वेलवेटचा ड्रेस आहे का तुमच्याकडे? पूर्वी वेलवेट फार फॅशनेबल मानलं जायचं, पण मधला काही काळ ते फॅशनमध्ये मागे पडले. पण आता परत आले आहे. अनुष्काने आपल्या लग्नात बर्गंडी रंगाच्या वेलवेट साडी नेसली होती एक, तिची तर तेव्हा केवढी चर्चा झाली. आणि आता त्यानंतर गेल्या तीन-चार वर्षात वेलवेट पुन्हा फॅशनच्या दुनियेत परतले आहे.
वेलवेट या कापड प्रकारामध्ये मध्ये काळा, बर्गंडी, लाल, हिरवा, ग्रे इत्यादी रंगात टॉप्स, ड्रेसेस, साड्या, कुर्ते, आणि शालीचे भरपूर डिझाइन्स बाजारात उपलब्ध आहेत. यामुळेच वेलवेट हे नुसते पार्टी वेअर न राहता कॅज्युअल आणि इव्हनिंग वेअर म्हणून सुद्धा वापरले जाऊ लागले आहे.
वेलवेट टॉप्स आणि ड्रेसेस
थंडी साठी योग्य असे वेलवेट टॉप्स पार्टी साठी किंवा डिनर डेट साठी एकदम योग्य ठरतात. हाल्फ किंवा फुल् स्लिव्हस असलेले क्रश्ड वेलवेट मधले टॉप्स खूप रिच लुक देऊन जातात. वेलवेट ड्रेसेस मध्ये हाय- लो, मॅक्सि, शॉर्ट ए लाइन ड्रेस या पर्यायांची निवड आपली गरज पाहून करता येईल. वेलवेट टॉप्स आणि ड्रेसेस हे 'ऑल इन इटसेल्फ' समजले जातात- म्हणजेच या टॉप्स बरोबर खूप ज्वेलरी किंवा मेकअप ची गरजच भासत नाही.
वेलवेट जॅकेट
तुम्हाला पार्टी साठी पटकन तयार व्हायचे असेल आणि ट्रेंडी दिसायचे असेल तर वेलवेट जॅकेट हा उत्तम पर्याय आहे. तरुणींमध्ये क्रश्ड वेलवेटचे जॅकेट खूप आवडताना दिसते आहे.
वेलवेट साड्या आणि शाल-
जरदोसी, मरोरी आणि मोत्याची एम्ब्रॉयडरी वेलवेट साड्या आणि शालीला खूप रिच लुक देऊन जाते. गडद रंगांमध्ये मिळणाऱ्या साड्या रात्री च्या रिसेपशन किंवा अन्य पार्टींसाठी अतिशय योग्य पर्याय आहे.
वेलवेट ब्लाउज
वेलवेट साड्या खूप महाग पडतात तसेच त्यांचा अवास्तव वापरसुद्धा नकोसा वाटतो. अश्यावेळी प्लेन साड्यांवर एम्ब्रॉयडरी केलेले वेलवेट ब्लाउज हा छान व सुटसुटीत पर्याय आहे.
मात्र, वेलवेट मध्ये एलिगंट आणि रिच लुक मिळवायचा असल्यास ते चांगल्या प्रतीचं वापरणे अत्यंत आवश्यक आहे, हलक्या प्रतीच्या वेलवेट ची चमक, ड्रेप चांगली दिसत नाही.