फॅशनच्या दुनियेत कधी काय फॅशन येईल काही सांगता येत नाही. या दुनियेतले ट्रेण्ड नेहमीच बदलत जातात. फक्त ट्रेण्डी राहण्यासाठी आपल्याला ते अचूक पकडता आले पाहिजे. प्रत्येक सणावारानुसार, सिझननुसार फॅशनचे ट्रेण्ड बदलत असतात. आता हेच बघा ना अवघ्या काही दिवसांवर संक्रांतीचा सण आलेला आहे. संक्रांतीला जसे तिळगुळाचे महत्त्व तसेच पतंगाचेही महत्त्व. म्हणूनच आता चक्क दागिन्यांमध्ये पतंग आणि मांजा पाहायला मिळत आहे. पतंगाचे कानातले, पतंगाचे पेंडंट असणारे गळ्यातले अशा प्रकारचे अनेक दागिने सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर तर आहेतच (Unique patang maanja design earrings for makar sankranti), पण तुमच्या शहरातल्या लोकल मार्केटमध्येही पाहायला मिळतील. (kite design jewellery)
ऑक्सिडाईज दागिन्यांना सध्या बरीच मागणी आहे. कॉटन साडीवर, ड्रेसवर घालायला हे दागिने छान वाटतात.
केस गळण्याची ३ मुख्य कारणं आणि त्यावरचे ३ सोपे उपाय- केस गळणं थांबूनच जाईल
ऑक्सिडाईज प्रकारात मांज्याच्या फिरकीचं डिझाईन असणारे कानातले, त्याला जोडून एक साखळी आणि त्या साखळीला लावलेला पतंग अशा डिझाईनचंही कानातलं मिळत आहे. ती साखळी म्हणजे जणू त्या पतंगाची दोरी आहे. हा पतंग तुम्ही कानाच्या वरच्या कोपऱ्यातही अडकवू शकता किंवा मग वेल लावतो त्याप्रमाणे केसांमध्येही लावू शकता. अतिशय युनिक डिझाईनचं हे वेल प्रकारातलं कानातलं ७९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. शॉपिंग साईटनुसार त्याची किंमतही वेगवेगळी असू शकते. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0C39CLN8Z
ऑक्सिडाईज प्रकारातले कानातले नको असतील तर असे थ्रेड वर्कचे कानातलेही तुम्ही घेऊ शकता.
या प्रकारच्या कानातल्यांमध्ये अनेक रंग उपलब्ध आहेत. त्यामुळे साडी किंवा ड्रेसला मॅच होणारं परफेक्ट कॉम्बिनेशन घेता येईल. हे कानातले २२० रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत. Click To Buy:https://aerisakhi.in/products/kai-po-che-earrings?sku_id=49575615