घरात एक लहानसे उंदराचे पिल्लू जरी आले तरी ते अख्ख घर डोक्यावर घेत. घराच्या कानाकोपऱ्यांत इथून - तिथून पळणारे उंदीर पाहिलं की फार भीती वाटते. घरातील उंदरांचा सुळसुळाट (1 Best Way to Get Rid of Rats without Killing Them) पाहून नको जीव होतो आणि किळसपणा देखील वाटतो. घरातील उंदरांना घराबाहेर पळवून लावणे म्हणजे खूप मोठा टास्कच असतो(Popcorn Home Remedies To Get Rid Of Rats).
या उंदरांना घरातून पळवून लावताना आपली दमछाक होते, इतकेच नव्हे तर काहीवेळा आपण अनेक उपाय करून थकतो परंतु काही केल्या घरातील उंदीर घराबाहेर जायचे नावचं घेत नाहीत. आत्तापर्यंत घरातील उंदरांना ( 1 Best Ways to Get Rid of Rats in Your Home Fast) घरातून पळवून लावण्यासाठी अनेक घरगुती उपाय करून झाले असतील. या अनेक उपायांपैकी तुम्ही कधी पॉपकॉर्नचा उपाय करून पाहिला आहे का ? होय! घरातील उंदरांना बाहेर पळवून लावण्यासाठी पॉपकॉर्नचा हा नवा उपाय करून पाहाच. हा उपाय करताना नेमकं तुम्हाला करायचं काय आहे ते पाहूयात.
घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी वाटीभर पॉपकॉर्न ठरतील जादू...
सर्वात आधी एक पॅन घेऊन त्यात थोडे तेल घालून मग मक्याचे दाणे घालावेत. मग भांड्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर पॉपकॉर्न तयार करून घ्यावेत. जर आपल्याकडे तयार पॉपकॉर्न असतील तर ते घेतले तरी चालतील. एका बाऊलमध्ये पॉपकॉर्न घेऊन ते हाताने दाब देत हलकेच मोडून त्याचा चुरा करून घ्यावा. मग या पॉपकॉर्नच्या चुऱ्यात कोणताही एक सुगंधित साबण किसून घालावा. त्यानंतर, या मिश्रणात एक टेबलस्पून बेकिंग सोडा घालावा. आता पॉपकॉर्न, बेकिंग सोडा, सुगंधित साबण यांचे एकत्रित मिश्रण व्यवस्थित मळून घ्यावे. हे तयार मिश्रण घरातील कानाकोपऱ्यांत किंवा ज्या भागात उंदीर फिरतात त्या भागात थोडे - थोडे करून ठेवावे. या मिश्रणात असलेलया पॉपकॉर्न आणि सुगंधित साबणाच्या वासाने उंदीर आकर्षित होतात.
चहा गाळून उरलेल्या चमचाभर चहा पावडरने सिंक होईल नव्यासारखे स्वच्छ, करून पाहा ही भन्नाट ट्रिक...
पॉपकॉर्न प्रमाणेच कापूर देखील उंदरांना घरातून बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरु शकतो. आपण पॉपकॉर्नच्या जागी कापूर देखील वापरू शकता. कापूरचा उग्र सुगंध उंदिरांना आवडत नसल्याने ते घरातून बाहेर पळून जातात.
कपाट उघडताच साड्यांचा ढिग कोसळतो? या ३ पद्धतींनी घाला घडी - साडीची घडी राहील जशीच्यातशी...
आपण तुरटीचा वापर करून देखील उंदिरांना घरातून बाहेर काढू शकतो. यासाठी तुरटी पाण्यात मिक्स करून त्याचे द्रावण तयार करून घ्यावे. तयार द्रावण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घरातील कानाकोपऱ्यांत किंवा उंदीर असणाऱ्या भागात स्प्रे केल्याने उंदीर घरातून पळून जातात. या तुरटीच्या पाण्याने फक्त उंदीरच नाही तर घरातील मुंग्या, पाली, कोळी, झुरळं आणि इतर कीटक देखील नाहीसे होतात.