नवरात्रीनंतर सर्वांनाच दिवाळी (Diwali 2024) या सणाची ओढ लागते. दिवाळी म्हटलं, की रोषणाई, फटाके, साफसफाई, खरेदी, फराळ इत्यादी. साफसफाई आणि फराळ बनवून झाल्यानंतर आपण शॉपिंगकडे वळतो (Online Shopping). दिवाळी येण्याआधी महिलावर्ग बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी करतात (Shopping). महिला साडी, ड्रेस खरेदीमध्ये व्यस्थ होऊन जातात. पण सध्या ऑनलाइन शॉपिंगचा जमाना आहे. प्रत्येक गोष्ट ऑनलाइन मिळत आहे(The Ultimate Saree Buying Guide: Tips & Advice).
ऑनलाइन शॉपिंग साईट्सही बरेच उपलब्ध आहेत. ज्यातून आपण वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सचे कपडे खरेदी करू शकतो. पण बऱ्याचदा शॉपिंग साईट्सवर दिसणारी गोष्ट, तशीच असेल असे नाही. ज्यामुळे आपला हिरमोड होतो. आणि आपण पार्सल रिटर्न करतो. वाट पाहून जर मनासारखी वस्तू आली नाही तर, निश्चितच मन उदास होतं. जर आपण ऑनलाइन साडी खरेदी करत असाल, पण साडी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे ठाऊक नसेल तर, काही टिप्स फॉलो करा. मनासारखी शॉपिंग होईल.
डीटेल्स चेक करा
साडी असो किंवा इतर वस्तू, ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी डीटेल्स तपासून घ्या. सहसा ऑनलाइन साईट्सवर साड्यांचे फोटो शक्य तितक्या चांगल्या प्रकारे सादर केले जातात. परंतु साडीचा वास्तविक आकार आणि डिझाईन फोटोद्वारे कळू शकत नाही. त्यामुळे शॉपिंग साईट्समधून कोणतीही साडी खरेदी करण्यापूर्वी त्याचे डीटेल्स बारकाईने तपासून घ्या.
हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी
रिव्ह्यू जरूर वाचा
साडीचे डीटेल्स पाहिल्यानंतर, त्याचे रिव्ह्यू वाचणे महत्वाचे आहे. आपल्याहून बरीच लोक प्रॉडक्ट खरेदी करतात. ते रिव्ह्यू मांडतात. शिवाय काही जण फोटो पोस्टही करतात. त्यामुळे साडी असो किंवा इतर प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी रिव्ह्यू जरूर वाचा.
रिटर्न पॉलिसी तपासा
ऑनलाइन साडी खरेदी करणे हा एक सुरक्षित पर्याय आहे परंतु तरीही अशी परिस्थिती असू शकते जिथे तुम्हाला ऑर्डर केलेले उत्पादन आवडणार नाही. अशावेळी तुम्हाला तुमची ऑर्डर परत करावी लागेल. त्यामुळे साडी खरेदी करण्यापूर्वी रिटर्न पॉलिसी तपासून पहा.
साडी ब्रँडेड असावी
साडी खरेदी करताना ब्रँड देखील तपासा. ब्रँडेड साड्या कमी दर्जाच्या नसतात. त्यामुळे त्या खराब असतील असे नाही. त्यामुळे कपडे किंवा साड्या खरेदी करण्यापूर्वी ब्रँड तपासा.