Join us  

सोन्या -चांदीचे पाणी चढवलेले दागिने काळे पडलेत ? १ सोपा उपाय - ज्वेलरी चमकेल नव्यासारखी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2023 9:03 PM

1 Easy And Simple Way To Clean Fake Jewelry At Home : काळे पडलेले दागिने पॉलिशला न देता घरीच करा सोपा उपाय...

श्रावण महिन्यापासून विविध सणांना सुरुवात होते. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळीसारखे सण पाठोपाठ येतात. याशिवाय लगेच लग्नसराई हंगामही सुरू होतो. या निमित्ताने नवीन दागिने केले जातात किंवा जुन्या दागिन्यांना नव्याने पॉलीशही केले जाते. रोज वापरण्याचे व फंक्शनल म्हणजे कार्यक्रमांपुरते वापरण्याचे असे वेगवेगळे दागिन्यांचे प्रकार प्रत्येक स्त्रीकडे असतात. प्रत्येक स्त्रीच्या दागिन्यांच्या बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असतात. यातील काही दागिने हे सोने, चांदी, मोती, ऑक्सेडाइज किंवा आर्टिफिशियल प्रकारांतील असतात. या सगळ्याच दागिन्यांची योग्य ती काळजी घ्यावी लागते. जर या दागिन्यांची वेळच्यावेळी योग्य ती काळजी घेतली नाही तर ते खराब होऊ शकतात(How to clean fashion jewelry with one household product).

आपल्या दागिन्यांची नीट काळजी न घेतल्यास, अगदी उच्च दर्जाच्या मटेरियल पासून बनवलेले दागिने देखील कालांतराने थोडेसे फिकट किंवा काळपट दिसू शकतात. या दागिन्यांच्या सतत वापराने त्यांचा हवा, धुळ, घाम वा कॉस्मेटिक्सशी संबंध येत असतो. त्याचा त्यांच्यावर परिणामही होतो. विविध कार्यक्रमप्रसंगी म्हणजे फंक्शनल घालावयाचे दागिने (How Can I Effectively Clean Artificial Jewellery at Home?) नाजूक व कलाकुसर असलेले असतात. या दागिन्यांचा वापर कमी काळासाठीच असल्याने व कार्यक्रम संपल्यावर पुन्हा हे दागिने व्यवस्थित ठेवले गेले तर त्यांचा नाजूकपणा टिकून राहतो(Easy & Quick Hacks On How To Clean Artificial Jewellery At Home).

आपल्याकडे असणाऱ्या आर्टिफिशियल सिल्व्हर, ग्लोड प्लेटेड दागिन्यांची स्वच्छता कशी करावी ? 

१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये हे आर्टिफिशियल सिल्व्हर, ग्लोड प्लेटेड दागिने घ्यावेत. 

२. आता या दागिन्यांच्या बाऊलमध्ये ठेवलेल्या दागिन्यांवर टोमॅटो केचअप घालूंन घ्यावे. 

३. केचअप घातल्यानंतर हे दागिने हलक्या हातांनी चोळून घ्यावेत. 

खूप आंबट झाले म्हणून दही टाकून देता? १ सोपा उपाय, दही संपेल आणि किचनही होईल चकाचक...

वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...

४. त्यानंतर ५ ते १० मिनिटे या दागिन्यांवर हे केचअप असेच लावून ठेवावे. 

५. १० मिनिटानंतर ही आर्टिफिशियल ज्वेलरी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. 

कितीही धुतले तरीही शर्टाची कॉलर, अंडरआर्म्स दिसतात मळके ? ५ सोपे उपाय... शर्ट दिसेल पांढराशुभ्र...

कुकरची शिटी स्वच्छ कशी करायची ? काचेच्या बाटलीवरचे स्टिकर कसे काढायचे ? घ्या एकदम सोपे झटपट उपाय...

हा एक सोपा उपाय केल्याने आपली आर्टिफिशियल काळी पडलेली सिल्व्हर, ग्लोड प्लेटेड ज्वेलरी लगेच पुन्हा नव्यासारखी दिसू लागेल.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स