Join us  

Christmas 2021: जिवाभावाच्या माणसांसाठी तुम्ही होणार का सिक्रेट सांता? स्पेशल माणसांना काय 'खास' गिफ्ट द्याल, ही घ्या यादी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 4:14 PM

आपणही फुलवू शकतो एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद...ख्रिसमस गिफ्टचे एकाहून एक भन्नाट पर्याय

ठळक मुद्देगिफ्ट देताना समोरचा खूश होईल याचा विचार करायला हवासिक्रेट सांता होताना तुम्ही हे गिफ्ट नक्की देऊ शकता...

ख्रिसमसचा महिना म्हणजे सेलिब्रेशनच सेलिब्रेशन...बाहेर मस्त थंडी आणि त्यात आपल्याला आवडणाऱ्या वस्तू पाठवणारा सिक्रेट सांता....प्रत्येकाच्या आयुष्यात असे एक दोन नाहीतर अनेक सांता असावेत जे आपल्याला आवडेल असे गिफ्ट आपल्याला सरप्राइज म्हणून पाठवतील. आता आपल्या आयुष्यात असे कोणी असेल नसेल तरी ठिक आहे पण आपण तर दुसऱ्याच्या आयुष्यातील असा सिक्रेट सांता नक्कीच होऊ शकतो ना...दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आपण पाठवलेले गिफ्ट मिळाल्यावर होणारा आनंद नक्कीच आपल्याला भरपूर एनर्जी देऊन जाणारा ठरेल. आपले आई-वडील, बहीण-भाऊ, जवळचे मित्रमेत्रीणी, मुलगा किंवा मुलगी, नवरा आमि इतरही नातेवाईक यांना तुम्हाला जर काही छान भेटवस्तू पाठवायची असेल तर बिनधास्त खरेदी करा. त्यांच्या आवडीचे एखादे लहानसे गिफ्ट त्यांना आणि पर्यायाने तुम्हाला खूप आनंद देऊन जाईल. मग वाट कसली बघता काही दिवसांवर येऊन ठेपलेला ख्रिसमस आणि नवीन वर्ष उत्साहात आनंदात घालवायचं असेल तर गिफ्ट देण्याचे एकाहून एक भन्नाट पर्याय आम्ही तुम्हाला सुचवत आहोत...हे पर्याय तुमच्या खिशाला परवडतील आणि समोरच्या व्यक्तीला आवडतील असेच आहेत....

चॉकलेट किंवा कुकीज 

चॉकलेट आणि कुकीज हे कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना आवडणारे प्रकार. त्यातही तुम्ही ऑफीसमध्ये गिफ्ट म्हणून काही पाठवण्याचा विचार करत असाल. तर त्याठिकाणी किंवा येता जाता खायला आणि घरीही नेता येईल असा चांगला पर्याय शोधत असाल तर तुमच्यासाठी बरेच पर्याय आहेत. ख्रिसमसच्या निमित्ताने समोरच्या व्यक्तीचे तोंड गोड करायचे असेल तर चॉकलेटस आणि कुकीज गिफ्ट म्हणून पाठवणे हा पर्याय अगदीच उत्तम आहे. हे दोन्ही पदार्थ बरेच दिवस टिकत असल्याने त्याचीही चिंता नाही. तुम्हाला हव्या त्या रेंजमध्ये सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कुकीज आणि चॉकलेटस उपलब्ध होतात. तसेच तुम्हाला कामाचा खूप ताण असेल तर ऑनलाइनही तुम्ही त्याची विक्री करु शकता. 

https://www.cookiemanindia.com/product-listing/christmas-Giftings

https://www.naturesbasket.co.in/Online-grocery-shopping/Snacks-Beverages/Cookies-Crackers/Cookies/244_0_0

(Image : Google)

वॉलेट

तुम्हाला ज्या व्यक्तीला गिफ्ट पाठवायचे आहे ती व्यक्ती पुरुष असेल तर तुम्ही त्याला उपयोगी होईल असे एखादे वॉलेट किंवा वॉलेट आणि लेदर बेल्ट असे गिफ्ट देऊ शकता. मुलगी असेल तर तिला एखादी छोटी पर्स, स्लिंग, वॉलेट असे बरे पर्याय त्यामध्ये उपलब्ध असतात. यामध्ये समोरच्याची आवड लक्षात घेऊन खरेदी केल्यास गिफ्ट मिळाल्यावर नकळत त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद तुम्हाला खूप काही देऊन जाऊ शकतो. यामध्येही अगदी २०० ते ३०० रुपयांपासून हजार रुपयांपर्यंतचे एकाहून एक छान पर्याय उपलब्ध असतात.

https://www.myntra.com/women-wallets

https://www.amazon.in/ladies-purse-wallets/b?ie=UTF8&node=2917497031

डायरी पेन सेट

नवीन वर्षासाठी प्लॅनर म्हणून किंवा इतरही अनेक कामांसाठी आपल्याला डायरी आणि पेन लागतेच लागते. ऑफीसच्या कामासाठी किंवा वैयक्तिक काही गोष्टींची नोंद करण्यासाठी आपण आवर्जून डायरी वापरतो. त्यामुळे तुम्ही सिक्रेट सांता म्हणून काही गिफ्ट पाठवायचा विचार करत असाल तर हा उत्तम पर्याय आहे. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या हँड प्रिंटेड, बॉक्स कव्हर असलेल्या अशा एकाहून एक मस्त डायऱ्या मिळतात. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी एखादा छान मेसेजही देऊ शकता. तसेच समोरच्या व्यक्तीचा फोटो, एखादा आयुष्याशी निगडीत छानसा मेसेज कव्हरवर कस्टमाईज करुन तुम्ही ही डायरी देऊ शकता. त्यामुळे वर्षभर तुम्ही या व्यक्तीच्या आठवणीत राहाल.  

https://www.amazon.in/Office-Diaries/b?ie=UTF8&node=3591128031

(Image : Google)

बाथ कीट

थंडीच्या दिवसांत आपली त्वचा कोरडी पडलेली असते. याच दिवसांत लग्नसराई आणि गेटटूगेदर्स असतात. तसेच अनेक जण या कालावधीत ट्रीपलाही जातात. अशावेळी आपली त्वचा छान चमकदार असणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्ही गिफ्ट म्हणून काही द्यायचा विचार करत असाल तर एखादे छानसे बॉडी लोशन किंवा बॉडी सोप देऊ शकता. हल्ली बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांची किंवा कस्टमाइज बाथ कीटही मिळतात. यामध्ये फेस वॉश, हेअर वॉश, बॉडी लोशन, सिरम अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असतो. तुम्ही समोरच्याची काळजी घेत आहात असे वाटून समोरचा व्यक्ती नक्कीच तुमच्यावर खूश होईल. 

https://www.myntra.com/bath-and-body-gift-set

https://www.flipkart.com/beauty-and-grooming/bath-shower/bath-essentials/bath-combos-and-kit/pr?sid=g9b%2C5nz%2Cb1b%2Cjpl

(Image : Google)

मफलर किंवा स्कार्फ 

थंडीच्या दिवसांत कान डोके झाकण्यासाठी आपल्याला मफलर किंवा स्कार्फ लागतोच. हल्ली फॅशन म्हणूनही अनेक जण जीन्सवर आणि कुर्त्यावर मफलर किंवा एखादा ट्रेंडी स्कार्फ घेणे पसंत करतात. सिक्रेट सांता म्हणून तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला असे एखादे मफलर किंवा स्कार्फ दिला तर ती व्यक्ती नक्कीच तुमच्यावर खूश होईल. तुम्ही त्या व्यक्तीच्या तब्येतीची तर काळजी घेतच आहात पण ती किंवा तो ट्रेंडी दिसावा यासाठीही प्रयत्न करत असाल असे वाटून ते आणखी आनंदी होतील. त्यामुळे ख्रिसमस गिफ्ट म्हणून हा पर्याय अगदी योग्य ठरु शकतो. 

https://www.amazon.in/Mens-Muffler/s?k=Mens+Muffler

https://www.myntra.com/mufflers

(Image : Google)

 

टॅग्स :खरेदीगिफ्ट आयडियानाताळ