Lokmat Sakhi >Shopping > फक्त २५० रुपयांत घ्या 'टॅप एक्सटेंडर', किचन सिंकसाठी वरदान - पाहा गरागरा फिरणारी मस्त वस्तू...

फक्त २५० रुपयांत घ्या 'टॅप एक्सटेंडर', किचन सिंकसाठी वरदान - पाहा गरागरा फिरणारी मस्त वस्तू...

Shopping : Product Reivew : Tap Extender For Kitchen Sink : How To Use a Tap Extender : सिंकमधील नळाला लावा 'टॅप एक्सटेंडर'...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2025 16:11 IST2025-01-15T16:10:22+5:302025-01-15T16:11:16+5:30

Shopping : Product Reivew : Tap Extender For Kitchen Sink : How To Use a Tap Extender : सिंकमधील नळाला लावा 'टॅप एक्सटेंडर'...

Tap Extender For Kitchen Sink How To Use a Tap Extender | फक्त २५० रुपयांत घ्या 'टॅप एक्सटेंडर', किचन सिंकसाठी वरदान - पाहा गरागरा फिरणारी मस्त वस्तू...

फक्त २५० रुपयांत घ्या 'टॅप एक्सटेंडर', किचन सिंकसाठी वरदान - पाहा गरागरा फिरणारी मस्त वस्तू...

किचन सिंक म्हणजे फार महत्वाची जागा. सिंकमध्ये आपण भांडी धुण्यापासून ते फळं - भाज्या धुवून स्वच्छ करण्यापर्यंत अनेक गोष्टी करतो. परंतु काहीवेळा सिंकच्या बाहेर पाणी (Tap Extender For Kitchen Sink) पडते. तर कधी भाजी-फळं लहान सिंकमध्ये नीट धुता येत नाहीत. काहीवेळा नळाच्या पाण्याला फारच कमी प्रेशरने पाणी येत असल्यामुळे स्वच्छता नीट हाेत नाही(How To Use a Tap Extender).

अशावेळी आपल्या बेसिनचा नळ हा आपल्याला हवा तसा चारही बाजूंना फिरवता येईल असा हवा, असं अनेकजणींना वाटतं. इतकंच नाही तर काहीवेळा सिंकचा नळ हा खूप उंचावर मागे लावलेला असतो यामुळे नळाखाली स्वच्छतेची कामे करताना आपल्याला सतत वाकावे लागते. परिणामी, पाठ दुखून येते. अशावेळी आपण या 'टॅप एक्सटेंडरचा' वापर(Say goodbye to messy sinks and uneven water flow) करु शकतो. नेमकं हे 'टॅप एक्सटेंडर' म्हणजे काय, त्याचा वापर कसा करायचा ते पाहूयात.     

'टॅप एक्सटेंडर' म्हणजे काय ?

'टॅप एक्सटेंडर' हे सिंकच्या नळाला लावण्यासाठीची एक महत्वाची आणि गरजेची अशी वस्तू आहे. 'टॅप एक्सटेंडर' हा एक प्रकारचा छोटा नळच असतो. या नळाच्या वरच्या बाजूला एक विशिष्ट प्रकारचे छोटे हुक असते. हे हुक आपण सिंकच्या नळात अगदी सहजपणे बसवू शकतो. अशाप्रकारे आपण सिंकच्या नळात हा 'टॅप एक्सटेंडर' बसवला की आपण तो अगदी ३६० डिग्री कोणत्याही बाजूला फिरवू शकतो.

चपाती लाटताना पीठ ओट्यावर फार सांडते? ही 'फ्लावर डस्टर' आयडिया पाहा, ओट्यावर पसारा होतच नाही...

याचबरोबर हलकेच तो खेचून नळ आपल्याला हवा तसा पुढे मागे फिरवू शकतो. अशा प्रकारे आपण नळ आपल्याला हवा तसा कुठल्याही बाजूला फिरवू शकतो, जेणेकरून सिंकमध्ये आपल्या अनेक काम पटापट करता येऊ शकतात. या नळावर एक छोटेसे बटण देखील असते त्या बटणाचा वापर करून आपण पाण्याचा फ्लो देखील आपल्याला हवा तसा कमी - जास्त करु शकतो. 

काय आश्चर्य, भाजीत मीठ घालायचं कामच नाही, ‘हा’ इलेक्ट्रिक चमचा स्वत:च करतो चविष्ट काम!

 

जर आपल्याला फळं धुवायची असतील तर पाण्याचा फ्लो जास्त वेगाने करु शकतो. याउलट, जर हिरव्या कोवळ्या पालेभाज्या धुवून स्वच्छ करायच्या असतील तर पाण्याचा फ्लो कमी ठेवू शकतो. याचबरोबर, काहीवेळा किचन सिंकची स्वच्छता करायची असल्यास हा नळ मुव्हेबल असल्याने सिंकच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत वळून कानाकोपऱ्याची स्वच्छता करु शकतो. तसेच हा नळ आपल्याला नको असेल तेव्हा काढून देखील ठेवता येतो. अशाप्रकारे या नळाचा वापर करून पाण्याचा फ्लो आपण पाहिजे तसा सेट करू शकतो. त्याचबरोबर ज्या बाजूला हवा त्या बाजूला गरजेनुसार वळवू देखील शकतो. या सगळ्या गोष्टींमुळे किचन सिंकमध्ये आपण आपल्या गरजेनुसार सगळी काम अगदी पटापट करू शकतो.  

फॅनला कोण कव्हर घालतं? सतत पंखे पुसण्याचा त्रास होतो बंद, पाहा स्वस्तात मस्त उपाय...


हा 'टॅप एक्सटेंडर' आपल्याला बाजारांत अगदी सहज विकत मिळतो. आपण ऑनलाईन देखील वेगवेगळ्या शॉपिंग साईट्सवरून हा 'टॅप एक्सटेंडर' खरेदी करू शकता. हा 'टॅप एक्सटेंडर' आपल्याला ऑनलाईन अगदी स्वस्त दारात विकत मिळेल. २५० ते ८०० रुपयांपर्यंत हा 'टॅप एक्सटेंडर' अगदी सहज विकत मिळतो. असा हा बहूउपयोगी 'टॅप एक्सटेंडर' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 
https://amzn.to/4j8nlfP

Web Title: Tap Extender For Kitchen Sink How To Use a Tap Extender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.