क्रेडीट कार्ड आपण वापरतो. बँकेने जास्त लिमिटचे क्रेडीट कार्ड दिले तर खुश होतो. कधी पुरेसे पैसे नसले तर कमीत कमी रक्कम भरुन बाकीचे पैसे पुढच्या महिन्यात ढकलून देतो. पण क्रेडिट कार्डवर शॉपिंग करताना काही गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजे. तरच क्रेडीट कार्ड वापरणं फायद्याचं ठरतं नाहीतर आपण तोट्यात जातो. हे लक्षात ठेवायला हवे की कुणी कधीच त्यांचा पैसा आपल्याला फुकट, बिनव्याजी वापरायला देत नाही. त्यामुळे क्रेडीट कार्ड स्मार्टली वापरणं आणि त्यातली जोखीम टाळून आपले ‘क्रेडीट’ वाढवणे गरजेचे आहे. पण तसे होत नाही.
क्रेडीट कार्डचे बिल अनेकजणी/अनेकजण वेळच्यावेळी भरत नाहीत. क्रेडीट कार्डवर पैसे काढतात त्याचे व्याज किती लागते हे बघत नाहीत. आणि परिणाम म्हणजे प्रचंड आर्थिक तोटा होता. क्रेडीट कार्डवर शॉपिंग करताना ग्राहक म्हणून काही गोष्टी नक्की लक्षात ठेवायला हव्या.
(Image :google)
क्रेडीट कार्ड वापरत असाल तर?१. क्रेडीट कार्डची जी मर्यादा ठरवलेली असते, तिचा पूर्ण वापर कधीही करु नये.२. बँकेने कितीही रकमेची सवलत दिली, तरी आपण लिमिट आहे म्हणून वाट्टेल तेवढी खरेदी करु नये.३. वाट्टेल ते झालं तरी क्रेडीट कार्डचं बिल मुदतीत, ठरवलेल्या तारखेलाच भरावे. नाहीतर त्याचा दंड बसतो. भुर्दंड होतो.
(Image :google)
४. चुकूनही बिल भरताना मासिक हप्ता म्हणजेच इएमआय हा पर्याय घेऊ नये. जास्त व्याज आणि जास्त रक्कम भरावी लागते.५. क्रेडीट कार्ड वापरुन केलेली खरेदी म्हणजे कर्जच आहे, ते फेडावेच लागणार हे विसरु नये. ६. शून्य भाडे, शून्य व्याजवाढ लिमिट वाढवतो असं बँक म्हणत असेल तरी ते तसं असेलच याची खात्री नाही. खात्री करुन घ्या.७. क्रेडीट कार्ड प्रकरणी काही घोळ झाला तर ग्राहक न्यायालयात दाद मागता येते मात्र त्यासाठी आपण आधी सर्व नियम काळजीपूर्वक वाचले पाहिजे.८. सगळ्यात महत्त्वाचं क्रेडीट कार्ड ही सोय आहे पण त्यावर भरमसाठ खरेदी म्हणजे मनस्तापाला आमंत्रण आहे हे विसरु नका.