'चपाती' हा आपल्या रोजच्या जेवणातील एक महत्वपूर्ण पदार्थ आहे. ताटात चपाती असल्याशिवाय जेवणाचे ताट अपूर्णच आहे. काहीजणांना रोजच्या जेवणात 'चपाती' ही लागतेच. चपाती करताना आपण सर्वात आधी कणीक मळून घेतो, त्यानंतर या कणकेचे गोळे करून छान, मस्त गोलाकार चपात्या लाटतो. चपात्या लाटताना त्यांचा आकार व्यवस्थित गोलाकार यावा, किंवा त्या पोळपाटाला चिकटू नयेत यासाठी गव्हाच्या सुक्या पिठाचा वापर केला जातो. चपाती लाटताना आपण शक्यतो अधूनमधून या चपातीवर गव्हाचे सुके पीठ भुरभुरवून घालतो(Using a Flour Duster For Making Roti).
चपाती लाटताना हे पीठ भुरभुरवून घालताना आपण शक्यतो बोटांच्या लहानशा चिमटीत पीठ घेऊन ते चपातीवर भुरभुरवतो. परंतु अनेकदा असे करताना बरेचसे पीठ आपल्या हातून सांडते. असे सांडलेले पीठ आपण वापरत नाही हे पीठ (Flour Duster) आपण फेकूनच देतो. यामुळे रोज थोडे थोडे करुन असेच पीठ वाया जाते. जर आपल्याला चपाती लाटताना त्यावर भुरभुरवले जाणारे पीठ सांडून वाया जाऊ नये असे वाटत असेल तर बाजारांत त्यासाठी खास एका विशिष्ट पद्धतीचा डबा मिळतो. या डब्याचा वापर करून आपण वाया जाणारे पीठ अगदी सहजपणे वाचवू शकतो. चपाती लाटताना वरुन भुरभुरवले जाणारे पीठ वाया जाऊ नये यासाठी बाजारांत विकत मिळणारा असा डबा कोणता, तो कसा वापरायचा, कुठे विकत मिळतो याबद्दलची अधिक माहिती समजून घेऊयात.
फ्लावर डस्टर (Flour Duster) म्हणजे नेमकं काय ?
चपाती लाटताना वरुन भुरभुरवले जाणारे पीठ आजूबाजूला पडून वाया जाऊ नये, यासाठी एक खास विशिष्ट प्रकारचा डबा विकत मिळतो. जर चपाती लाटताना आपण या डब्याचा वापर पीठ भुरभुरवण्यासाठी केला तर आपले जास्तीचे पीठ आजूबाजूला सांडत नाही, शिवाय यामुळे पीठ वायाही जात नाही. अशा प्रकारच्या डब्यांला 'फ्लावर डस्टर' असे म्हटले जाते.
हा एक विशिष्ट प्रकारचा डबा असतो. हा डबा शक्यतो स्टीलच्या मटेरियल पासून बनलेला असतो. या डब्याचे झाकण देखील स्टीलचेच असते. परंतु या झाकणाचा सर्वात वरचा पृष्ठभाग हा स्टीलच्या जाळीचा बनलेला असतो. या जाळीला बारीक अशी छिद्र असतात. या छिद्रांमधून पीठ भुरभुरवल्या सारखे बाहेर पडते. हा डबा उलटा केला की या झाकणाच्या वरच्या भागातील जाळीदार भागातून गव्हाचे सुके पीठ बाहेर पडते. यामुळे पीठ चिमटीने घेताना जसे आजूबाजूला पडून वाया जाते, तसे होत नाही.
मकर संक्रांती स्पेशल : आजी करायची त्या पदार्थांची ही घ्या यादी, लहानपणच्या आठवणींचा गोडवा...
मध -साखर नको, फक्त वाटीभर लिंबाचा रस वापरुन घरच्याघरी वॅक्सिंग करण्याची नवी पद्धत...
या डब्याचा वापर केल्याने आपल्या हवे तेवढेच पीठ भुरभुरवता येते. याचबरोबर, आपले चपाती लाटण्याचे काम झाल्यावर हा झाकणावरचा जाळीदार पृष्ठभाग झाकण्यासाठी प्लॅस्टिकच्या मटेरियलपासून तयार करण्यात आलेले झाकण देखील असते. अशाप्रकारे आता चपाती लाटताना वरून पीठ भुरभुरवण्यासाठी आपण अशा प्रकारच्या 'फ्लावर डस्टरचा' वापर करु शकतो. यामुळे पीठ भुरभुरवताना ते आजूबाजूला सांडून वाया जाणार नाही. सोबतच, किचनचा ओटा देखील फारसा खराब होणार नाही. या डब्याची स्वच्छता ठेवणे देखील अतिशय सोपे आहे. आपण हा डबा आणि त्याचे झाकण अगदी सहजपणे धुवून स्वच्छ करु शकता.
आपण हा पीठ भुरभुरवण्याचा डबा म्हणजेच 'फ्लावर डस्टर' ऑनलाईन अगदी सहज विकत घेऊ शकता. आपण हे 'फ्लावर डस्टर' भांड ऑनलाईन देखील खरेदी करु शकता. या भांड्याची किंमत १९५ रुपयांपासून ते २३५ रुपयांपर्यंत इतकी आहे. आपण या भांड्याचा वापर करून चपात्या लाटताना जास्तीचे सांडून वाया जाणारे पीठ वाचवू शकता. सोबतच, चपात्या लाटताना ओट्यावर होणारा पसारा देखील आवरायची गरज भासणार नाही. चपाती लाटताना वरून पीठ भुरभुरवण्याचा हा डबा विकत घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://amzn.to/4gIr2Hs