Lokmat Sakhi >Shopping > कमाल! आता बाजारात आली 'पुष्पाराज' साडीची नवी फॅशन; वाचा या पुष्पा प्रिंट साडीची खासियत

कमाल! आता बाजारात आली 'पुष्पाराज' साडीची नवी फॅशन; वाचा या पुष्पा प्रिंट साडीची खासियत

Surat cloth pushpa movie saree srivalli viral :  विक्रेत्यांकडून वारंवार मागणी झाल्यानंतर अखेर ही साडी  बाजारात विक्रीस उपलब्ध झाली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 07:23 PM2022-02-11T19:23:52+5:302022-02-11T19:41:29+5:30

Surat cloth pushpa movie saree srivalli viral :  विक्रेत्यांकडून वारंवार मागणी झाल्यानंतर अखेर ही साडी  बाजारात विक्रीस उपलब्ध झाली आहे

Surat cloth pushpa movie saree srivalli viral trending gujarat | कमाल! आता बाजारात आली 'पुष्पाराज' साडीची नवी फॅशन; वाचा या पुष्पा प्रिंट साडीची खासियत

कमाल! आता बाजारात आली 'पुष्पाराज' साडीची नवी फॅशन; वाचा या पुष्पा प्रिंट साडीची खासियत

साऊथ स्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या पुष्पा चित्रपटाचा क्रेझ भारतभरातील लोकांमध्य दिसून येतोय. सोशल मीडियावरपुष्पा चित्रपटातील गाण्यांनी तुफान धुमाकूळ घातलाय. पुष्पा चित्रपटाचे डायलॉग्स आणि एक्टिंग स्टाईल सगळेचजण कॉपी करत आहेत. अशातच आता पुष्पा सिनेमाची झलक साड्यांवरही पाहायला मिळत आहे. (Surat cloth pushpa movie saree srivalli viral trending gujarat)

आशियातील सगळ्यात मोठं मार्केट मंडई सुरत येथे पुष्पा पोस्टर साडी तयार करण्यात आली आहे.  विक्रेत्यांकडून वारंवार मागणी झाल्यानंतर अखेर  ही साडी बाजारात विक्रीस उपलब्ध झाली आहे. सुरतच्या कापड मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या विकल्या जातात.

आता पुष्पा चित्रपटातील दृश्यांचे प्रिंट होऊन साडी बाजारात विक्रीस उपलब्ध झाली आहे. सुरतमधील चरणजीत क्रियेशन नावाच्या साडीच्या  दुकानात चरणपाल सिंग यांनी पुष्पा सिनेमाच्या पोस्टरची साडी तयार केली आहे. चित्रपटाची लोकप्रियता पाहता त्यांनी ही साडी बाजारात आणली.

ब्रेस्ट कॅन्सरचं कारण ठरतात साधी वाटणारी ५ लक्षणं; गंभीर आजार टाळण्यासाठी वेळीच जाणून घ्या

या साडीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चरणपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्र, उत्तरप्रदेश,  छत्तीसगड, बिहार, मध्यप्रदेश या राज्यातून या साडीला मागणी वाढली आहे. याआधीही लुंगी डान्स साडी, विविध राजकीय नेत्यांच्या प्रिंट्सच्या साड्यांना मागणी होती.

कोण म्हणतं व्हेज खाण्यातून प्रोटिन मिळत नाही, ४ पदार्थ रोज खा; फिट राहा

छंद आणि व्यावसायिक पातळीवर स्थानिक कापड व्यापारी असे प्रयोग वेळोवेळी करत आहेत. 2014 फिफा विश्वचषक असो की इतर राजकीय निवडणूका साड्यांवर नेहमीच  लेटेस्ट थिम साकारून ग्राहकांसाठी नवनवीन पर्याय उपलब्ध करून दिले जातात.

Web Title: Surat cloth pushpa movie saree srivalli viral trending gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.