Lokmat Sakhi >Shopping > थंडीत अंगावर शोभतो ट्रेंडी वूलन टॉप, पाहा ५ स्टायलिश पर्याय - स्वस्तात मस्त, हिवाळ्यात दिसा सुपरकुल

थंडीत अंगावर शोभतो ट्रेंडी वूलन टॉप, पाहा ५ स्टायलिश पर्याय - स्वस्तात मस्त, हिवाळ्यात दिसा सुपरकुल

Trending Woolen top for Winter season online shopping tips : थंडीत फॅशनेबल कसं दिसायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी एक से एक पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2023 01:43 PM2023-11-30T13:43:14+5:302023-11-30T14:40:28+5:30

Trending Woolen top for Winter season online shopping tips : थंडीत फॅशनेबल कसं दिसायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी एक से एक पर्याय...

Trending Woolen top for Winter season online shopping tips : Trendy Woolen Top For Winters, Check Out 5 Stylish Options - Look Super Cool In Winter | थंडीत अंगावर शोभतो ट्रेंडी वूलन टॉप, पाहा ५ स्टायलिश पर्याय - स्वस्तात मस्त, हिवाळ्यात दिसा सुपरकुल

थंडीत अंगावर शोभतो ट्रेंडी वूलन टॉप, पाहा ५ स्टायलिश पर्याय - स्वस्तात मस्त, हिवाळ्यात दिसा सुपरकुल

हिवाळ्याच्या दिवसांत आपल्याला खूप थंडी वाजत असते त्यामुळे सतत अंगात स्वेटर नाहीतर जॅकेट घालावं लागतं.हे घातले की आपले कपडे झाकले जातात आणि आपण नेहमीप्रमाणे फॅशन कॅरी करु शकत नाही. पण हे दोन्ही न घालता थेट वूलनचे टॉप घालूनही आपण हिवाळ्यात ट्रेंडी दिसू शकतो. हे टॉप वूलनचे असल्याने आपल्याला थंडीही वाजणार नाही आणि दिसायलाही फॅशनेबल दिसतील. थंडीचे दिवस म्हणजे फिरण्यासाठी, खरेदीसाठी परफेक्ट काळ असतो.

या काळात बऱ्याच उत्पादनांवर डिस्काऊंट आणि सेल असल्याने आपण शॉपिंगही करतो. खास थंडीसाठी तुम्ही खरेदी करणार असाल आणि काही स्टायलिश पर्याय शोधत असाल तर आज आपण वूलनचे छान छान टॉप आणि कुर्ते आज पाहणार आहोत. याखाली दिलेल्या लिंकवरुन हे टॉप तुम्ही खरेदीही करु शकता. त्यामुळे थंडी आल्याने आता आपण फॅशनेबल कसं दिसायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी हे पर्याय नक्की पाहून घ्या (Trending Woolen top for Winter season online shopping tips). 

(Image : Google)
(Image : Google)

१. थंडीतही तुम्हाला मस्त स्टायलिश दिसायचं असेल तर अशाप्रकारचे ऊब देणारे पण तरीही ट्रेंडी असे टॉप तुम्ही नक्की निवडू शकता. फूल बाह्या असल्याने यातून छान उब मिळेल. तसेच यावर एखादा स्कार्फ किंवा जॅकेटही मस्त खुलून येईल. अगदी ऑफीससाठी किंवा फिरायला जातानाही तुम्ही अशाप्रकारचे कपडे घालू शकता.  

Click to buy :  https://bit.ly/47xHK7G 

२. तुम्हाला थंडीच्या सिझनसाठी जीन्सवरचा टॉप न घेता कुर्त्यासारखा लाँग टॉप खरेदी करायचा असेल तर अशा पर्यायांचा तुम्ही विचार करु शकता. गळ्यापाशी छानशी सोबर डीझाईन आणि खाली प्लेन असलेला हा वूलन टॉप तुम्हाला मस्त लूक देऊन जातो. 

 Click to buy : https://amzn.to/3uE0iof

३. दिसायला नेहमीच्या टॉप किंवा शर्टसारखा दिसणारा हा टॉप थंडीत ऊब देणारा असतो. त्यामुळे तो घातल्यावर तुम्हाला वेगळा स्वेटर किंवा जॅकेट घालण्याची आवश्यकता नाही. त्यावरची नाजूक डीझाईन तुमचा लूक स्टायलिश करण्यास नक्कीच मदत करेल.

Click to buy : https://bit.ly/47TEzH7

४. कलरफूल अशा स्ट्रीप असलेला आणि फिटींगला छान बसणारा हा पोलोनेक प्रकारात मोडणारा टॉप तुम्ही जीन्सवर नक्की पेअर करु शकता. यामुळे तुम्ही सगळ्यांमध्ये उठून आणि ग्रेसफूल दिसण्यास मदत होईल.

(Image : Google)
(Image : Google)

Click to buy: https://bit.ly/3T6yLWG

५. स्वेटरसारखे दिसणारे असे टॉप वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये, रंगांमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध असतात. अगदी कमी रेंजपासून हे टॉप मिळत असल्याने आपल्याला थंडीतही हटके लूक हवा असेल तर आपण असा एखादा टॉप नक्की खरेदी करु शकतो. 

Click to buy : https://amzn.to/4a25ySI
 

Web Title: Trending Woolen top for Winter season online shopping tips : Trendy Woolen Top For Winters, Check Out 5 Stylish Options - Look Super Cool In Winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.