Join us  

लोखंडी कढई, तव्याला गंज चढला? लोखंडाची भांडी झटपट साफ करण्याची १ सोपी ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2024 6:27 PM

1 Easy Trick to Clean iron pan or kadhai by chef pankaj Bhadauria : लोखंडी भांडी ओली राहिली तर त्यातील लोह दिसायला लागते

लोखंडी भांड्यांमध्ये केलेले पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात म्हणून आपण घरात आवर्जून लोखंडी भांडी वापरतो. यातील लोह शरीराला मिळून शरीराची लोहाची पातळी वाढते म्हणून लोखंडी कढई, लहान कढलं, उलथनं, तवा या गोष्टी आवर्जून वापरल्या जातात. आरोग्यासाठी हे चांगले असले तरी लोखंडी भांडी वापरल्यानंतर ती घासणे आणि साफ ठेवणे ही महत्त्वाची गोष्ट असते. लोखंड हा काहीसा जड धातू असल्याने तो इतर धातूंप्रमाणे घासायला अजिबात सोपा नसतो. एकदा लोखंडी तवा किंवा कढईवर थर साठत गेला की तो साफ करणे अवघड होते (1 Easy Trick to Clean iron pan or kadhai by chef pankaj Bhadauria). 

लोखंडी भांडी घासायला एकतर जास्त जोरही लागतो आणि ती तशीच खराब वापरली तर आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते. तसेच लोखंडी भांडी ओली राहिली तर त्यातील लोह दिसायला लागते आणि तशाच भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे चांगले नसते. ही भांडी पूर्ण कोरडी करुन मगच ती वापरायला हवीत. प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया लोखंडी भांडी साफ करण्याची एक सोपी ट्रिक आपल्यासोबत शेअर करतात. ही ट्रीक वापरुन भांडी स्वच्छ करणे सोपे असल्याचे त्यांचे म्हणणे असून ती कोणती पाहूया...

१. सगळ्यात आधी तवा किंवा कढई स्वच्छ धुवायचे आणि वाळवायचे.

२. त्यानंतर यावर थोडे मोहरीचे तेल लावून ते सगळीकडे नीट पसरुन लावायचे. 

३. एका दुसऱ्या कापडाने हे तेल लावलेले भांडे स्वच्छ पुसून घ्यायचे.

४. मात्र तेलाचा अंश त्यावर तसाच ठेवल्यास त्यावर अजिबात गंज चढत नाही. ५. पण जर या लोखंडी भांड्यावर पाणी राहीले किंवा आणखी काही द्रव पदार्थ तसाच राहीला तर मात्र त्यातील गंज बाहेर दिसायला लागतो आणि ही भांडी लवकर खराब होतात. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स