दाट, मलईदार अजिबातच नसते. विकतचे दही बऱ्यापैकी पातळ असते तसेच (How To Use Yogurt Strainer) ते घट्ट आणि दाटसर देखील नसते. अशावेळी या दह्यातील जास्तीचे जास्तीचे (Stop Using Traditional Method For Making Hung Curd Use Yogurt Strainer) पाणी काढून टाकण्यासाठी आपण शक्यतो दही एका मोठ्या स्वच्छ सुती किंवा मलमलच्या कापडात गुंडाळून बेसिनच्या नळाला किंवा किचनमध्ये एका कोपऱ्यात टांगून ठेवतो.

दह्याला असे टांगून ठेवल्याने त्यातील जास्तीचे पाणी निथळून जाऊन आपल्याला जाडसर, घट्ट दही मिळते. याचबरोबर, श्रीखंडासाठी मठ्ठा किंवा कढीसाठी दही किंवा घरात काही विशेष इतर पदार्थ तयार करण्यासाठी काहीवेळा जाडसर घट्ट दह्याची गरज असते. अशावेळी दह्यातील जास्तीचे पाणी काढून टाकण्यासाठी दही टांगून ठेवण्याची जुनी पद्धत (How to make hung curd without muslin cloth) वापरण्यापेक्षा आपण 'कर्ड स्ट्रेनर' या एका जादुई भांड्याचा वापर करु शकतो. 'कर्ड स्ट्रेनर' हे जादुई भांड नेमकं आहे तरी काय? किंवा दह्यातील पाणी काढण्यासाठी त्याचा वापर कसा करायचा ते पाहूयात.      

 'कर्ड स्ट्रेनर' म्हणजे काय ? 

'कर्ड स्ट्रेनर' (Yogurt Strainer) म्हणजे दही गाळण्याची एक प्रकारची खास गाळणीच आहे असं म्हटलं तरी चालेल. 'कर्ड स्ट्रेनर' हे एक प्रकारचे उभट आकाराचे भांडे असते, ज्यातून दही अगदी व्यवस्थित गाळले जाते. या भांड्याचा वापर करून आपण दह्यातील जास्तीचे पाणी काढून टाकून दही अधिक घट्ट व दाटसर करु शकतो.

हे भांड ऍक्रॅलिक मटेरियलपासून तयार केलेलं एक छोटंसं भांड आहे. यात एक मोठ्या आकाराचा उभट डबा असतो या डब्याच्या आत एक छोटा  गाळणीसारखे छिद्र असणारा डबा बसवलेला असतो. या डब्याला गाळणीसारखीच जाळीदार अशी गाळणी असते.

दूध वारंवार ऊतू जातं? घरी आणा हे भन्नाट 'मिल्क बॉयलर' दूध ऊतूच जाणार नाही...


‘इडली लायनर’ नावाची ही भन्नाट वस्तू विकत आणा, इडल्या निघतील परफेक्ट, चिकटणार-तुटणार नाहीत...

आपण या जाळीदार छोट्याशा डब्यांत दही ओतून वर डब्याचे झाकण लावून घ्यावे. या डब्याच्या झाकणाला एका छोटेसे छिद्र असते, ज्यातून हवा आत - बाहेर केली जाऊन दही बंद डब्यांत खराब होत नाही. असे हे दही भरलेले भांडे आपण फ्रिजमध्ये किंवा किचनच्या ओट्यावर एका कोपऱ्यात अगदी सहज पद्धतीने ठेवू शकतो. यामुळे रात्रभर या भांड्यात दही स्टोअर करुन ठेवल्याने सकाळपर्यंत यातील जास्तीचे पाणी बाहेर निघून या 'कर्ड स्ट्रेनर' च्या बाहेरील डब्यांत साठवले जाते. इतके सोपे आहे हे 'कर्ड स्ट्रेनर' वापरणे. 

किंमत आणि रेटिंग...

हे 'कर्ड स्ट्रेनर' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या 'कर्ड स्ट्रेनर'ला ४.७ इतके रेटिंग देण्यांत आले. हे 'कर्ड स्ट्रेनर' आपल्याला ६०० रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंत अगदी सहज विकत मिळते. असे हे 'कर्ड स्ट्रेनर' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/41orLa2

Web Title: Stop Using Traditional Method For Making Hung Curd Use Yogurt Strainer How To Use Yogurt Strainer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.