Join us  

Styling Tips : टिशर्ट, वनपीस घालायला खूप आवडतं पण पोटामुळे टाळता? पोट मोठ दिसू नये, यासाठी हे घ्या फॅशन हॅक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 4:34 PM

Styling Tips : टी शर्ट किंवा जिन्स टॉपमध्ये पोटाचा भाग सहज दिसून येतो. त्यामुळे असे कपडे घालणं टाळलं जातं.

खाण्यापिण्यातील अनियमितता, व्यायामाचा अभाव सतत बाहेरचं खाणं यामुळे नकळतपणे वजन वाढत जातं. एकदा वजन, अंगारवरची चरबी वाढली की कमी होता होत नाही. हार्मोनल असंतुलन, गर्भधारणा अशा अनेक कारणांमुळे एक्स्टा फॅट जमा होतं. त्यामुळे महिला कुर्ते, पंजाबी ड्रेस जास्तीत जास्तवेळा घातलात. टी शर्ट किंवा जिन्स टॉपमध्ये पोटाचा भाग सहज दिसून येतो. त्यामुळे असे कपडे घालणं टाळलं जातं. म्हणूनच वनपीस किंवा टि शर्टवर पोट दिसू नये यासाठी काही स्टायलिंग टिप्स सांगणार आहोत. ( Best fashion hack to hide stomach while carrying fashion)

पोटाचा भाग थोडा लूज असेल असे कपडे निवडा

पोटावर घट्ट बसेल असा कोणताही ड्रेस किंवा टिशर्ट निवडू नका. पोटाच्या बाजून कपडे सैल असतील असं पाहा. कपड्यांची निवड करताना घाई करू नका. स्किनी कपडे घातलाना पोट असेल तर कपड्याचा ताण पोटाकडे येतो. त्यामुळे अशावेळी तुम्ही जॅकेट किंवा कोट असं काहीतरी कॅरी करा. बॉडीकॉन ड्रेस घालायचा असेल तर तुम्ही गडद रंगाचे कपडे निवडा. त्यात तुम्ही अधिक सुंदर आकर्षक दिसाल. 

फ्रिल किंवा अनारकली घेरचे टॉप्स निवाडा

पोटाचा घेर जास्त असेल तर फ्रिलचे, अनारकली टाईप टॉप बेस्ट आहेत.  असे कपडे घातल्यामुळे तुम्ही एकदम कुल दिसता. त्यामुळे अनारकली या प्रकारातील तुम्ही कपडे निवडण्यात काहीही हरकत नाही.

क्रॉप टॉप

तुम्ही क्रॉप टॉप घालण्यासाठी को – आर्ड लूक करू शकता.  तुम्ही क्रॉप टॉपसह हाय वेस्ट स्कर्ट घालून को-आर्ड लुक करता येऊ शकतो. या कपड्यांमध्ये तुम्हाला खूप आरामदायक फिल मिळेल. क्रॉप टॉप न घालण्याचं कारण तुम्ही जाड आहात हे असू शकत नाही. हा ट्रेंड खास फिगरसाठी तयार केलेला असतो.  प्रत्येक महिला साजेसा वाटेल अशी आऊटफिट्सशी रचना केलेली असते. 

स्कार्फ वापरा

जर तुमचा टॉप किंवा टिशर्ट जास्त घट्ट असेल तर तुम्ही  स्कार्फ कॅरी करू शकता.  पोटाचा भाग झाकण्यासाठी स्कार्फचा उपयोग करावा. गळ्याभोवती थोडा फॅन्सीपद्धतीने स्कार्फ बांधला तर तो अधिक चांगला दिसतो. ड्रेसला सुट होईल असा कोणताही स्कार्फ तुम्ही वापरू शकता. 

टॅग्स :खरेदीस्टायलिंग टिप्सफॅशन