Join us  

फॅनला कोण कव्हर घालतं? सतत पंखे पुसण्याचा त्रास होतो बंद, पाहा स्वस्तात मस्त उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2024 3:10 PM

Waterproof & Dustproof Ceiling Fan Cover : Ceiling Fan Cover : Essential Accessories For Ceiling Fans : सिलिंग फॅनवर धुळीचे थर साचतात? मग हा घ्या सोपा उपाय...

घरातील छताला टांगलेला सिलिंग फॅन स्वच्छ करणे म्हणजे सर्वात कठीण काम. सिलिंग फॅनवरची धूळ साफ करण्यासाठी आपण टेबल, बेड जे काही मिळेल त्यावर उभे राहून हातात झाडू घेऊन फॅन स्वच्छ करतो. अशाप्रकारे वेगवेगळ्या ट्रिक्स वापरुन सिलिंग फॅन स्वच्छ करणे म्हणजे कोणत्याही कसरतीपेक्षा कमी नाही. सिलिंग फॅन फार उंचावर असतो त्यामुळे तिथे सहज हात पोहोचणे शक्य होत नाही. अशावेळी सिलिंग फॅनवरची धूळ स्वच्छ करणे कठीण होते(Ceiling Fan Cover).

सिलिंग फॅनची स्वच्छता आपण रोज करु शकत नाही, यामुळे किमान आठवड्यातून एकदा तरी आपण हा सिलिंग फॅन स्वच्छ करतो. सिलिंग फॅन वेळच्यावेळी स्वच्छ केला नाही तर त्यावर धुळीचा थर साचून राहतो. काहीवेळा फॅन सुरु केल्यावर हवेसोबत ही फॅनवरची धूळ देखील खाली पडते. यासाठीच आता फॅनवर धूळ साचून राहू नये म्हणून सिलिंग फॅन कव्हर (Essential Accessories For Ceiling Fans) बाजारांत अगदी सहज विकत मिळते. आपण फॅनला कव्हर घातल्याने फॅनवर फारशी धूळ न साचून राहता तो अगदी महिनोंमहिने स्वच्छ राहतो. याचबरोबर, या कव्हरचा वापर केल्याने फॅन सारखा स्वच्छ करण्याची देखील गरज भासत नाही(Waterproof & Dustproof Ceiling Fan Cover).

सिलिंग फॅनवरची धूळ वारंवार स्वच्छ करावी लागू नये म्हणून आपण सिलिंग फॅन कव्हरचा वापर करु शकतो. या सिलिंग फॅन कव्हरच्या सेटमध्ये फॅनच्या तीन पात्यांसाठी पात्यांच्या आकाराचे कापडाचे कव्हर असते. या लांब पात्यांना आपण हे कव्हर घालून शेवटच्या टोकाशी असणारे वेल्क्रो लावून आपण हे कव्हर पात्यांना फिट बसवू शकतो. यासोबतच, फॅनच्या मध्यभागी जो गोलाकार भाग असतो त्या भागाला देखील इलॅस्टिक असणारे कापडाचे कव्हर आपण घालून शकता. 

हे फॅन कव्हर आपल्याला कॉटनच्या कापडात मिळते. यात वेगवेगळे रंग आणि डिझाइन्स देखील उपलब्ध आहेत. या फॅन कव्हरच्या पात्यांना असणारे वेल्क्रो किंवा फॅनच्या मध्यभागाला घालायच्या कव्हरला इलॅस्टिक असल्याने, हे कव्हर घालणे - काढणे सोपे जाते. 

हे सिलिंग फॅन कव्हर आपण अगदी सहजपणे वॉशिंग मशीनमध्ये देखील धुवू शकतो. सिलिंग फॅन कव्हर वॉटर रेझिस्टन्स आणि डस्ट फ्री असतात त्यामुळे यावर फारशी धूळ साचत नाही. हे सिलिंग फॅन कव्हर फॅनला घातल्याने फॅन पूर्णपणे कव्हर होऊन जातो, यामुळे फॅनवर धूळ साचत नाही. परिणामी, फॅन वारंवार स्वच्छ करावा लागत नाही. हे सिलिंग फॅन कव्हर फॅनवर अगदी व्यवस्थित फिट बसते. फॅन सुरु केल्यावर हे कव्हर फॅनवरून निघून खाली पडत देखील नाही. 

तुळशी विवाह स्पेशल : पाहा तुळशीच्या रोपासाठी सुंदर घागरा, तुळशीच्या साजशृंगारासाठी सुरेख पोषाख आणि साज...

कांद्याची सालं फेकून न देता 'असा' करा वापर, तेलकट शेगडी-कळकट मेणचट कढई चमकेल लख्ख...

या सिलिंग फॅन कव्हरचा वापर केल्याने फॅनवर धूळ तर साचून राहत नाही, सोबतच फॅनला एक नवा आगळावेगळा हटके लूक देखील येतो. आपण आपल्या घराच्या भिंतींच्या रंगाप्रमाणे मॅच होणारे कव्हर देखील घेऊ शकता. अशाप्रकारे या सिलिंग फॅन कव्हरचा वापर करुन आपण फॅनवर धुळीचे थर साचू न देता तो स्वच्छ ठेवू शकतो. सिलिंग फॅन कव्हर आपल्याला सहजपणे बाजारांत तर विकत मिळेलच सोबतच आपण ऑनलाईन देखील या सिलिंग फॅन कव्हरची खरेदी करु शकता. हे सिलिंग फॅन कव्हर आपल्याला १०० रुपयांपासून ते ३५० रुपयांपर्यंत सहज विकत मिळू शकले.  सिलिंग फॅन कव्हर ऑनलाईन खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.  https://amzn.to/3YLP10s

टॅग्स :खरेदीसोशल व्हायरल