Lokmat Sakhi >Shopping > पारंपरिक साड्यांसह कारागिरांचा सन्मान; व्होकल फॉर लोकल- एक सुंदर उपक्रम!

पारंपरिक साड्यांसह कारागिरांचा सन्मान; व्होकल फॉर लोकल- एक सुंदर उपक्रम!

निकायी फॅशन स्टुडियोच्या संचालक व फॅशन डिझायनर मृण्मयी अवचट यांचा हस्तकला उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी खास उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 04:04 PM2021-10-09T16:04:11+5:302021-10-09T16:48:40+5:30

निकायी फॅशन स्टुडियोच्या संचालक व फॅशन डिझायनर मृण्मयी अवचट यांचा हस्तकला उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी खास उपक्रम

Vocal for local- a project by Mrunmayee Awachat, for traditional sarees and weavers. | पारंपरिक साड्यांसह कारागिरांचा सन्मान; व्होकल फॉर लोकल- एक सुंदर उपक्रम!

पारंपरिक साड्यांसह कारागिरांचा सन्मान; व्होकल फॉर लोकल- एक सुंदर उपक्रम!

Highlightsपारंपरिक साड्यांचं मोल सांगणारा हा उपक्रम. व्होकल फॉर लाेकल.

२०२० हे एक कठीण वर्ष होते आणि २०२१ पण अवघड होत गेले. पारंपारिक हस्तकलेवर काम करणाऱ्या आपल्या कारागीरांसाठी तग धरुन राहणं याकाळात अवघड होतं. कोरोनानंतर अर्थव्यवस्थेला सावरायला वेळ लागेल मात्र त्यांना तत्काल आणि सतत पाठिंब्याची गरज आहे.
त्यासाठी आपण काय करु शकतो, असा विचार ‘व्होकल फॉर लोकल’ म्हणत  निकायी फॅशन स्टुडियोच्या संचालक व फॅशन डिझायनर,
मृण्मयी अवचट यांनी एक उपक्रम सुरु केला. हस्तकला उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी व मोठ्या समाजघटकांपर्यंत ते पोहोचण्यासाठी सेलिब्रिटीसह त्या सहयोगी फोटोशूट करत आहेत.
हातमाग विणकर, हॅण्ड एम्ब्रॉयडरी कारागीर, हॅण्ड ब्लॉक प्रिंटर आणि इतर पारंपारिक कारागीरांना मदत करण्यासाठी हा त्यांनीउपक्रम हाती घेतला आहे. विणकर आणि कारागीर समुदायाला आधार देणारी उत्पादने लोकांनी खरेदी करावी म्हणून त्या प्रोत्साहन देत आहेत. नोव्हेंबर 2020 पासून हे काम सुरू आहे..
सेलिब्रिटी फोटोशूटसह एक खास उपक्रम मृण्मयी अवचट नवरात्रातही करत आहेत. नवरात्री स्पेशल ९ लुक्स, ९ सेलिब्रीटी, ९ वेगवेगळ्या पारंपरिक साड्या व त्यांच्या बद्दलची माहिती याद्वारे सर्वदूर पोहचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांनी आरंभीच हा मान दिला महाराष्ट्राची शान असलेल्या पैठणीला.


पैठणी साडी महाराष्ट्रात पैठण आणि येवला येथे तयार केल्या जातात.
पहिल्या दिवशी अवचट यांनी साद केली पिवळ्या रंगाची नऊवारी पैठणी.
साडीला स्व -रंगाच्या किनारी आणि पल्लूवर मोर नसलेल्या भौमितिक आकृतिबंध आहेत. सगळीकडे बुटी फक्त सोन्याची नसून रेशमची सोन्याची आहे. याला मीना बुटी ही म्हणतात ..!

दुसऱ्या दिवशी या उपक्रमात सजली नारायणपेट.
साडीचे नाव पुण्यातील नारायण पेठ वरून पडले असे वाटते.. हो ना ..??
महाराष्ट्रात ज्याला आपण सामान्यत: नारायणपेठ म्हणून ओळखतो ते खरं "नारायणपेट" आहे,
आणि पुण्याऐवजी तेलंगणामध्ये या साड्या विणल्या जातात..


आणि आजही नारायणपेट पारंपरिक साड्यांत आपला मान आणि आब राखून आहे. 

तिसरा दिवस आणि मान माहेश्वरी साडीचा.
नव्या काळात सणवारीही ऑफिसला जावे लागते. त्यासाठी ही परफेक्ट साडी आहे. एकदम कम्फर्टेबल, ऑफिसला कॅरी करायला सोपी. एकदम एलिगण्ट.

मध्यप्रदेशातली ही साडी आजही पारंपरिक वस्त्रकलेत आपला मोठा मान राखून आहे.


अशाच पारंपरिक साड्यांचं मोल सांगणारा हा उपक्रम. व्होकल फॉर लाेकल.

Web Title: Vocal for local- a project by Mrunmayee Awachat, for traditional sarees and weavers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.