Lokmat Sakhi >Social Viral > तुंबणारं किचन सिंक साफ करण्याची १ सोपी घरगुती ट्रिक, सिंक राहील कायम स्वच्छ

तुंबणारं किचन सिंक साफ करण्याची १ सोपी घरगुती ट्रिक, सिंक राहील कायम स्वच्छ

1 Easy Cleaning Tip for Drain System in Kitchen Sink : एकदा हे सगळं खराब व्हायला किंवा तुंबायला लागलं की मग आपल्याला अगदी नको नको व्हायला लागतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2023 12:28 PM2023-10-26T12:28:31+5:302023-10-26T12:30:56+5:30

1 Easy Cleaning Tip for Drain System in Kitchen Sink : एकदा हे सगळं खराब व्हायला किंवा तुंबायला लागलं की मग आपल्याला अगदी नको नको व्हायला लागतं.

1 Easy Cleaning Tip for Drain System in Kitchen Sink : 1 easy home trick to clean clogging kitchen sink, sink will stay clean forever | तुंबणारं किचन सिंक साफ करण्याची १ सोपी घरगुती ट्रिक, सिंक राहील कायम स्वच्छ

तुंबणारं किचन सिंक साफ करण्याची १ सोपी घरगुती ट्रिक, सिंक राहील कायम स्वच्छ

घर साफ असलं तर घरात वावरायला चांगलं वाटतं. पण सिंकमध्ये, बाथरुम, टॉयलेटमध्ये वास येत असेल आणि त्यामुळे चिलटं किंवा माश्या फिरत असतील तर घाण वाटायला लागते.  किचन सिंक ही घरात सर्वात जास्त वापरली जाणारी आणि खराब होणारी जागा असते. हे सिंक वेळच्या वेळी नीट साफ केलं तर स्वच्छ राहतं नाहीतर त्यात खरकटं किंवा इतर घाण अडकून ते तुंबून राहतं. स्वयंपाकघरात असणाऱ्या या सिंकमध्ये भाजीपाला धुण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंतच्या असंख्य गोष्टी दिवसभर केल्या जातात. सततचा वापर असल्याने हे सिंक कधी तुंबते आणि पाणी साठून राहते. मग आपण तात्पुरते काहीतरी घरगुती उपाय करुन हे साचलेले पाणी कसे खाली जाईल असा ट्राय करतो (1 Easy Cleaning Tip for Drain System in Kitchen Sink) . 

आपण सिंकमध्ये हात धुतो, भांडी घासतो किंवा डाळी, धान्य आणि भाजीपाला धुतो. त्यावेळी हजारो बॅक्टेरीया या सिंकच्या तोंडाशी जमा होतात. हे बॅक्टेरीया पाईपमध्ये अडकून राहतात आणि मग सिंक तुंबण्याची समस्या उद्भवते. हे सिंक वेळच्या वेळी साफ केले नाही तर तिथे एकतर पाणी तुंबते. जास्त काळ हे पाणी तुंबून राहीले तर याठिकाणी कुबट वासही यायला लागतो. त्यामुळे होणाऱ्या माश्या, चिलटं, झुरळं, मुंग्या यांमुळे किचनमध्ये आणखी घाण होते. एकदा हे सगळं खराब व्हायला किंवा तुंबायला लागलं की मग आपल्याला अगदी नको नको व्हायला लागतं. जेवण तयार करण्याच्या आणि खाण्याच्या ठिकाणी नकोसे वास येतात, जे आरोग्यासाठीही चांगले नसतात. असे होऊ नये म्हणून आपण कधी याठिकाणी ड्रेनेज क्लीन करणारी एखादी पावडर घालतो किंवा तारा घालून पाईपलाईन क्लीन करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सिंक स्वच्छ राहावे आणि याठिकाणी पाणी तुंबू नयेत यासाठी आज आपण १ सोपी ट्रिक पाहणार आहोत. 

(Image : Google )
(Image : Google )

१. साधारण १ ग्लास पाणी घ्यायचे ते एका पातेल्यात गॅसवर उकळायला ठेवायचे. 

२. या पाण्यात १ चमचा मीठ आणि २ चमचे कपडे धुण्याची डीटर्जंट पावडर घालायची.

३. हे उकळलेले पाणी सिंकच्या होलमध्ये गरम असतानाच घालायचे. 

४. गरम पाणी घातल्यानंतर लगेचच टाईल्स किंवा फ्लोअर क्लिनर लिक्विड घालायचे.

५. साधारण २० मिनीटे हे सगळे सिंकच्या पाईपमध्ये असेच ठेवायचे. 

६. त्यानंतर पुन्हा यामध्ये १ ग्लास गरम पाणी घालायचे यामुळे चिकट जे काही अडकले असेल ते सगळे निघून जाण्यास मदत होते. 

Web Title: 1 Easy Cleaning Tip for Drain System in Kitchen Sink : 1 easy home trick to clean clogging kitchen sink, sink will stay clean forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.